वाङ्मयाचे संशोधन संपूर्ण माहिती
वाङ्मयाचे संशोधन
मागील दोन मुद्यात समीक्षा, वाड्मयेतिहास यांचा थोडक्यात सांकल्पनिक परिचय करून घेतला. समीक्षा, वाङ्मयेतिहास आणि बाङ्मयाचे संशोधन यामधील सीमारेषा पुसट होत चालल्या आहेत. त्यामुळे संशोधकांना समीक्षा, इतिहास, संशोधन यामधील फरक ध्यानात येईनासा झाला आहे. या तिन्ही संकल्पनांची सरमिसळ झाल्याने समीक्षेची आणि संशोधनाचीही उंची आपोआप खाली येत आहे. ते टाळण्यासाठी त्या गोष्टी प्राथमिक अवस्थेत स्पष्ट करून घेतल्या. आता आपल्याला वाङ्मयाचे संशोधन समीक्षा आणि वाड्मयेतिहासाहून कसे वेगळे आहे, हे पाहावयाचे आहे.
समीक्षा कलाकृतीमधील सौंदर्य उलगडून दाखविते. कलाकृतीमधील भावसौंदर्य, अर्थसर्सीदर्य रसिकांना आस्वादन करून घेण्यास समीक्षा साहाय्य करते. वाड्मयमूल्यांचे विश्लेषणही त्या कलाकृतीच्या विषयाच्या अनुषंगाने आणि कलाकृतीमध्ये आलेल्या आशयाच्या अनुषंगाने केले जाते. समीक्षा एकेका कलाकृतीच्या पलीकडे जाऊन विशिष्ट काळातील एका वाड्मयप्रकाराकडे बळते तेव्हा पुन्हा अर्थसौंदर्याची दृष्टी व भावसौंदर्याची दृष्टी क्षीण होऊन वाङ्मयाच्या प्रेरणा प्रवृत्तीचे, संवेदनेचे विधान करण्याकडे कल जातो. ही समीक्षेच्या अंतःस्वरुपाच्या दृष्टीतील सूक्ष्मता आहे, हेही ध्यानात घेतले पाहिजे. उदाहरणार्थ ना. सी. फडक्यांच्या एखाद्या कादंबरीचा विचार करतो, तेव्हा त्या कादंबरीचे सौंदर्यग्रहण आपण करतो; पण १९२० ते १९५० या कालखंडातील कादंबरीची समीक्षा करताना फडक्यांच्या कादंबऱ्यांचे रसग्रहण आपण करणार नाही. तेव्हा आपण विसाव्या शतकाच्या सुरवातीचे पाव शतक, त्यामधील सामाजिक परिस्थिती, शिक्षणाचा होत असलेला प्रसार, बदलत चाललेली जीवनशैली, व्यक्तिस्वातंत्र्याची उद्घोषणा आणि सौंदर्यवादी दृष्टीच्या कुतूहलापोटी फडक्यांच्या कादंबऱ्यांकडे आपण पाहणार आणि तशी तर्कसंगत विधान फडके यांच्या कादंबऱ्यांवर करणार तर खांडेकरांच्या कादंबऱ्यात जोशात येणाऱ्या भाबडेपणावर काही विधाने करणार, ही झाली एखाद्या लेखकाच्या समग्र साहित्यविषयाची समीक्षा दृष्टी.
पण संशोधन समीक्षेप्रमाणे सरळ विधानयुक्त (असरशन) नसते. विधानाला संदर्भ, पूरक विश्लेषण दिलेले असते. हे विधान अत्यंत तटस्थपणे, निर्ममतेने, पुराव्यासह फडके आणि खांडेकरांच्या कादंबऱ्यांचे विश्लेषण केले जाईल. वाङ्मयीन प्रेरणा आणि प्रवृत्ती कोणत्याही काळात त्या काळातील जनमानसाचे प्रतिनिधित्व करते हे संशोधनाच्या आधारे शोधता येईल. संशोधनात भावसौंदर्याचा व अर्थसौंदर्याचा गाभाभूत विचार नसतो. कारण वाङ्मयीन संशोधनात व्यक्तिवाचीत्व (व्यक्तीच्या अनुषंगाने) अभावानेच येते. संशोधनात वस्तुनिष्ठ आणि बुध्दिनिष्ठ विचार करावा लागतो. म्हणून मग आपण ना. सी. फडके यांच्या कादंबऱ्याचा कालखंडनिष्ठ विचार करताना त्यांची वाङ्मयनिष्ठा, त्यांची वाड्मयविषयक भूमिका आणि कला आणि सौंदर्य याविषयीची त्यांची भूमिका आणि एक व्यक्ती म्हणून त्यांनी ओळखलेली काळाची चालती पावले, हे संशोधनात वस्तुनिष्ठ व बुध्दिनिष्ठ यांच्या अनुषंगाने येईल. वाङ्मयीन संशोधन अनेक विषयांवर करता येते, त्यातील काही प्रमुख प्रकारांची चर्चा करू.
भाषिक संशोधन
भाषा समाजामधून निर्माण झाला आहे. म्हणून समाज आणि भाषा यांचा अन्योन्य संबंध प्रस्थापित झाला आहे. समाजभाषाविज्ञानाला आता महत्त्व आले आहे. यामध्ये बोलींचा अभ्यास होत असतो. क्षेत्रिय पध्दतीने बोलीवर संशोधन करता
येते. बोलीचा शब्दकोश अशा स्वरुपाचेही संशोधन हाती घेता येते. मराठवाडा भागात मोठ्याप्रमाणात बोलींचे संकलन करून सांस्कृतिक शोध घेण्यात आला आहे. बोलींचा अभ्यास झाला; परंतु शैली मात्र दुर्लक्षित राहिली आहे. (पाहा: भाषा व साहित्य - खंड - २)
लेखकाचा अभ्यास
'एका लेखकाचा अभ्यास' हा अभ्यासविषय अतिशय प्रिय विषय होता. अलीकडील काळात या विषयाकडे पाहण्याची दृष्टी बदललेली आहे. खरे तर हा विषय अनेक पातळ्यांवरचा म्हणून गुंतागुंतीचा आणि क्लिष्ट असा आहे; परंतु तरीही हा विषय प्रिय ठरला. क्लिष्ट अशासाठी की, अनेक लेखकांनी बहुविध वाड्मयप्रकारांपासून लेखन केले आहे. कथा कादंबरी- कादंबरिका, नाटक, कविता, ललित, लघुनिबंध अशा प्रकारांतून अनेक लेखकांचा लेखनाविष्कार झालेला आहे. उदा. वि. वा. शिरवाडकर यांनी नाटक, कविता, कादंबरिका, कथा, लघुनिबंध अशा उतरत्या श्रेणीमधून चांगले लेखन केले आहे. (जयवंत दळवी नाटक, कादंबरी, कथा/चि. त्र्यं. खानोलकर कविता, कादंबरी / यांच्या मागील पिढीतील मढेकर, पु. शि. रेगे इत्यादी) अभ्यासकांना अभ्यास त्या लेखकांनी हाताळलेल्या सर्व वाङ्मयप्रकारांवरचा चांगला अभ्यास व त्या प्रकारातील परंपरेची चांगली जाण, समज असेल तरच अशा एका लेखकाच्या अभ्यासात अडचण येणार नाही. अन्यथा अशा बहुविधतेने अभ्यासकासमोर गुंता होता; परंतु वाङ्मयीन परंपरेची समज नसतानाही अशा (एका लेखकाचा अभ्यास) हा अभ्यासाविषय घेऊ आपल्या सीमित विषयाला आणखी तो विषय आणि ती अभ्यासपध्दती आपल्या पुरतीच सीमित केली आहे.
या उलट एखादा कसदार लेखक निवडून त्या लेखकांनी आपल्या वाङ्मयपरंपरेत कोणत्या वाङ्मयप्रकारांतून भरीव व गुणवत्तापूर्ण योगदान केले आहे, हे निश्चित करून तेवढा सखोल असा अभ्यास करता येतो. (उदा. दि. पु. चित्रे यांची कविता : रणधीर शिंदे यांचा प्रबंध व प्रकाशित ग्रंथ पहावा)
व्यक्ती आणि वाङ्मयः-'
-: जीवन आणि साहित्यः',...' व्यक्तिमत्त्व आणि साहित्यः '-: एक चिकित्सक अभ्यासः' असे विषयही गुळगुळीत झालेले आहेत. हे सारे टाळून एका लेखकाचा अभ्यास करता येतो. आवडत्या लेखकाचा अभ्यास वा वाचन केलेले असावे, वाचनाच्या आधारे एखादे सूत्र मनात धरावे, लेखकाचा काळ कोणता आहे, हे पाहून काही दुवे साधता येतील का, हे निश्चित करून पुढे जावे, तरच त्या लेखकाचा सखोल अभ्यास होईल. (पाहा: भाषा व साहित्य : संशोधन भाग १ प्र. ल. गोवडे यांचा लेख)
साहित्यकृतीनिष्ठ अभ्यास
साहित्यकृतीनिष्ठ अभ्यास हा विषय एका लेखकाचा अभ्यास इतका प्रिय नाही; परंतु एखाद्या साहित्यकृतीवर सर्वांगीण अभ्यास करता येतो. मध्ययुगीन आणि आधुनिक अशा एखाद्या कृतीवर संशोधन झाले आहे. 'दमयंती स्वयंवर', हरिवरदा', 'संगीत सौभद्र', 'कोसला' अशी चांगली उदाहरणे सांगता येईल. अशा एखाद्या साहित्यकृतीनी काय भर घातली आहे, त्या कृतीने तिच्या परंपरेतील पुढच्या वाटचालीला कोणकोणत्या बाबतीत प्रभावित केले आहे, ती उदाहरणे, असे सखोल चिंतन एका साहित्यकृतीबाबत व्हायला हवे.
एका साहित्यकृतीचा अभ्यास तौलनिक पद्धतीनेही करणे शक्य होते. समकालीन इतर प्रदेशातील, इतर भाषेतील अशा साहित्यकृतीचा शोध घेऊन तौलनिकरित्या निरीक्षणे मांडता येतात. एका साहित्यकृतीचा अभ्यास करण्याआधी काही प्राथमिक तयारी करावी लागेल. ती म्हणजे त्या कृतीचा काळ, त्या काळात वाङ्मयीन, सांस्कृतिक, सामाजिक, राजकीय वातावरण, गोष्टी तपासून घ्याव्यात. शिवाय लेखकांनी त्या कृतीची काही परिष्करणे केली आहेत का, हेही पहावे लागेल तरच हा अभ्यास नीट होईल.
वाङ्मयप्रकारनिष्ठ, सैद्धांतिक, तौलनिक अभ्यास
या प्रकारच्या म्हणजे एखादा वाड्मयप्रकारनिष्ठ, युगाची शैली मीमांसा, सैद्धांतिक, भाषावैज्ञानिक, तौलनिक अशा प्रकारच्या अभ्यासविषयांना आपण मूलभूत विषय म्हणू या. कारण असे अभ्यासविषय घेऊन संशोधन सिद्ध केलेले ग्रंथ पुढील पिढींना मार्गदर्शक ठरले आहेत. 'कविता आणि प्रतिमा' (प्रा. सुधीर रसाळ), 'विनोद' तत्त्व आणि स्वरुप' (प्रा. गो. मा. पवार) हे ग्रंथ आणि त्यामधील सिद्धांततत्त्वे, अवतरणे दिल्यानंतर आपल्या मनाला भरभक्कमपणा येतो. वाड्मयाच्या सैद्धांतिक
मांडणीला व सिद्धांताला अशा स्वरुपाच्या विषयात महत्त्व असते. कादंबरी, कथा, नाटक यातील आविष्कार विशेष, तत्त्वज्ञान, प्रेरणा, यानुसार वाङ्मयप्रकारनिष्ठ, सैद्धांतिक, तौलनिक या विषयांकडे पाहता येते. तौलनिक साहित्याभ्यास ही आताची महत्त्वाची अभ्यासशाखा होत आहे. यामध्ये रूपबंधाचा, गद्य पद्म, प्राचीन-अर्वाचीन असा विचार करता येतो. तौलनिक अभ्यासात श्रेष्ठ कनिष्ठ असे निकष न लावता अभ्यास करावा म्हणजे तो निर्दोष होईल.
वाड्मयाचे संशोधन कशाप्रकारे करता येते. हे आपण ढोबळपणे पाहिले. आता साहित्यसंशोधन व अन्य अभ्यासशाखांचा थोडक्यात परिचय करून घेऊ.
Best
ReplyDelete