वाङ्मयीन इतिहास माहिती
वाङ्मयीन इतिहास
बाड्मयाचा इतिहास म्हणजे सामाजिक इतिहास किंवा ऐतिहासिक राज्यव्यवस्थेचा इतिहास नव्हे. वाङ्मय हे मानवी संस्कृतीचे एक अंग असते. वाड्मयाचा इतिहास बाड्मयसंस्कृतीचे वृत्तकथन करते. म्हणजे इथे आपल्याला दोन गोष्टी स्पष्ट होतात. त्या म्हणजे वाड्मयाचा इतिहास म्हणजे बाड्मयाची समीक्षा नव्हे आणि बाड्मयाचा इतिहास म्हणजेही वाड्मयाचे संशोधन नव्हे, पण बाड्मयाचा इतिहास वाड्मयाच्या समीक्षेला आणि वाङ्मयाच्या संशोधनाला सहाय्यभूत असते. ते कसे ते पाहू.
वाड्मयाचा इतिहास समीक्षेच्या निकषांवर होत नसतो. नवनिर्माणक्षमता, सृजनात्मकता, आस्वादात्मकता, मूल्यनिर्णय आणि सौंदर्यस्थळांचे विश्लेषण वाड्मयाच्या इतिहासाला अमान्य असते. वाड्मयेतिहासाचेही कार्य सामाजिक वा राजकीय इतिहासासारखेच असते. समीक्षा वाड्मयाच्या अंतरंगात डोकावते तर वाड्मयाचा इतिहास बाड्मयाच्या बहिरंगावर बेतलेला असतो. समीक्षकापेक्षा कमालीचा तटस्थपणा वाड्मयेतिहासकाराला साधावा लागतो. एवढेच नव्हे तर त्याच्या व्यक्तिगत अभिरुचीला म्हणजे आवडी निवडीला वाव नसतो. विशिष्ट काळात घडलेल्या बाड्मयाचे प्रारूपच त्याला रेखाटायचे असते. वाड्मयेतिहासात विशिष्ट काळातील वाङ्मयाची वाटचाल अपेक्षित असते. म्हणून वाड्मयेतिहास बहिरंगात रंगलेले असते, असे म्हणता येईल, बाड्मयाची विशिष्ट काळात वाटचाल कशी झाली, वाङ्मयाच्या कालिक प्रेरणा काय होत्या, सामाजिक आणि राजकीय घटनांनी साहित्यावर कोणते परिणाम केले अशा बाह्य गोष्टी ध्यानात घेऊन साहित्याचे केवळ निरपेक्ष वर्णन करणे म्हणजे साहित्याचा इतिहास होय. उदारहणार्थ कृ. प्र. खाडीलकरांच्या नाटकांचा इतिहास वाङ्मयेतिहासाच्या प्रकरणात लिहायचा आहे. तर खाडीलकरांनी पौराणिक नाटके कोणत्या परिस्थितीत लिहिली? असा प्रश्न बेईल. तेव्हा स्वातंत्र्यपूर्व काळ आणि पौराणिकतेमधून त्यांना प्रेरणा मिळाली आणि तशी पारतंत्र्याविरुध्द भावजागृतीची प्रेरणा त्यांनी दिली असे आपल्याला वाङ्मयेतिहासात सांगता येते. स्थळ, काळ, प्रेरणा परिस्थितीच्या अनुषंगाने वाड्मयेतिहास निर्माण होतो. वाङ्मयेतिहास बदलत जाणाऱ्या प्रवृत्तीवरही प्रकाश टाकते. ते वाड्मयेतिहासकाराला शक्य होते. कारण त्याच्या दृष्टीसमोर विशिष्ट काळातील सारा पसारा असा पसरलेला असतो. त्यामुळे वाङ्मयीन प्रवृत्तीमध्ये होत गेलेले बदल इतिहासकाराला सांगणे शक्य होते; पण तो अधिक खोलात, पुराव्यासकट जाऊ शकत नाही. ते काम तो संशोधकांवर सोडतो.
बाङ्मयेतिहासात कथावस्तुंच्या रसग्रहणाला, सौंदर्यस्वादाला स्थान नसतेच. वाड्मयेतिहासात साहित्याच्या समग्रतेला आणि समग्रतेच्या प्रवृत्तीला, संवेदनेला महत्त्व असते. याचवेळी वाड्मयेतिहासकार वाड्मयेतिहास निर्माण करणाऱ्या लेखकाच्या जीवनचरित्राकडे दुर्लक्ष करीत नसतो.
त्या त्या कालखंडातील प्रेरणानुसार, सामाजिक धोरणांनुसार व धारणांनुसार आणि प्रतिभावान लेखकाच्या प्रभावानुसार काही शैलीही निर्माण होतात. या शैली पाहण्याचे कार्यही वाङ्मयेतिहास करतो. उदाहरणार्थ संतांची शैली, पंडितांची शैली, साहित्यांची शैली असे समग्रतेच्या परिशिलनातून वाङ्मयेतिहासात आलेल्या अशा नोंदी संशोधनाला विषय पुरवू शकतात, आता या संदर्भात गो. म. कुलकर्णी म्हणतात, "वाङ्मयेतिहासामध्ये कालतत्त्व व कालगतव्यवहार ह्यांचा एक सर्जनशील नातेसंबंध मांडला गेला पाहिजे. वाड्मयेतिहास कोणत्याही अर्थाने एक Creative Flash च असतो. त्यामुळे वाचकाच्या जाणिवा प्रसरणशील व्हायला हव्यात." (प्रतिष्ठान: १९९३)
Comments
Post a Comment
Thank you to visit My blog