आंतर्विद्याशाखीय अभ्यास अन्य अभ्यास शाखा संपूर्ण माहिती
आंतर्विद्याशाखीय अभ्यास अन्य अभ्यास शाखा
मानवाच्या जाणीवकक्षा सतत विस्तारत, बाढत आहेत. या साऱ्यांचा साहित्यवर परिणाम होणे अपरिहार्य आहे, कारण मानवी मन अनेक गोष्टींतून शक्यता अजमावत असते. साहित्यावर आणि संशोधनावर विस्तारलेल्या ज्ञानशाखांचा प्रभाव होणे साहजिकच आहे. विशेषतः संशोधनात साहित्येत ज्ञानशाखांचा आधार घेणे आज आवश्यक झाले आहे. इतर ज्ञानशाखेची तुलना करून प्रभावक्षेत्र दाखविले जाते. साहित्याचे मानसशास्त्र, तत्त्वज्ञान, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, सामाजिक शाख, लोकसाहित्य इत्यादी मानव्यविद्या शाखांशी संबंध असतो. हे संबंध कशाप्रकारचे आहेत, त्यांचा शोध आंतरविद्याशाखीय अभ्यासातून घेतला जातो. त्यामुळे आंतरविद्याशाखांत समन्वय असणे महत्त्वाचे ठरले आहे. साहित्याचा इतर शास्त्रांशी परस्पर संबंध कसा आहे, ते पाहू
साहित्य आणि इतिहास
साहित्य आणि इतिहास यांचा दोन प्रकारचा अनुबंध असतो. एक म्हणजे साहित्याचा इतिहासाशी संबंध ऐतिहासिक, पौराणिक कथावस्तूशी असतो, ऐतिहासिक, पौराणिक अशा घटना, प्रसंगांच्या अनुषंगाने कलाकृती निर्माण केली जाते. म्हणून इतिहासाचा विविध संदर्भात अभ्यास केला जातो. भूतकाळातील अभ्यासात इतिहासाचीच मदत घ्यावी लागते. त्या काळाचा राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक इतिहास नीट समजून घेवून संशोधनात त्याचा आधार घेता येतो. इतिहासातील किंवा पुराणातील व्यक्तीच्या जीवनातील प्रसंगांवर कथा, काव्य, नाटक तयार केले जाते. अशावेळी ऐतिहासिक व्यक्तिरेखा आणि लेखकाने आपल्या प्रतिभासामर्थ्यावर निर्माण केलेली व्यक्तिरेखा यांचा काहीसा तौलनिक अभ्यास करावा लागतो.
आणि दुसरे म्हणजे ऐतिहासिक साधनसंशोधन होय. मुद्रणकला अस्तित्वात नव्हती तेव्हा हस्तलिखिते नकलून घेतली जात. नकलण्याचे काम बहुतेकवेळा मुळाबरहुकूम केले जाईलच याची खात्री नसते. तेव्हा असे झाले असल्यास ग्रंथकाराच्या मूळ प्रतीचा शोध घेणे कठीण जाते, त्यासाठी पाठ चिकित्साशास्त्राची माहिती करून घ्यावी लागते. साहित्य आणि इतिहास यांचा संबंध अशा विविध स्वरूपाचा असतो.
साहित्य आणि लोकसाहित्य
लोकसाहित्य परंपरेने चालत आलेले असते. साहजिकच लोकसाहित्यात प्राचीन संस्कृतीच्या समजूती, रुढी, रीतीरिवाज परंपरेच्या लोकधारेमधून पुढे आलेल्या असतात. म्हणून मानवी समाज समजून घेण्यासाठी लोकसाहित्य ही एक अत्यंत महत्त्वाची लोकविद्याशाखा आहे. कारण उपयोजित विज्ञानाचे अस्तित्व नसताना आदिमानवाने, प्राचीन मानवाने त्यांना पडलेल्या प्रश्नांचा अर्थ लावण्याचा प्रयत्न, गूढ उकलण्याचा प्रयत्न केला आहे. हे लोकसंस्कृतीमधून नाटक, लोककथा, लोककथागीत, कोडे यांच्या अनुषंगाने पुढे आलेले आहे. अवकाशाविषयी, निसर्गाविषयी पडलेले प्रश्न तो आपल्यापरीने सोडवत होता. त्यातून त्याचे ज्ञानक्षेत्र विकसित झाले आहे. हा त्यांचा प्रयत्न म्हणजे त्यांचे अतिप्राचीन विज्ञानच म्हणता येईल.
लोकसाहित्यातील लोकगीतांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. लोकगीतांची लयात्मकता आज कोणत्या रचनांमध्ये कशी उतरली आहे, हे पाहणे गरजेचे आहे. लोकलयी, लोकरूडी, लोकसमजुती, लोकरिती परंपरेने आल्या असल्याने हे संचित लौकिक आहे. या दृष्टीने साहित्याचा अभ्यास करता येतो, परंपरेने काही पक्षांना, काही प्राण्यांना कशाचे तरी प्रतीक मानले आहे. पवित्र, अपवित्र मानले गेले आहे, त्या पाठीमागील कारणमीमांसा करणे गरजेचे आहे.
लोकसाहित्याचा अभ्यास विविध अंगाने करणे शक्य आहे. लोकदेवता, भाषिकतत्त्व, म्हणी, वाक्प्रचार, बोली ह्या जिवंत तत्त्वांनी केवळ ग्रामीण साहित्यालाच नव्हे तर समग्र सारस्वतालाच समृद्ध केले आहे. म्हणून लोकसाहित्याचा साहित्याशी असलेला अन्वय शोधणे आवश्यक ठरते.
साहित्य आणि तत्त्वज्ञान
आचार, विचार, उच्चार या विषयीच्या चिंतनाला तत्त्वज्ञान म्हटले जाते. कोणत्याही गोष्टीकडे अत्यंत निर्मम, तटस्थपणे पाहण्याची तत्त्वज्ञानाची पद्धत असते. अंतिमतः जे टिकून राहते ते तत्त्व. त्या तत्त्वासंबंधीचे ज्ञान तेच तत्त्वज्ञान. चिकित्सा ही तत्त्वज्ञानाची पद्धती आहे. तत्त्वज्ञान चिकित्सा न करता काहीही गृहित धरत नाही. म्हणून तत्त्वज्ञानाच्या अभ्यासात शिस्त व सुस्पष्टता असते. तत्त्वज्ञान अंतिमतः मानवाचाच विचार करते. तत्त्वज्ञानामुळे जीवनाला सघन आशय प्राप्त होतो, तत्त्वज्ञानाच्या अभ्यासामुळे इतरांबद्दल आस्था व मूल्यभाव वाटू लागतो. अशा तत्त्वज्ञानाची साहित्याच्या अभ्यासासाठी उपयुक्तता आहे.
वाङ्मयाचे तत्त्वज्ञान, वाङ्मयीन संकल्पनाचे स्पष्टीकरण, साहित्याची निर्मिती, साहित्यातील सौंदर्य, वाड्मयाचे निकष, साहित्याचे प्रयोजन, वाड्मयाची देशकालपरत्व वैशिष्ट्ये या सर्व गोष्टीमध्ये वैचित्र्य आणि वैविध्य असते. पण तत्त्वज्ञान सर्वांना लागू पडेल असे एक तत्त्व मागते. बर आता सांगितलेल्या घटकतत्त्वांत रुपवैचित्र्य व वैविध्य असूनही आणि प्रत्येक कलाकृती एकमेवाद्वितीय असूनही त्याच्या निर्मितीमधील तत्त्वे सारखीच आहेत. म्हणून साहित्याचे तत्त्वज्ञान निर्माण झाले आहे. याचा अर्थ असा की, जगातील सर्व भाषेतील, सर्व लेखकांना व त्यांच्या कलाकृतींना लागू होईल, असे तत्त्व त्या साहित्याच्या तत्त्वज्ञानात असते.
परंतु बाड्मयीन कलाकृतीचे माध्यम शब्द असते. वाङ्मयात उपयोजिली जाणारी शब्दकळा ही लवचिक असते. म्हणून अर्थ निःसंदिग्ध नसतो. बाड्मयाकडे स्थळकाळ संदर्भात पाण्याचा दृष्टिकोन बदलला की त्यातील शब्दांच्या अर्थकक्षा हव्या त्याप्रमाणे लवचिक होतात, बदलतात. हे ध्यानात घेतले की वाड्मयाचे तत्त्वज्ञान एकच असेल, असे म्हणता येत नाही. म्हणून वाङ्मयाचे तत्त्वज्ञान हे केवळ वाड्मयावर अवलंबून नसते. वाड्मयाची मूळ प्रेरणा लेखकाच्याच तत्त्वज्ञानात सापडते. म्हणून लेखकाच्या हेतूचा संबंध वाड्मयाच्या अर्थाशी लावला जातो. उदाहरणार्थ, मागे घेतलेली खाडीलकरांची पौराणिक नाटके, पारतंत्र्याविषयीची चीड निर्माण करणे हा हेतू ठेवून खाडीलकरांनी पौराणिक नाटके लिहिली. हेतू संदर्भात त्या नाटकांच्या तत्त्वाचा शोध घ्यावा लागेल; परंतु साहित्य हे निर्विवादित सत्य नसते, हेही लक्षात घ्यावे.
साहित्य आणि समाजशास्त्र
मानवी संबंधाचे जाळे म्हणून समाजशास्त्राकडे पाहिले जाते. समाजशास्त्राच्या अभ्यासाचे केंद्र माणूसच आहे. एकमेकांशी बागणे, परिस्थिती, संस्कृती, हितसंबंध, संघर्ष या सामाजिक आंतरक्रिया आहेत. सहकार्य, समूहभाव, संघर्ष यातून सामाजिक संबंध निर्माण होतात. या सगळ्या गोष्टी विवाह, कुटुंब, धर्मसंस्था, अर्थसंस्था यांच्याशी निगडीत असतात. यांचा अभ्यास समाजशास्त्रात होतो. समाज आणि व्यक्तीचे सामाजिकीकरण हेच समाजशास्त्राचे अभ्यास विषय आहेत. यांचा साहित्याशी संबंध आहे. कलाकृतीच्या काल्पनिक वास्तवाचा प्रत्यक्ष बास्तवाशी असलेला वा नसलेल्या संबंधाचा शोध समाजशास्त्रीय अभ्यासात केला जातो.
साहित्याची समाजाशिवाय स्वतंत्र निर्मिती नसते. समाज समजून घेण्यासाठी माणसे, माणसांचे समूह, समूहसमाजाची संस्कृती समाजशास्त्राच्या अभ्यासकाला समजून घ्यावी लागते. साहित्यिकाच्याही याच प्रेरणा असतात. समाजशास्त्र आणि साहित्यिक हे दोघेही व्यष्टी समष्टीचाचा शोध घेतात; परंतु दोघांची दृष्टी निराळी असते. समाजातील प्रश्नांचे प्रातिनिधिक चित्र कलाकृतीमध्ये निर्माण केले जाते. बास्तवावर साहित्यिक कलात्मक सौष्ठवाचे रंग, चढवतो तेव्हा समाजशास्त्रज्ञ घटनाक्रम पाहतो. उदाहरणार्थ संजय सोनवणी यांची 'सव्यासाची' कादंबरी. कादंबरीचा नायक कधीही वाचकाच्या भेटीला येत नाही, वाचकांशी भेट न घडविताच 'सब्यासाची' या नायकाच्या भोवती कथानक फिरत राहते. १९९३ सालातील मुंबईतील बाँबस्फोट घटना, शेअर बाजारातील प्रचंड चढ-उतार, 'स्त्री'चा वापर करून शेअर बाजाराचे सर्व आडाखे चोरणे आणि स्त्रीभोग या संदर्भात समाजशास्त्रीय पद्धतीने कादंबरीचा शोध घेता येईल. तेव्हा साहित्याच्या अनुषंगाने आलेली 'सव्यासाची' कॉर्पोरेट जगतातील पहिली मराठी कादंबरी आहे. परंपराप्रिय आणि आध्यात्मिक जोखड पांघरलेले बास्तवाचे स्वरूप पाहण्यासाठी समाजाला उपयुक्त ठरेल.
साहित्य आणि मानसशास्त्र
मानवी बर्तन हा मानसशास्त्राच्या अभ्यासाचा विषय असतो. मानवाचा परस्परांशी होणारा संपर्क व त्यातून त्यांचे क्रिया प्रतिक्रियात्मक वर्तन यांचा प्रयोगाने आणि निरीक्षणाने सुव्यवस्थित अभ्यास मानसशास्त्रात केला जातो. मॅक्डुगल, फ्रॉईड, बॉटसन, अॅडलर, बुंग, गिलफर्ड, एरिक बर्ग यांनी मानसशास्त्रात नैतिक कार्य केले आहे. यांनी विकसित केलेल्या मानसशास्त्राचा आधार साहित्याच्या संशोधनाला घेता येते.
मानसशास्त्र कलाकृती अंतिम किंवा कत्र्त्यांहून भिन्न नसते, असे मानते, कलाकृतीच्या मागे कलावंताचे मन, त्याची जीवनधारणा, निर्मितीच्या काळातील कलावंताची मानसिक स्थिती या साऱ्या संस्कारातून कलाकृती कशी निर्माण झाली, हे मानसशास्त्र पाहते. साहित्यकृतीमधील पात्रे, त्यांचे स्वभाव, वर्तन, वातावरण यांचा संबंध अबोध मनाशी (नेणिवेशी), अहंगंड, कामप्रेरणा, न्यूनगंड, दमन, मिथ्या समर्थन यांच्याशी कसा असतो, हे पाहिले जाते. तसेच साहित्यातील अनुभवाचे नवीनरूप, मिथकप्रतिमा, अनुबंध यांचे विश्लेषण केले जाते. उदाहरणार्थ गंगाधर पाटील यांनी पु. शि. रेगे यांच्या कवितांचे विश्लेषण मानसशास्त्रीय ज्ञानाच्या आधारे केले आहे. 'सुहृद्गाथा'ची प्रस्तावना वाचल्यानंतर पु. शि. रेगे यांच्या कवितांचे आकलन लीलया होते.
मानसशास्त्रात माणसाच्या वर्तनामागची कारणे शोधली जातात. यामागील जैविक प्रेरणा महत्त्वाची समजली जाते.
Comments
Post a Comment
Thank you to visit My blog