वायू प्रदूषण, जलप्रदूषण, माती प्रदूषण याबाबत सविस्तर माहिती- (Pollution)
Detailed information on air pollution, water pollution, and soil pollution
प्रदूषण
पर्यावरणातील विविध समस्या
- पर्यावरणातील या समस्या का निर्माण झाल्या असाव्यात ?
- या समस्यांवर मात करण्यासाठी काय करावे लागेल ?
माणसाच्या निसर्गातील हस्तक्षेपामुळे पृथ्वीवर अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. औदयोगिकीकरण, बारी लोकसंख्या, खाणकाम, वाहतूक, कीटकनाशकांचा आणि खतांचा वाढता वापर यांमुळे पृथ्वीवर प्रदूषण वाढलेय. प्रदूषणाचे परिणाम माणसावर सुद्धा होऊ लागलेत. नैसर्गिक पर्यावरणाचे परिसंस्थेला हानिकारक असे दूषितीकरण म्हणजे प्रदूषण होय.
प्रदूषण (Pollution):
- तुमच्या सभोवताली कोठे कोठे प्रदूषण आढळते ?
- प्रदूषण कशामुळे होते ?
प्रदूषके (Pollutants)
परिसंस्थेच्या नैसर्गिक कार्यात अडथळा आणणान्या, अजैविक व जैविक घटकांवर (वनस्पती, प्राणी आणि मानवावर) घातक परिणाम घडवणाऱ्या घटकांना प्रदूषके म्हणतात. प्रदूषके पर्यावरणात जास्त प्रमाणात सोडली गेल्यास पर्यावरण विषारी व अनारोग्यकारक होते.. प्रदूषके नैसर्गिक तसेच मानवनिर्मित असतात. नैसर्गिक प्रदूषके निसर्गनियमानुसार कालांतराने नष्ट होतात, याउलट मानवनिर्मित प्रदूषके नष्ट होत नाहीत.
जर नैसर्गिक पदार्थ हे प्रदूषक असतील, तर ते वापरताना त्याचे दुष्परिणाम आपल्याला का जाणवत नाहीत ? असे पदार्थ प्रदूषक कधी बनतात ?
प्रदूषण (Air pollution)
- पृथ्वीवरील वातावरणात असणान्या विविध वायूंचे प्रमाण दर्शविणारा आ
- हवा मेळावायूचे/घटकांचे एकजिनसी आहे असे का म्हणता
- इंधनांच्या ज्वलनातून हवेत कोणकोणते पातक वायू बाहेर सोडले जातात
- विषारी वायू, धूर, धूलि , सूक्ष्मजीव घातक पदार्थामुळे प्रदूषण म्हणतात
हवा प्रदूषणाची कारणे.
नैसर्गिक कारणे
1. ज्वालामुखीचा उद्रेक उद्रेकातून घनरूप, वायुरूप व द्रवरूप पदार्थ बाहेर पडतात. उदा. हायड्रोजन सल्फाईड, सल्फर डायऑक्साइड, कार्बन डायऑक्साइड, अमोनिअम क्लोराइड, हायड्रोजन, बाष्प, धूलिकण
2. भूकंप भूकंपामुळे पृथ्वीच्या अंतर्गत भागातील विषारी वायू व पाण्याची वाफ मोठ्या प्रमाणात हवेत मिसळली जाते.
3. वावटळी व धुळीची वादळे जमिनीवरील धूळ, केरकचरा, माती, परागकण व सूक्ष्मजीव हवेत मिसळतात.
4. वणवे वणव्यामुळे कार्बन डायऑक्साइड, सल्फरडाय ऑक्साइड, हायड्रोजन सल्फाइड व धूर वातावरणात मिसळतो.
5. उदा. काही जीवाण कवकांचे बिजाणू हवेत मिसळतात. मानवनिर्मित कारणे
1. इंधनाचा वापर
1. दगडी कोळसा, लाकूड, एलपीजी, रॉकेल, डीझेल, पेट्रोल यांच्या वापरामुळे कार्बन डायऑक्साइड, कार्बन मोनाक्साइड, नायट्रोजन ऑक्साइड, सल्फर डायऑक्साइड, शिशाची संयुगे हवेत मिसळतात. II. घन कचरा, शेतीचा कचरा, बागेतला कचरा उघड्यावर जाळल्यामुळे हवा प्रदूषण होते.
2. औदयोगिकीकरण विविध कारखान्यातून प्रचंड : प्रमाणात धूर बाहेर पडतो. गंधकाची भस्मे, नायट्रोजन ऑक्साइड, वातावरणात मिसळतात.
3. अणुऊर्जानिर्मिती व अणुस्फोट अतीत युरेनिअम, थोरिअम, फाइट प्लुटोनिअम या मूलद्रव्यांच्या वापरामुळे किरणोत्सर्जन होऊन हवा प्रदूषण घडून येते.
हवा प्रदूषणाचा वातावरणावर होणारा परिणाम
ओझोन थराचा हास/नाश आपण पूर्वी अभ्यासले आहे की, वातावरणाच्या स्थितांबर या थराच्या खालच्या भागात ओझोनचा थर आढळतो. सूर्यापासून उत्सर्जित होणाऱ्या अतिनील किरणापासून (UVB) ओझोन वायूचा थर पृथ्वीवरील सजीव सृष्टीचे संरक्षण करतो. परंतु आता या ओझोन थराला खालील कारणांमुळे धोका निर्माण झाला आहे.
हरितगृह परिणाम व जागतिक तापमान वाढ :
CO. वातावरणात अगदी कमी प्रमाणात असला तरी तो सूर्याची उत्सर्जित ऊर्जा शोषून घेण्याचे अतिशय उपयुक्त काम करतो. मागील शंभर वर्षामध्ये औद्योगिकीकरणामुळे वातावरणामधील CO चे प्रमाण वाढले आहे. या CO, चा पृथ्वीच्या तापमानावर होणारा परिणाम म्हणजेच 'हरितगृह परिणाम होय. CO, प्रमाणे नायट्रस ऑक्साइड, मिथेन वायू व CFC हे पृथ्वीवरील वातावरणातील उष्णता रोखून ठेवतात. एकत्रितपणे त्यांना 'हरितगृह वायू' असे म्हटले जाते.
बाढल्या हरितगृह परिणामामुळे हळूहळू जागतिक तापमान वाढत चालले आहे. यामुळे हवामानात बदल घडून त्यामुळे पिकांचे उत्पादन, वन्यजीवाचे वितरण ह्यात बिघाड तसेच हिमनग व हिमनद्या वितळून समुद्रपातळीमध्ये वाढ दिसून येत आहे..
आम्लवर्षा (Acid Rain ) :
कोळसा, लाकूड, खनिज तेले यांसारख्या इंधनाच्या ज्वलनातून सल्फर व नायट्रोजन यांची ऑक्साइडे वातावरणात सोडली जातात. ही पावसाच्या पाण्यात मिसळतात व त्यापासून सल्फुरिक आम्ल, नायट्रस आम्ल व नायट्रीक आम्ल तयार होते. ही आम्ले, पावसाचे थेंब किंवा हिमकणांमध्ये मिसळून जो पाऊस किंवा बर्फ पडतो. त्यालाच आम्लवर्षा म्हणतात.
आम्लवर्षेचे परिणाम
1. आम्लयुक्त पावसामुळे मृदेची व पाण्याच्या साठ्याची आम्लता वाढते. यामुळे जलचर प्राणी, वनस्पती व संपूर्ण जंगलातील जीवनाची हानी होते व संपूर्ण परिसंस्थेवर विपरित परिणाम होतो.
2. इमारती, पुतळे, ऐतिहासिक वास्तू, पूल, धातूच्या मूर्ती, तारेची कुंपणे इत्यादींचे क्षरण होते.
3. आम्ल पर्जन्यामुळे अप्रत्यक्षपणे कॅडमिअम आणि मर्क्युरीसारखे जड धातू वनस्पतीमध्ये शोषली जाऊन अन्नसाखळीत शिरतात.
4. जलाशयातील आणि जलवाहिन्यातील पाणी आम्लयुक्त झाल्याने जलवाहिन्यांच्या विशिष्ट धातूंचे व प्लॅस्टीकचे पेयजलात निक्षालन होऊन आरोग्याच्या गंभीर समस्या उद्भवतात.
हवा प्रदूषणावर प्रतिबंधात्मक उपाय
- कारखान्यातून बाहेर पडणाऱ्या धुरात अनेक दूषित कण असतात, हवा प्रदूषण नियंत्रित करणाऱ्या यंत्रणेचा वापर बंधनकारक करावा. उदा. निरोधक यंत्रणा (Arresters), गाळणीयंत्र (Filters) यांचा वापर करावा.
- शहरातील दुर्गंध पसरविणान्या कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावावी.
- आण्विक चाचण्या रासायनिक अस्त्रे यांच्या वापरावर योग्य नियंत्रण असावे.
- CFC निर्मितीवर बंदी / बंधने आणावीत.
जल प्रदूषण (Water Pollution)
- वापरण्यास योग्य असे पाणी आपणांस कोणकोणत्या जलस्त्रोतापासून मिळते?
- पाण्याचा वापर आपण कोणकोणत्या कारणांसाठी करतो ?
- पृथ्वीवर एकूण क्षेत्रफळाच्या किती टक्के पाणी आहे
- कोणकोणत्या कारणांमुळे पाणी प्रदूषित होते ?
- पाण्याला जीवन असे का म्हणतात ?
नैसर्गिक व बाह्य घटकांच्या मिश्रणाने पाणी जेव्हा अस्वच्छ, विषारी होते, जेव्हा त्यातील ऑक्सिजन प्रमाण घटते व त्यामुळे सजीवांना अपाय होतो, साथीच्या रोगांचा फैलाव होतो. तेव्हा जलप्रदूषण झाले असे म्हणतात.
गोड्या किंवा समुद्राच्या पाण्यामधील प्रदूषणामध्ये भौतिक, रासायनिक व जैविक बदलांचा समावेश होतो.
जलप्रदूषके (Water Pollutants)
- जैविक जलप्रदूषके ः
शैवाल, जिवाणू, विषाणू व परजीवी सजीव यांच्यामुळे पाणी पिण्यायोग्य राहत नाही या जैविक अशुद्धीमुळे रोग पसरतात.
- असेंद्रिय जलप्रदूषके :
बारीक वाळू, धुलिकण, मातीचे कण असे तरंगणारे पदार्थ, क्षारांचा साका, आर्सेनिक, कॅडमिअम, शिसे, पारा यांची संयुगे व किरणोत्सारी पदार्थांचे अंश.
- सेंद्रिय जलप्रदूषके :
तणनाशके, कीटकनाशके, खते, सांडपाणी तसेच कारखान्यातील उत्सर्जके.
पाणी प्रदूषणाची कारणे
- नैसर्गिक कारणे व परिणाम
1. जलपर्णीची वाढ
• प्राणवायू कमी होतो. • पाण्याचा नैसर्गिक गुणधर्म बदलतो.
2. कुजणारे पदार्थ
• प्राणी व वनस्पतीचे अवशेष सडणे व कुजणे इ. मुळे
3. गाळामुळे
• नदीच्या प्रवाहामुळे व पात्र बदलल्यामुळे
4. जमिनीची धूप
• जमिनीची धूप झाल्याने जीवाण यांसारखे सूक्ष्मजीव
अनेक जैविक, अजैविक घटक पाण्यात मिसळतात.
5. कवक
• पाण्यात कुजणाऱ्या सेंद्रीय पदार्थांवर कवक व जीवाद होते.
6. शैवाल
• जास्त वाढल्याने पाणी अस्वच्छ होते.
7. कृमी
• जमिनीवरील कृमी पावसाच्या पाण्यात वाहत जातात.
ब. मानव निर्मित कारणे व परिणाम
1. निवासी क्षेत्रातील सांडपाणी
गावातील शहरातील सांडपाणी मैला नदीच्या वाहत्या पाण्यात, जलाशयात सोडले जाते.
2. औद्यागिक सांडपाणी
कापड, साखर, कागद, लोह, चर्मोद्योग व दुग्धप्रक्रिया उदयोगातून रंग, विरंजक रसायने, चामड्याचे तुकडे, तंतू, पारा, शिसे इत्यादी पाण्यात सोडले जातात.
3. खनिज तेल गळती
• वाहतूक करताना तेल सांडणे, गळती होणे, टैंकर सफाई करताना पाण्यावर तेलाचा तवंग येतो.
4. खते व कीटकनाशकांचा वापर रासायनिक, फॉस्फेटयुक्त व नायट्रोजयुक्त खते एन्ड्रीन, क्लोरिन, कार्बोनेटयुक्त कीटकनाशके इत्यादी पाण्याबरोबर वाहत जाऊन प्रवाहाला मिळते.
इतर कारणे
• नदीच्या पाण्यात मलमूत्र विसर्जन, कपडे धुणे, आंबाडी घायपात पाण्यात सडविणे यांमुळे पाणी प्रदूषित होते. रक्षा, अस्थि विसर्जन व निर्माल्य पाण्यात टाकणे. औष्णिक विद्युत केंद्रातून सांडपाणी सोडणे
पाणी प्रदूषणाचे परिणाम
1. मानवावर होणारा परिणाम
- प्रदूषित पाण्यामुळे अतिसार कावीळ, विषमज्वर, त्वचारोग, पचनसंस्थेचे विकार होतात....यकृत, मूत्रपिंड, मेंदू विकार, हाडांमध्ये विकृती,उच्च रक्तदाब हे विकार होतात.
- . परिसंस्थेवर होणारा परिणाम वनस्पतींची वाढ खुंटते,
- वनस्पतीं प्रजातींचा नाश होतो.
- पाण्यातील क्षाराचे प्रमाण वाढते.
- पाण्यात विरघळणाऱ्या ऑक्सीजनचे प्रमाणे घटते.
- जलपरिसंस्थेचे संतुलन बिघडते.
- जलचर मरतात
- समुद्रपक्ष्यांवरही परिणाम होतो.
इतर परिणाम
- पाण्याचे नैसर्गिक व भौतिक गुणधर्म बदलतात.
- पाण्याचा रंग, चव बदलते. पाण्यातील उपयुक्त जीवजंतू नष्ट होतात.
- जमिनीच्या सुपिकतेवर परिणाम होतो.
- पिकात विषारी तत्त्व समाविष्ट होतात.
मृदा प्रदूषण (Soil Pollution)
- जमिनीची धूप म्हणजे काय ?
- मृदेची सुपीकता कमी होण्याची कारणे कोणती ?
पृथ्वीवरील जमिनीने व्यापलेल्या एकूण भागांपैकी काही भाग बर्फाच्छादित आहे, काही भाग वाळवंटी तर काही भाग पर्वत व डोंगररांगानी व्यापलेला आहे. मानवी वापराला उपयुक्त जमीन खूप कमी आहे. मातीतील भौतिक, जैविक व रासायनिक गुणधर्मात नैसर्गिकरीत्या व मानवी कृत्यामुळे जे बदल घडून येतात, त्यामुळे तिची उत्पादकता कमी होते. तेव्हा मृदा प्रदूषण झाले असे म्हणतात.
मृदा प्रदूषणाचे परिणाम
- कारखान्यातील क्षारयुक्त, आम्लयुक्त पाणी, मातीत मिसळल्याने माती नापीक बनते.
- किरणोत्सारी पदार्थ व इतर प्रदूषक मृदेमधून पिके, पाणी व मानव अशा अन्नसाखळीतून प्रवास करतात.
- मृदा प्रदूषणामुळे जलप्रदूषणाचा धोका वाढतो. कारण विषारी द्रव्ये मृदेमधून जवळच्या पाणीसाठ्यात किंवा पाझरून भूगर्भजलात प्रवेश करतात, तसेच जीवजंतूमुळे विविध रोगांचा प्रसार होतोमृदा प्रदूषणाचा हवा तसेच जल प्रदूषण यांच्याशी असणारा संबंध
- कारखान्यातील क्षारयुक्त, आम्लयुक्त पाणी, मातीत मिसळल्याने माती नापीक बनते.
- किरणोत्सारी पदार्थ व इतर प्रदूषक मृदेमधून पिके, पाव मानव अशा अन्नसाखळीतून प्रवास करतात.
- मृदा प्रदूषणामुळे जलप्रदूषणाचा धोका वाढतो. कारण विषारी द्रव्ये मृदेमधून जवळच्या पाणीसाठ्यात किंवा पाझरून भूगर्भजलात प्रवेश करतात, तसेच जीवजंतूमुळे विविध रोगांचा प्रसार होतो .
ओल्या कचऱ्याचे खतात रूपांतर न करता चुकीच्या पद्धतीने तो फेकून दिल्यास तो तेथे सडतो, कुजतो, त्यामध्ये हानिकारक रोगजंतूंची वाढ होते व हे वाहत्या पाण्यात मिसळले जाऊन पाणी प्रदूषण होते.. शेतीसाठी कीटकनाशकांचा, रासायनिक खतांचा, तणनाशकांचा वापर केला जातो, त्यामुळे मृदा प्रदूषण होते. कीटकनाशक व तणनाशकांचा जास्त प्रमाणात केलेल्या त्या फवारणीमुळे ती रसायने हवेत मिसळतात व हवा प्रदूषण होते .
तसेच रासायनिक खतांचा वापर जास्त प्रमाणात केल्यास ही रसायने पाण्यात मिसळतात व पाणी प्रदूषण होते. मानवी मलमूत्र, पशु, पक्षी यांची विष्ठा मातीत मिसळल्यामुळे मृदा प्रदूषण होते. ही घाण तेथे तशीच राहिल्यास त्यातून वेगवेगळे वायू बाहेर पडतात व दुर्गंधी सुटते, हे वायू हवेत मिसळतात व हवा प्रदूषण होते. हीच घाण पाण्यात मिसळल्यास पाणी प्रदूषण होते
प्रदूषण प्रतिबंध व नियंत्रण प्रदूषण नियंत्रण, नियमन व ते रोखण्यासाठी भारत सरकारने काही कायदे केले आहेत
प्रदूषण नियंत्रणाची संबंधित कायदे पुढीलप्रमाणे आहेत.
- जल प्रदूषण (प्रतिबंध व नियंत्रण) अधिनियम 1974
- हवा प्रदूषण (प्रतिबंध व नियंत्रण) अधिनियम 1981
- पर्यावरण संरक्षण अधिनियम 1986
जैव वैद्यकीय कचरा, धोकादायक उत्सर्ग, घनकचरा, ध्वनी प्रदूषण नियंत्रण या सर्वांसाठी विविध कायदे व नियम अस्तित्वात आहे. कारखाने, औद्यागिक वसाहती, महानगरपालिका, जिल्हा परिषदा, पंचायत समित्या, ग्रामपंचायती इत्यादी संस्थांद्वारे वरील प्रदूषण नियंत्रणाची संबंधित कायदे यांचे पालन होत आहे की नाही यावर देखरेख ठेवण्याचे काम महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ व केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ या शासकीय संस्थांद्वारे केले जातात.
.
Comments
Post a Comment
Thank you to visit My blog