पर्यावरणावर होणारे विकासाचे परिणाम (Development Effects on Environments)
पर्यावरणावर होणारे विकासाचे परिणाम (Development Effects on Environments)
- पर्यावरण अर्थशास्त्राचा परिचय सांगुन भुमी धूप आणि प्रदुषन यावद्दल थोडक्यात माहीती सांगा.
किंवा
- जमिनीची दुर्दशा होण्यामागची कारणे काणती.. भूमी प्रदूषण म्हणजे काय ते सांगुण भूमी प्रदुषणाची कारणे सांगा ?
उत्तर :
पर्यावरण अर्थशास्त्र
(Introduction of the Environmental Economics) :
आज जगातील प्रत्येक व्यक्तीला आपला आर्थिक विकास झाला पाहिजे व आधुनिक तंत्रज्ञानाची फळे आपणास चाखावयास मिळाली पाहिजेत असे वाटत आहे. परंतु आर्थिक विकास आणि आधुनिक तंत्रज्ञान याचा पर्यावरणावर फार मोठा परिणाम होतो. म्हणून आर्थिक विकासासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करीत असताना त्याचा पर्यावरणावर विपरीत परिणाम होणार नाही याची देखील काळजी घेतली पाहिजे. मानवाच्या सर्वांगीण विकासासाठी पर्यावरणाचा समतोल राखणे फान महत्त्वाचे आहे. मानव आणि पर्यावरण यातील संबंध फार पुरातन स्वरूपाचे आहेत. मानवाला निसर्गता बुध्दीमत्ता, कल्पनाशक्ती, स्मरणशक्ती सारखे गुण प्राप्त झाल्यामुळे इतर सजीवांच्या तुलनेत मानवाचे पर्यावरणातील स्थान महत्त्वाचे आहे. मानवाने आपले जीवन आणि राहणीमान सुखकर होण्यासाठी निसर्गव्यवस्थेत अनेक बदल घडून आणले. त्या बदलांचा मानवाला फायदा देखील झाला. परंतु अशा बदलामुळे पर्यावरणाचा समतोल दिवसेंदिवस बिघडत चालला आहे व आर्थिक विकासास मारक ठरत आहे. सध्या अविकसित राष्ट्रापेक्षा विकसित राष्ट्रामध्ये अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. त्याचा त्या देशांच्या आर्थिक विकासावर प्रतिकुल परिणाम होऊ लागला आहे.
आर्थिक विकासासाठी नैसर्गिक साधनसंपत्तीचा जास्तीत जास्त वापर करणे आवश्यक आहे. परंतु मानवाकडून अशा साधणांचा वापर अवास्तव आणि अयोग्य पध्दतीने केला जात आहे. त्यामुळे काही साधनसंपत्तीचा तुटवडा निर्माण झाला आहे. असेच चालत राहिल्यास भविष्य काळात निश्चिातच नैसर्गिक साधनसंपत्ती संपुष्टात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. परिणामी साधनसंपत्तीची टंचाई भासून देशाच्या व मानवाच्या आर्थिक विकासाला खीळ बसण्याची अधिक भिती चाटत आहे. कारण जंगलापासून मानवाला पर्यायाने देशाला मोठ्या प्रमाणात उत्पन्न मिळते. परंतु विकासाच्या योजना राबविण्यासाठी मोठ्या प्रमाणावर जंगलतोड करून त्या जमिनीचा वापर केला जातो आहे. त्याचा देखील परिणाम स्थानिक हवामानावर झालेला आहे. हवामान प्रतिकुल बनत चालले आहे. त्याचा परिणाम. शेती, वनस्पती आणि वन्य प्राण्यावर होतो आहे. आर्थिक विकासाच्या योजनेचे लाभ दिसतात. परंतु जंगलाचा लाभ तेवढ्या स्पष्टपणे दिसत नाही. जंगल संपत्तीच्या नाशामुळे होणाऱ्या तोट्यास सामोरे जावे लागणार आहे. या दृष्टीकोनातून पर्यावरण आणि साधनसंपत्ती या प्रश्नांच्या बाबतीत भविष्य काळात अभियांत्रिकी प्रकल्पांच्या संदर्भात अधिक काळजी घ्यावी लागणार आहे.
भूमी धूप आणि प्रदूषण:
(Land Degradation and Pollution) :
मानवाने स्वतःच्या स्वार्थासाठी व निरंतर विकासासाठी निसर्गामध्ये हस्तक्षेप केला आणि त्याचाच परिणाम म्हणून निसर्गाचे समतोल दिवसेंदिवस ढासळत चालले आहे. म्हणून आज लोकांना पर्यावरण शिक्षण देणे ही आज काळाची गरज बनली आहे. मानवाला अनिर्बंध गरज व स्वार्थामुळे प्रदूषणासारख्या गंभीर समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. दूषित पदार्थामुळे जमिनीची उत्पादकता, कस, सुपिकता कमी होते, यालाच भूमी प्रदूषण असे म्हणतात.
भूमी प्रदुषण :
- "रासायनिक खताच्या अनिर्बंध वापरामुळे जमिनीची सुपिकता कमी होते व जमीन नापीक बनते, यालाच भूमी प्रदूषण असे म्हणतात."
- "कीटकनाशकाच्या जास्त वापरामुळे जमिनीची गुणवत्ता कमी होते व जमिनीचा कस कमी होतो यालाच भूमी प्रदूषण असे म्हणतात.
" भूमी प्रदूषणाची कारणे (Causes of Land Pollution) :
- रासायनिक खताचा वापर :- शेतकरी शेतीतील उत्पन्न वाढविण्यासाठी शेतीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात रासायनिक खताचा वापर करतात. त्यामुळे रासायनिक खताच्या अनिर्बंध वापरामुळे शेतीतील जमिनीचा कस कमी होतो. उत्पादकता कमी होते व जमीन नापीक बनते व त्यामुळे भूमी प्रदूषणाची समस्या निर्माण होते.
- जंगलतोंड:- आज मानवाने खूप मोठ्या प्रमाणात जंगलाची तोड केली आहे. त्यामुळे मानवाला वेगवेगळ्या समस्यांना आज सामोरे जावे लागत आहे. झाडांच्या मुळा जमिनीमध्ये खोलवर पसरलेली असतात. त्यामुळे झाडांची मुळे उतारावरील जमिनीला धरून ठेवण्याचे कार्य करत असतात. जंगलतोड झाल्यामुळे जमिनीचा आधार नाहीसा होतो. जमिनीचा कस नाहीसा होतो व भूमी प्रदूषण खूप मोठ्या प्रमाणात होते..
- अति जलसिंचन :- शेतीतील उत्पादन वाढविण्यासाठी शेतकरी लोक रासायनिक खताचा वापर तर करतात. परंतु शेतीतील उत्पादन वाढविण्यासाठी शेतकरी लोक खूप मोठ्या प्रमाणात अतिजलसिंचनकरतात. अतिजलसिंचन केल्यामुळे जमिनीवर त्याचा परिणाम होतो. म्हणजेच जमिनीची सुपिकता, उत्पादकता कमी होते व भूमी प्रदूषण घडून येते.
- कीटकनाशके:- पिकाला किड लागू नये म्हणून शेतकरी लोक पिकावर खूप मोठ्या प्रमाणात कीटकनाशकाची फवारणी करतात. अशा वेळी कीटकनाशके पिकांवर व वनस्पतीवर फवारली जातात. पावसाच्या पाण्याबरोबर जलाशयात व शेतीमध्ये वाहून जातात व त्यामुळे जमिनीची सुपिकता कमी होते व भूमी प्रदूषण घडून येते.
- लोकसंख्यावाढ:- सर्व समस्याचे एकमेव कारण म्हणजे लोकसंख्यावाढ होय. आज खूप मोठ्या प्रमाणात लोकसंख्यावाढ झाली आहे. त्यामुळे मानवाला वेगवेगळ्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. लोकसंख्या वाढल्यामुळे मानवाच्या गरजा वाढल्या आणि गरजा वाढल्यामुळे मानवाने निसर्गामध्ये हस्तक्षेप केला आणि निसर्गामध्ये हस्तक्षेप केल्यामुळे मानवाला प्रदूषणासारख्या गंभीर समस्येला तोंड द्यावे लागत आहे..
- पुराचे वाढते प्रमाण :- पूराचे प्रमाण वाढल्यामुळे कचरा प्रदूषणाचे प्रमाण वाढते. त्यामुळे जमिनीची सुपिकता नष्ट होते. जमीन नापीक बनते. तारेचे प्रमाण वाढून जमिनीची धूप होते.
- अतिचराई :- गायी, म्हशी, शेळ्या यांना रानात चरण्यासाठी सोडले जातात. त्यामुळे हे वरचे गवत खातात व ते जास्त प्रमाणात खातात अतिचराईमुळे जमिनीची सुपिकता कमी होते. परिणामी जमिनीचा हास होतो.
- शेती करण्याची अयोग्य पद्धती :- शेती अयोग्य पद्धतीने घेतली जाते. एकच पीक वारंवार घेतले जाते. एकाच शेतीत उलटून पालटून घेतले जात नाही. म्हणून जमीनीची धुप खूप मोठ्या प्रमाणात झालेली दिसून येते.
प्रश्न :- भूमी प्रदुषणामुळे होणारे परिणाम सांगा.
भूमी / भू-प्रदूषणा मुळे होणारे परिणाम : (Effects of Land Pollution) :
मानवी आरोग्यात विघाड:-
भूमी प्रदूषणामुळे मानवी आरोग्यात विधाह होते. मानवाला वेगवेगळे रोग निर्माण होतात. त्यामुळे मानवाच्या आरोग्यात विधाड होते. कारखान्यातून अनेक घातक पदार्थ पाण्यात सोडले जातात. त्यामुळे पाणी दूषित होऊन शरीर क्रियेत विधाड निर्माण होतो. त्यामुळे निरनिराळे रोग होण्याचा संभव असतो.
पिकाच्या वाढीवर परिणाम:- शेतकरी शेतातील उत्पादन वाढविण्यासाठी शेतकरी आपल्या शेतामध्ये वेगवेगळ्या रासायनिक खताचा, कीटकनाशकाचा वापर करतात. भूमिप्रदूषणामुळे पिकाच्या वाढीवर परिणाम होतो. भूमी प्रदूषणामुळे पिक जळतात. पिक वाढत नाही. पिकांची वाढ खुंटते असे विविध परिणाम होते.
उत्पादन क्षमतेवर परिणाम :- भूमी प्रदूषणामुळे पिकाच्या उत्पादन क्षमतेवर अतिशय प्रतिकुल असा परिणाम होतो. शेतीतील उत्पादनाचे प्रमाण घटते. जमीन नापीक बनते. शेतीतील कस कमी होते व परिणामी भूमी प्रदूषण घडून येते.
पर्यावरणाचा समतोल ढासळतो :- जमिनीतील धूपेथे प्रमाण वाढल्यामुळे पर्यावरणीय आपतीचे व पर्यावरणीय समस्याचे प्रमाण वाढते. एकंदरीत पर्यावरणाचा समतोल ढासळतो.
भूप्रदूषणाचे प्रमाण वाढते :- भूप्रदूषणाचे प्रमाण वाढल्यामुळे जमिनीचा कस कमी होतो. त्यामुळे घाणीचे साम्राज्य वाढते, घाणीचे साम्राज्य वाढल्यामुळे दुर्गधीचे साम्राज्य पसरते.
जमिनीचा कस कमी होतो :- शेतकरी शेतीतील उत्पादन वाढविण्यासाठी वेगवेगळ्या रासायनिक खताचा वापर करतात, त्यामुळे जमिनीचा कस कमी होतो. त्यामुळे शेतीतील उत्पादनात घट होते.
भूजल पातळी घसरते:- जमिनीची धूप दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे शेती व्यवसायावर खताचा वापर करतात, त्यामुळे जमिनीचा कस कमी होतो, त्यामुळे शेतीतील उत्पादनात घट होते.
अन्नधान्य विषयक समस्या :- जमिनीच्या भूपेमुळे शेतीतील उत्पादन घटते, शेतीतील उत्पादन घटल्यामुळे अवर्षण, कुपोषण, अन्नधान्याची टंचाई असे विविध गंभीर परिणाम होतात.
शेतीयोग्य जमीन नष्ट होते :- भूमी प्रदूषणामुळे शेतीतील उत्पादन कमी होते. भूमी प्रदुषणामुळे जमीन वापरण्यास नापीक बनते, जमीनीत शारद प्रमाण वाढते. जमीनीत क्षारांचे प्रमाण वाढल्यामुळे शेतीतील उत्पन्न कमी होते. त्यामुळे शेतीस उपयोगी पडणारी जमीन नष्ट होते.
- हवा, जल आणि सागरी प्रदुषण यावद्दल थोडक्यात माहिती सांगा. वायु प्रदुषणाचे कारणे व परिणाम सांगा.
उत्तर :
प्रदुषण म्हणजे काय?
हवा, जल आणि सागरी प्रदुषण (Air, Water & Marine Pollution)
- निसर्ग, मानव व अन्य प्राणी जीवन यांच्यातील समतोल बिघडणे म्हणजे प्रदुषण होय.
- कोणतीही सुसंघटित रचना बदलणे म्हणजे प्रदुषण होय.
वायू / हवा प्रदुषणाची व्याख्या :
जागतिक आरोग्य संघटना:- जेव्हा मानवाच्या विविध क्रिया प्रक्रियामुळे हवेत हवा प्रदुषणाचे केंद्रीकरण प्रचंड प्रमाणात वाढून त्यांचा मानवी आरोग्य, वनस्पती जीवन व मालमत्तेवर अतिशय अपायकारक परिणाम होतो. तेव्हा त्याला हवा प्रदुषण असे म्हणतात.
अमेरिकन वैद्यकीय संघटना
हवेत बाह्य घटकाचे अतिरिक्त केंद्रीकरण होऊन त्यांचा वैयक्तिक जीवनावर व मालमत्तेवर प्रतिकूल परिणाम होणे म्हणजे हवा प्रदुषण होय.
वायु प्रदुषणाचे कारणे (Causes of Air Pollution) :
वायू प्रदुषणाचे कारणे खालील प्रमाणे आहेत :
- हवेतील वाष्याचे अविष्कार :- हवेतील बाष्पाचे प्रमाण जास्त असल्यास अशी हवा मानवी आरोग्यास अपायकारक असते. दव, धुके यामुळे सुध्दा हवेतील बाष्पाचे प्रमाण वाढून प्रदुषण होते.
- कार्बन डायऑक्साईड वायुमुळे:- कार्बन डायऑक्साईड वायू शरीराला अतिशय घातक आहे. ह्या वायूमुळे सुध्दा हवा प्रदूषण घडून येते. वाहने,गाडी यांच्यातून हा वायू बाहेर पडतो व ह्या वायूचा हवेशी संपर्क येतो ववायूचे प्रदूषण घडून येते.
- तापमानाची विपरितता :- डोंगराळ भागातील दऱ्याखोऱ्यात सखोल प्रदेशात विपरीततेचे प्रमाण जास्त असते. डोगरमाथ्यावरील थंड हवा दरीत उतरल्यामुळे रात्रीमान मोठे असल्यास, हवा स्थित असल्यास, निरन आकाश, स्थिर असतांना तापमानाची विपरीतता घडून येते. धूर, धूळ, धुके, दीर्घकाळापर्यंत एका जागी राहून हवा प्रदूषण होते.
- कारखानदारी:- नागरी भागातून खूप मोठ्या प्रमाणावर कारखानदारीचे प्रमाण वाढत चालले आहे. कारखान्यातून कार्बन डायऑक्साईड, कार्बन मोकनाक्सॉईड सारखे विघातक वायू बाहेर पडतात व ह्या वायूचा हवेशी संपर्क येतो तेव्हा हवेचे प्रदूषण घडून येते.
- औद्योगिकरण :- आज खूप मोठ्या प्रमाणात औद्योगिक क्रांती झाली आहे. त्यामुळे आपल्याला वेगवेगळ्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. औद्योगिक क्रांतीनंतर गिरण्या, कारखान्यांची झपाटयाने वाढ होत आहे. कारखान्याच्या धुरापासून कार्बनचे कण, कार्बन मोनॉक्साईड हे वायू वातावरणात सोडले जातात व हवा प्रदूषण होते.
- वाढती लोकसंख्या :- वाढत्या लोकसंख्यामुळे लोकांच्या गरजा वाढल्या आहेत. लोकांच्या गरजा वाढल्यामुळे वेगवेगळ्या वाहनाचा, साधनांचा वापर करू लागला व प्रदूषण घडून येऊ लागले.
- कीटकनाशकाचा वापर :- शेतीतील उत्पादन वाढविण्यासाठी शेतकरी लोक वेगवेगळ्या राधनांचा, रासायनिक खताचा, कीटकनाशकाचा वापर करू लागले. ज्यावेळेस कीटकनाशक फवारले जाते. त्यावेळेस कीटकनाशकाचे कण हवेच्या संपर्कात येतात व हवा प्रदूषण घडून येते.
- धुम्रपान :- शहरी भागामध्ये आज खूप मोठ्या प्रमाणात धूम्रपानाचे प्रमाण वाढले आहे. ज्यावेळेस व्यक्ती धुम्रपान करतो. त्यावेळी धुम्रपानातून बाहेर पडणाऱ्या विषारी वायूचा हवेशी संपर्क येतो व हवा प्रदूषण घडून येतो.
- जंगलतोड:- आज खूप मोठ्या प्रमाणात जंगल तोडीचे प्रमाण वाढत आहे. मानवाने स्वतःच्या स्वार्थासाठी पर्यावरणामध्ये हस्तक्षेप केला आणि त्याचीच परिणती म्हणून मानवाला वेगवेगळ्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. जंगलतोड केल्यामुळे हवेला अडथळा निर्माण होत नाही. त्या हवेचा या कणाशी संपर्क होतो व हवा प्रदूषण घडून येते.
वायू प्रदूषणाचे परिणाम:
(Effects of air Pollution) :
- हवामानावरील परिणाम :- ओझोन हा वायू पृथ्वीचा संरक्षक थर आहे. हवा प्रदूषणामुळे ओझोने थराला छिद्रे पडतात. त्यामुळे ओझोनचा क्षय होतो. याचा परिणाम म्हणून पृथ्वीच्या पृष्टभागापर्यंत येणारे अतिनीत किरणाचे प्रमाण वाढले आहे. म्हणून पृथ्वीच्या तापमानात वाढ होत आहे.
- प्राणी जीवनावरील परिणाम :- रासायनिक प्रदूषणे, औद्योगिकीकरण, खतनाशके, आम्लपर्जन्य, धूळ यांमुळे पक्ष्याचे अस्तित्व धोक्यात आले आहे. आम्लपर्जन्य यामुळे पक्षांचे व वन्य प्राण्यांचे मृत्यु प्रमाण वाढले आहे. पक्ष्यांनी स्थलांतर केले आहे.
- पृथ्वीच्या तापमानात वाढ :- ओझोनचा क्षय झाल्यामुळे पृथ्वीचा संरक्षक थर नाहीसा झाला आहे. म्हणून सूर्यापासून येणारे अतिनीत किरणाचे प्रमाण वाढते आहे. अतिनील किरणांचे वाढत्या प्रमाणामुळे पृथ्वीच्या तापमानात वाढ होत आहे.
- श्वसनेंद्रियाचे गंभीर आजार:- हवेतील दुषित व विषारी वायूमुळे श्वसनद्रियांचे, घसा, नाक ह्या विविध विकाराचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे मानवाचे अस्तित्व धोक्यात आले आहे.
- हवेची दृश्यता कमी होणे:- हवेतील कणयुक्त प्रदूषके व धूर यांचे प्रमाण वाढल्यामुळे धुर व धुके मिळून धूरके निर्माण होते. जमिनीलगतच्या हवेत तापमानाचे व्यत्क्रमण झाल्यास धुरके दीर्घकाळ टिकते. त्यामुळे श्वसनेंद्रियांचे गंभीर आजार होतात व जीवित हानी होते.
जलप्रदूषणाची व्याख्या सांगुण जलप्रदूषणाचे परिणाम स्पष्ट करा.
उत्तर :
जलप्रदूषण (Water Pollution) :
ज्या प्रमाणे लोकसंख्या वाढत आहे. त्याच प्रमाणे जलप्रदूषणाचे प्रमाण देखील दिवसेंदिवस वाढत असलेले दिसून येत आहे. जल प्रदूषणाची समस्या ही अलिकडील काळात खूप मोठ्या प्रमाणात भेडसावत असलेली दिसून येत आहे.
या जल प्रदूषणामूळे मानवी जिवनावर परिणाम, पर्यावरणाचा समतोल भिगडत आहे. त्याच प्रमाणे जमीनीत क्षराचे प्रमाण वाढत आहे. आणि साथीचे रोग इत्यादी व परिणाम होत असलेले दिसून येत आहे.
जलप्रदूषणाची व्याख्या (Defination of Water Pollution) :
- "मानवाने पाण्याचा अयोग्य व अनिर्बंध वापर केल्यामुळे जी प्रदूषणाची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. त्याला जलप्रदूषण असे म्हणतात."
- "नैसर्गिकरित्या किंवा मानवनिर्मित घटकांमुळे पाण्याची पारदर्शकता, रंग, चव व आम्लता यात बदल झाल्यामुळे ते वापरण्यास निरुपयोगी बनते यालाच जलप्रदूषण असे म्हणतात."
- जलप्रदुषणाची कारणे (Causes of Water Pollution) :
- लोकसंख्यावाढ :- लोकसंख्यावाढ हे सर्व समस्याचे मूळ आहे असे आपल्याला म्हणावे लागेल. लोकसंख्यावाढीमुळे सर्वांच्या गरजा वाढल्या. गरजा वाढल्यामुळे वेगवेगळ्या समस्या निर्माण झाला.
- खनिज तेल गळती :- जगातील अधिकतर तेल शुध्दीकरण कारखाने समुद्रकिनाऱ्यावर आहेत. जवळच्या बंदरात तेलाची चढउतार होते व मोठमोठ्या तेल टाक्यामध्ये तेल साठविले जाते. टाक्या अपघातग्रस्त झाल्यास तसेच तेल शुध्दीकरण कारखान्यातील अपघातालुके समुद्रात तेल पडते, खनिज तेल गळतीमुळे जलप्रदूषण घडून येते.
- औष्णिक जलप्रदूषण :- जलविद्युत केंद्रामध्ये वीज निर्मितीसाठी पाणी वरून खाली सोडले जाते. पुढे हे पाणी नदींच्या प्रवाहात सोडले जाते. अशा प्रकारे पाण्याचे औष्णिक प्रदूषण होते. अनावश्यक व हानीकारक पाणवनस्पतीची वाढ होते. परिणामी प्रदूषण जलदगतीने होते.
- औद्योगिक सांडपाणी :- जवळपास सर्वच कारखान्याची निर्मिती नदीच्या काठी झालेली असते. कारखान्यातील सांडपाणी नद्यांच्या प्रवाहात सोडले जाते. त्यामुळे जलप्रदूषण घडून येते. कारखान्यातील रासायनिक पदार्थाने युक्त सांडपाणी नद्यांवाटे समुद्रात जाते. त्यामुळे जलप्रदूषण घडून येते. सांडपाण्यातून वेगवेगळी विषारी वायू सोडली जातात. त्यामुळे जलप्रदूषण निर्माण होते.
- मलमूत्र विसर्जन :- नद्यांमध्ये, तीर्थक्षेत्रामध्ये स्नान करण्याची प्रथा आहे. नदीमध्ये स्नान केल्यामुळे पापापासून मुक्तता होते असे भारतीयाची अंधश्रद्धा आहे. हजारोच्या लोकसंख्येने लोक स्नान करतात. कपडे धुतात व मलमूत्राचे विसर्जन करतात. त्यामुळे जलप्रदूषण घडून येते.
- कारखान्याचे वाढते प्रमाण :- अभियांत्रिकी उद्योग, कृत्रिम धागा व पॉलिथिन निर्मिती उद्योग, अवजड रसायन उद्योग यातील सांडपाण्यातून कॅल्शियम, शिसे, पारा, जस्त व सायनाईडसारखी विषारी द्रव्ये पाण्यात सोडली जातात व पाणी प्रदूषित होते.
जलप्रदूषणाचे परिणाम (Effects of Water Pollution) :
जलप्रदूषणाचे दुष्परिणाम अत्यंत गंभीर स्वरूपाचे असतात. प्रदूषित पाण्याच्या सेवनामुळे पचन संस्थेचे व चेता संस्थेचे विकार होतात. भारतामध्ये तर एकूण रूग्णांच्या सुमारे ६५ ते ७०% रुग्ण प्रदूषित पाण्याच्या सेवनामुळे आजारी पडतात. जलप्रदूषणाचे परिणाम पुढील प्रमाणे आहेत.
- मानवी जिवनावर परिणाम :- जलप्रदूषणाचा मानवी जीवनावर अतिशय दूरगामी परिणाम होतो. जलप्रदूषणामुळे पाणी दूषित होऊन शरीर क्रियेत बिघाड निर्माण होतो. निरनिराळे रोग उद्भवतात. कावीळ, विषमज्वर, कॉलरा, क्षय या रोगामुळे मृत्यूही येतो.
- पर्यावरणाचे संतुलन बिघडते :- आज दिवसेंदिवस पर्यावरणाचे संतुलन बिघत चालले आहे. जलप्रदूषणामुळे जलपरिसंस्था धोक्यात येते. त्यामुळे अप्रत्यक्षपणे पर्यावरणाचे संतुलन बिघडते.
- जलचर प्राण्याचा मृत्यु :- पाण्यात सेंद्रिय द्रव्ये कुजतात. त्यापासून सूक्ष्म जीवजंतूंना भरपूर अन्नाचा पुरवठा होतो. त्याची प्रचंड प्रमाणात वाढ झाल्याने प्राण्याला ऑक्सिजन भरपूर लागतो. मात्र जलचर प्राण्यांना ऑक्सिजन कमी पडल्याने मृत्युमुखी पडतात.
- शेतीचे उत्पादन कमी :- आज आपण पाहिले की बहुतांशी कारखाने नद्यांच्या ठिकाणीच आहेत. कारखान्यातून सोडलेली विषारी पदार्थ पाण्यात मिसळतात. या पाण्याचा उपयोग शेतीसाठी केल्यास जमिनीत क्षारांचे प्रमाण वाढून उत्पादन कमी होते.
- साथीचे रोग :- नदीमध्ये स्नान करणे हे भारतीय संस्कृतीमध्ये पुण्याचे लक्षण मानले जाते. म्हणून लाखो लोक नदीच्या ठिकाणी किंवा तीर्थक्षेत्री स्नान करण्यास जातात. कपडे धुतात, मलमूत्राचे विसर्जन त्याच ठिकाणी केले जाते. त्यामुळे पाणी प्रदूषित होते. काही नद्यांमध्ये जनावरेही धुतली जातात. त्यामुळे पाणी दूषित होऊन मानवाप्रमाणेच जनावरांनाही अनेक रोग होऊ शकतात.
- वनस्पतीर जीवनावर परिणाम :- वनस्पती जीवनावर जलप्रदूषणाचा अतिशय दूरगामी असा परिणाम होतो. जलप्रदूषणामुळे वनस्पतीची वाढ खुंटते, पाने, मुले खुंटतात. आम्ल पर्जन्यामुळे वनांचा नाश होतो. आम्लपावसाचे पाणी जलाशयात मिसळल्यामुळे पाणवनस्पती नष्ट होत आहेत. वनस्पतीची श्वसन छिद्रे बुजतात.
- प्राणी जीवनावर परिणाम :- जलप्रदूषणामुळे पशू, पक्षी, वन्य प्राणी यांच्यावरही अनिष्ट परिणाम होत आहे. रासायनिक प्रदूषके, कीटकनाशके, तृणनाशके आम्लपर्जन्य यामुळे पक्षांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. काही नद्यांमध्ये जनावरेही धुतली जातात. त्यामुळे पाणी प्रदूषित होऊन मानवाप्रमाणेच जनावरांनाही अनेक रोग होऊ शकतात. भारतात ६०% साथीचे रोग जलप्रदूषणामुळे होतात.
- जमिनीत क्षाराचे वाढते प्रमाण :- बहुतेक कारखाने नदीच्या किरानी भागात वसलेले दिसून येतात. कारखान्यातून सोडलेले विषारी पदार्थ पाण्यात मिसळतात. या पाण्याचा उपयोग शेतीसाठी केल्यास जमिनीत क्षारांचे प्रमाण वाढून उत्पादन कमी होते.
सागरी प्रदूषण म्हणजे काय ? व सागरी प्रदूषणाची कारणे व सागरी प्रदूषणामुळे होणारे परिणाम स्पष्ट करा.
उत्तर :
सागरी प्रदूषण (Marine Pollution) :
दिवसेंदिवस प्रमाणात सागरी प्रदूषणाचे प्रमाण वाढत असलेले आपणास दिसून येईल. त्यास अनेक घटक कारणीभूत आहेत. हवा प्रदूषण, जलप्रदूषण ध्वनीप्रदूषण, मृदा प्रदूषण, कचरा प्रदूषण, भूमी प्रदूषण ह्या प्रमाणे सागरी प्रदूषणाचा सुध्दा पर्यावरणाच्या दृष्टीने अतिशय नुकसानकारक व घातक समस्या आहे. सागरी प्रदूषण निर्माण होण्यास अनेक घटक कारणीभूत आहेत. त्यामध्ये कारखान्याचे वाढते प्रमाण, औद्योगिक सांडपाणी, सेंद्रीय पदार्थ रासायनिक खताचा वाढता वापर अशा एकना अनेक कारणामुळे सागर प्रदूषणाचे प्रमाण वाढत असलेले आपणास दिसून येईल. सागर प्रदूषणाचे प्रमाण वाढल्यामुळे जलचर प्राण्याचे अस्तित्व धोक्यात आले, माश्याचा, अन्नाचा प्रश्न, जलचर प्राण्याचे मृत्यूचे प्रमाण वाढले अशा एक ना अनेक गंभीर समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.
सागरी प्रदुषणाची कारणे (Causes of Marine Pollution) :
- पृथ्वीच्या तापमानात वाढ :- आज खूप मोठ्या प्रमाणात पृथ्वीच्या तापमानात वाढ होत असलेला आपणास दिसून येईल, त्यात अनेक घटक कारणीभूत आहेत. सूर्यापासून येणारी अतिनील किरणे, ओझनचा -हास व उष्णतेचे प्रमाण कायम राखले जाते. त्यामुळे सागरी प्रदूषण होते.
- शहराचे सांडपाणी :- मोठ्या प्रमाणात नागरीकरणाचे, औद्योगिकरणाचे प्रमाण वाढले आहे. शहरी भागातील घाण, केरकचरा, औद्योगिक सांडपाणी, कारखान्यातील घाण, अविघटनशील पदार्थ ज्यावेळेस समुद्राला जाऊन मिळतात त्यावेळेस सागरी प्रदूषणासारखी गंभीर समस्या निर्माण होते.
- कारखान्यातील सांडपाणी :- कारखाने बहुतांश नदीच्या काठी, समुद्राच्या काठी असलेले आपणास दिसून येतात. ज्यावेळेस औद्योगिक सांडपाणी, घाण, वेगवेगळे औषधाचे सांडपाणी ज्यावेळेस समुद्राला जाऊन मिळतात, त्यामुळे सांडपाणी घाण होते.
- टाकाऊ पदार्थ :- शहरातील सांडपाणी, औद्योगिक सांडपाणी. कारखान्यातील घाण, अविघटनशील पदार्थ, मैला व इतर टाकाऊ पदार्थ नद्याद्वारे, नाल्याद्वारे सागराला जाऊन मिळतात व सागर प्रदूषणात भर घालतात.
- रसायनयुक्त पाणी :- आज खूप मोठ्या प्रमाणात रासायनिक खते, कीटकनाशकते, दुग्धजन्य सांडपाणी, किरणोत्सर्गी कचरा, कपड्याच्या गिरण्यातील सांडपाणी, अन्न पदार्थाचे कण, औषधाच्या कारखान्यातील सांडपाणी हे विविध घटक सागराला येऊन मिळतात व सागर प्रदूषणाचे प्रमाण वाढते.
सागरी प्रदूषणामुळे होणारे परिणाम : (Effects of Marine Pollution) :
- पर्यावरणाचा समतोल ढासळतो:- आज दिवसेंदिवस प्रमाणात पर्यावरणाचे अस्तित्व धोक्यात येत चालले आहे. त्यात अनेक घटक जबाबदार आह प्रदूषणाचे प्रमाण वाढले, वनस्पतीचा -हास, जलप्रदूषणाचे प्रमाण वाढते, नाश्याचे अस्तित्व धोक्यात येते, अशा विविध गंभीर परिणामास तोंड द्यावे लागते.
- जलचर प्राण्याचा नाश :- सागरी प्रदूषणामुळे त्यांना पिण्यासाठी पाणी उपयुक्त होत नाही. त्यांच्या अन्नाचा प्रश्न निर्माण होतो. एकंदरीत पाहता जलचर प्राण्याचे अस्तित्व धोक्यात येते. परिणामी जलचर प्राण्याच्या मृत्यूचे प्रमाण वाढते.
- सागर परिसंस्थेचा समतोल बिघडतो:- सागरी प्रदूषणाचे प्रमाण वाढल्यामुळे वेगवेगळ्या समस्या निर्माण होतात. प्राथमिक अवस्थेत तेल गळतीमुळे सागर परिसंस्थेचा समतोल बिघडतो व तो नष्ट होण्याचा धोका निर्माण होतो.
- तापमान वाढणे :- वृक्षतोड, जंगलतोड, किरणोत्सर्गी प्रदूषण, ओष्णीक प्रदूषण ह्या विविध कारणामुळे तापमान वाढीचे प्रमाण वाढत आहे. तेलतवंगात लागलेल्या आगीमुळे विषारी वायूचे प्रमाण वाढते व परिणामी तापमान वाढीचे प्रमाण वाढून पर्यावरणाचा समतोल ढासळतो.
- मानवी आरोग्यात विघाड:- कीटकनाशके, खते, औद्योगिक सांडपाणी, डीडीटी, सारखे प्रदूषणे समुद्राला येऊन मिळतात. त्यावेळेत ते पाणी ज्यावेळेस मानवी शरीरात प्रवेश करतात, त्यावेळेस वेगवेगळ्या प्रकारच्या गंभीर आजाराला सामोरे जावे लागते, त्याचाच परिणाम म्हणून गुणसूत्रावर परिणाम, पोटदुखी, पटकी, कावीळ अशा गंभीर आजार मानवाला होतात. प्रसंगी मानव मृत्युमुखी होऊ शकतो.
- रोगराईचे प्रमाण वाढते:- सागरी प्रदूषणामुळे मानवाला, प्राण्यांना वेगवेगळ्या रोगांना सामोरे जावे लागते. पटकी, विषमज्वर कावीळ, रक्ताअभिसरण क्रियेवर परिणाम अशा विविध गंभीर समस्यांना सामोरे जावे लागते.
जैव विविधतेचा हास यावर माहिती लिहा.
किंवा
जैव विविधतेची व्याख्या सांगुण त्याची हासाची कारणे, अडथळे व समस्या स्पष्ट करा.
उत्तर :
जैव विविधतेचा हास (Loss of Bio Diversity)
आज मानवाने निसर्गामध्ये ढवळाढवळ करण्यास सुरूवात केली आणि त्यामुळे मानवाला वेगवेगळ्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. आज दिवसेंदिवस पर्यावरण ढासळत चालले आहे. प्रत्येक देशामध्ये आपल्याला जैविक विविधता वेगवेगळ्या स्वरूपाची दिसून येते. जैविक विविधतेचे संवर्धन करणे आज काळाची गरज बनली आहे. जैविक विविधतेचा जर हास होत चालला तर एक दिवस असा येईल की, ह्या पृथ्वीतलावर सर्व जाती नामशेष होतील आणि सर्वत्र ओसाडाचे साम्राज्य बनले. म्हणून व्यक्तीला, वनस्पतीला, प्राण्याला भावी जीवन सुखी, समाधानी करण्यासाठी जैविक विविधतेचे संवर्धन करणे ही आज गरज बनली आहे. म्हणून पर्यावरणाचा बिघडलेला समतोल नियंत्रित करण्यासाठी जैविक विविधतेचे संवर्धन करणे ही आज काळाची गरज बनली आहे.
जैव विविधतेच्या व्याख्या (Definitions of Biodiversity) :
- नैसर्गिक परिस्थितीचा व सभोवतालच्या पर्यावरणाचा अभ्यास करणाऱ्याला,जैव विविधता असे म्हणतात.
- पृथ्वीतलावरील सर्व सजीवांचा अभ्यास करणाऱ्याला जैव विविधता असे म्हणतात.
जैव विविधतेचे कारणे, हास, अडथळे, समस्या
(Loss of Bio-Diversity):
- वृक्षतोड : आज मानवाने जवळ जवळ निसर्गाची साथ सोडली आहे. असे म्हटले तरीही वावगे ठरू नये. मानवाने स्वतःच्या स्वार्थासाठी निसर्गामध्ये हस्तक्षेप केला आणि त्याचाच परिणाम म्हणून मानवाला वेगवेगळ्या समस्यांना आज तोंड द्यावे लागत आहे. वृक्षतोड केल्यामुळे पर्यावरण प्रदूषित होत आहे व परिणामी जैव विविधतेचा हास होतो.
- जंगलातील आगी :- जंगलामध्ये निसर्ग निर्मित व मानव निर्मित आगी लागतात. जळाऊ लाकूडतोड, शेतीचे आक्रमण ज्यावेळेस जंगलामध्ये आग लागते त्यावेळेस जंगलातील विविध वनस्पतीच्या जाती प्रजाती नष्ट होतात व जैव विविधतेचा हास घडून येतो.
- जंगलात वाढत चाललेले उद्योगधंदे :- आज दिवसेंदिवस उद्योगधंद्याचे प्रमाण वाढत आहे. जंगलामधून जास्तीत जास्त उत्पादन काढण्यासाठी जंगलामध्ये वेगवेगळे उद्योगधंदे विकसित झाले. जंगलात मुद्दाम लागलेल्या आगी, जळाऊ लाकूड व खूप मोठ्या प्रमाणात विकसित झालेले उद्योगधंदे यामुळे सुध्दा जैविक विविधतेचा -हास होतो..
- लोकसंख्यावाढ :- सर्व समस्यांचे मूळ कारण लोकसंख्या वाढ आहे. लोकसंख्या वाढल्यामुळे मानवाला वेगवेगळ्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे लोकांचा पर्यावरणावरील हस्तक्षेप वाढला आहे. त्यामुळे जैविक विविधतेचा -हास होतो.
- औद्योगिकीकरण :- आज खूप मोठ्या प्रमाणात औद्योगिकीकरणाचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे मानवाला वेगवेगळ्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. औद्योगिकीकरणामुळे प्रदूषण, पर्यावरणाचा हास, रोगराई, गलिच्छ वस्त्यांचे प्रमाण, हवा प्रदूषण, ध्वनिप्रदूषण अशा विविध समस्या निर्माण झाल्या. त्यामुळे जैविक विविधतेचा हास होत आहे.
- वाढते तापमान :- आज पृथ्वीवर तापमानाचे प्रमाण वाढत चालले आहे. याचे कारण वृक्षतोप, पर्यावरणाचा हास, ओझोनचा क्षय ह्या विविध कारणांमुळे तापमान वाढत चालले आहे. तापमानाचे प्रमाण वाढत चालल्यामुळे मानवाला वेगवेगळ्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.
- जलप्रदूषणाचे वाढते प्रमाण :- जलप्रदूषण निर्माण होण्यास अनेक घटक कारणीभूत आहेत. शहरीकरणाचे वाढते प्रमाण, रासायनिक खताचा वापर, कीटकनाशकाचा वापर, वृक्षतोड, कारखान्याचे वाढते प्रमाण ह्या विविध कारणांमुळे जलप्रदूषण घडून येते. जलप्रदूषणामुळे पर्यावरणाचे स्वास्थ्य बिघडते व मानवाला वेगवेगळ्या आपत्तींना तोंड द्यावे लागते. जलप्रदूषणाचे प्रमाण वाढल्यामुळे जैव विविधतेच्या हासाचे प्रमाण वाढत चालले आहे.
- ज्वलनशील इंधनाचा वापर :- आज दिवसेंदिवस वाहतूकीच्या संख्येमध्ये वाढ होत आहे. वाहतूकीच्या संख्येमध्ये वाढ होत असल्यामुळे मानवाला वेगवेगळ्या गंभीर समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. ज्वलनशील इंधनाच्या वापरामुळे जैविक विविधतेचा -हास होतो.
जैव विविधतेचा पर्यावरणावरील परिणाम स्पष्ट करा.
उत्तर :
जैव विविधतेचा पर्यावरणावरील परिणाम (Effact of Bio- Diverstiy):
- मानवी जीवनावर परिणाम :- जैव विविधतेचा मानवी जीवनावर अतिशय दुरगामी असा परिणाम होतो. जैव विविधतेच्या -हासामुळे मानवी जीवनातील स्वास्थ्याचे प्रमाण घटक चालले आहे. मानवी जीवनावर अतिशय विपरीत परिणाम होतो. आरोग्यामध्ये बिघाड, विविध रोगाचे साम्राज्य पसरले असे परिणाम मानवी जीवनावर जैव विविधतेमुळे होतात.
- पर्यावरणाचा न्हास :- पर्यावरणाचा हास दिवसेंदिवस वाढत चालला आहे. पर्यावरणाचा -हास होण्यास अनेक घटक कारणीभूत आहेत. जैव विविधतेच्या हासामुळे पर्यावरणावर परिणाम होतो व पर्यावरणाचा हास होण्यास कारणीभूत होतो.
- जमिनीत क्षारांचे प्रमाण वाढले :- दिवसेंदिवस पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे. त्याचे कारण मानवाचा निसर्गामधील हस्तक्षेप, त्यामुळे वेगवेगळ्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. जैव विविधतेच्या हासामुळे जमिनीत क्षारांचे प्रमाण वाढते व जमिन नापीक बनत चालली आहे.
- पृथ्वीच्या तापमानात वाढ :- दिवसेंदिवस पर्यावरणाचे संतुलन बिघडत चालले आहे. पर्यावरणाचे संतुलन बिघडण्यास अनेक घटक कारणीभूत आहेत. वृक्षतोडीच्या वाढत्या तोडीमुळे पृथ्वीच्या तापमानात वाढ होत आहे. जैविक विविधतेच्या हासामुळे मानवाला वेगवेगळ्या आपत्तींना सामोरे जावे लागत आहे.
- जलप्रदूषणाचे वाढते प्रमाण :- मानवाला आज वेगवेगळ्या समस्यांनी ग्रासले आहे. त्यामध्ये प्रदूषण ही एक अतिशय गंभीर अशी समस्या आहे. जैव विविधतेच्या हासामुळे दिवसेंदिवस जलप्रदूषणाचे परिणाम वाढत आहे. त्यामुळे मानवाला वेगवेगळ्या आपत्तींना सामोरे जावे लागत आहे. जलप्रदूषणाच्या वाढत्या प्रमाणामुळे कावीळ, पटकी, विषमज्वर, अॅलर्जी, कर्करोग यासारख्या गंभीर रोगाला सामोरे जावे लागत आहे.
- प्राणी जीवनावर परिणाम:- आज मानवाने स्वतःच्या स्वार्थासाठी पर्यावरणाचा हास करत आहे. प्राण्याचा न्हास, पर्यावरणाचा न्हास असे विविध प्रकारचे न्हास घडवून आणले. त्यामुळे मानवाला वेगवेगळ्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. प्राण्याचा वापर सौंदर्य प्रसाधनासाठी, खाण्यासाठी असे विविध प्रकारे प्राण्याचा वापर केला जातो. त्यमुळे प्राण्याच्या जाती नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. प्राण्याचा अवाजवी वापर केल्यामुळे प्राण्याचा हास होत आहे.
- रोगराईचे वाढते प्रमाण :- जैव विविधतेच्या हासामुळे प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या परिणाम होत आहेत. त्यामुळे मानवाला वेगवेगळ्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. कचरा, प्रदूषण, झोपडपट्टीची वाढ, लोकसंख्यावाढ, अस्वच्छतेचे वाढते प्रमाण ह्या विविध कारणांमुळे रोगराईचे प्रमाण वाढत चालले आहे. त्यामुळे वेगवेगळ्या रोगांना व्यक्तींना सामोरे जावे लागत आहे.
- शेती व्यवसायावरील परिणाम :- जैविक विविधतेच्या हासामुळे मानवाला वेगवेगळ्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. जैविक विविधतेच्या हासामुळे शेती व्यवसायावर परिणाम झाले आहेत. त्यामुळे शेतीतील पोत कमी होत चालली आहे. एकूणच पर्यावरणाचे स्वास्थ्य बिघडत चालले आहे.
- वाळवंटीकरणाचे वाढते प्रमाण :- आज दिवसेंदिवस वाळवंटीकरणाचे प्रमाण वाढत चालले आहे. त्याला कारण जंगलतोड, वृक्षतोड, औद्योगिकीकरण, नागरीकरण यांचे प्रचंड प्रमाण वाढत चालले आहे.. त्यामुळे वाळवंटीकरणाचे प्रमाण वाढत आहे. वाळवंटीकरणांचे प्रमाण वाढत चालल्यामुळे जैव विविधतेचा हास होत आहे.
- नैसर्गिक आपत्तीचे वाढते प्रमाण :- नैसर्गिक आपत्तीचे प्रमाण वाढत चालले आहे. नैसर्गिक आपत्तीला मानवाला प्रतिबंध करता येत नाही.
- पूर, महापूर, वादळे, ज्वालामुखी, अवर्षण, भूकंप यासारखे वेगवेगळे नैसर्गिक आपत्तीचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे मानवाला वेगवेगळ्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. नैसर्गिक आपत्तीच्या वाढत्या प्रमाणामुळे जैव विविधतेचा न्हास होत आहे.
Comments
Post a Comment
Thank you to visit My blog