ध्वनी प्रदूषण म्हणजे काय? त्याचे कारणे, परिणाम व उपाय
ध्वनी प्रदूषण म्हणजे काय? त्याचे कारणे, परिणाम व उपाय सांगा.
प्रस्तावना :-
हवा, पाणी, मृदा प्रदूषणाइतकीच ध्वनी प्रदूषण ही एक महत्त्वाची समस्या आहे. ध्वनी यंत्रातून निघणारे ध्वनी तरंग वातावरणात ध्वनी प्रदूषणाचे कारण बनतात, असे ध्वनीयुक्त वातावरण आरोग्यास हानीकारक असते ध्वनी प्रदूषण म्हणजे नको असलेला आवाज, मूल्यहीन अर्थ हीन ध्वनी नादमाधुर्याचा गुण नसलेला, कर्ण कर्कश, विसंवादी आवाज, निद्रानाशक, भीतीदायक संतापजनक, दुःखदायक, त्रासदायक, चित्तविचलीत करणारा," कामात अथडळा निर्माण करणारा उंच आवाज होय.
व्याख्या :-
- डॉ. रॉयबी :- "अईच्छापूर्ण ध्वनी जो मानवी सुविधा स्वास्थ व गतीशीलतेत हस्तक्षेप करतो त्यास ध्वनी प्रदूषण म्हणतात."
- सायमन्स आय.जी. :- "मूल्यहीन अथवा अनुपयोगी ध्वनी म्हणणे ध्वनी प्रदूषण होय
- "ध्वनी प्रदूषण म्हणजे अनावश्यक असुविधाजनक व निरर्थक आवाज होय.
ध्वनी प्रदूषणाची कारणे :-
१) वाहतूक साधने :- दोन चाकी, तीनचाकी, चार चाकी वाहनामुळे मोठ्या प्रमाणात ध्वनी प्रदूषण होते. या वाहतूक साधनाबरोबर विमाने व क्षेपणास्त्रे यांच्यामुळेही ध्वनीप्रदूषणा होते.
२) रात्रदिवस कारखान्यातून मशीनचा ध्वनी प्रदूषणास कारणीभूत असतो.
३) रेडीओ, टेप, व्हीडीओ, टी.व्ही, इत्यादी मनोरंजन साधनांमुळेही ध्वनी प्रदूषण होते.
४) मंदीर, मज्जीद, गुरुद्वारात स्पीकरवर पुजापाठ केला जातो तसेच सण समारंभात ध्वनीक्षेपकाचा वापर केल्याने ध्वनी प्रदूषण होते.
५) राजकीय कार्यक्रम, सभा, मिरवणूका, निवडणुका या काळात लाऊडस्पीकरचा वापर केला जातो. त्यामुळे ध्वनी प्रदूषण होते.
६) ढगांचा गडगडाट, सोसाट्याचा वारा सागरीलाटा, धबधबे, भूमीपात इत्यादीमुळे ही ध्वनी प्रदूषण होते.
७) कुत्र्यांचे भांडण, ओरडणे, बायकांचे नळावरील भांडण, बाजारातील मानवाचा आवाज, मुलांचे रडणे, शाळातील गोंधळ इत्यादीमुळे ध्वनी प्रदूषण होते.
ध्वनी प्रदूषणाचे परिणाम :-
- ध्वनी प्रदूषणामुळे श्रवणशक्तीवर परिणाम होऊन कायमचा बहीरेपणा येतो.
- तीव्र आवाजामुळे झोप येत नाही मानसीक स्वास्थ बिघडते त्यामुळे अपचन अनुत्साह येऊन कार्यक्षमता मंदावते.
- शरीरातील चयापचय क्रियेत बीघाड होऊन शारीरिक स्वास्थ बिघडते. अपचन अपश्वचन, अनियमीत रक्ताभिसरण होते.
- गर्भावर ध्वनी प्रदूषणाचा परिणाम जाणवतो त्याला अनेक व्याधी होतात.
- उद्योगातील कामगारांना सतत गोंगाटामुळे बहीरेपणा, रक्तदाब व हृदयविकार होतात.
- गोंगाटाचा लैंगिक क्षमतेवर ही परिणाम होतो.
- गोंगाटाने रक्तदाब वाढतो रोगप्रतीकारक शक्ती कमी होते. घामयेने, चक्कर येणे असी लक्षणे जाणवतात.
ध्वनी प्रदूषण नियंत्रण व उपाय :-
- जास्तं आवाज निर्माण करणोर उद्योगशहरापासून दूर असावेत.
- खराब वाहनांना गर्दीच्या ठिकाणी वस्तीत प्रवेश देवू नये.
- वाहणांना तीव्र आवाजाचे हॉर्न बसवण्यास बंदी घालावी.
- वाहनांची इंजनाची नियमित तपासणी करावी हलक्या दर्जाचे इंधन वापरु नये.
- तीव्र आवाजाच्या ठिकाणी ध्वनीरोधक उपकरणाचा वापर करावा बंदी घालावी.
- ध्वनी प्रदूषणासंदर्भात लोकात जनजागृती करावी.
- आठवडयातून एकदिवस तरी वाहने गजबजलेल्या ठिकाणी येण्यास
- रस्त्याच्या कडेने वृक्ष लागवड करुन ध्वनी मार्गात अडथळे निर्माण करावेत..
- वयक्तीक पातळीवर ध्वनी प्रदूषण रोखण्यासाठी कर्ण अच्छादने, आवाज संरक्षण उपकरणे वापरावीत.
Comments
Post a Comment
Thank you to visit My blog