मृदाप्रदूषणाची कारणे, परिणाम व उपाय
मृदाप्रदूषणाची कारणे, परिणाम व उपाय सांगा.
प्रस्तावना :-
मृदेची निर्मिती खडकाच्या झीजेतून होते मृदेत विविध प्रकारची खनिजे, क्षार, कार्बनीक पदार्थ, हवा व पाणी इत्यादीचे एक निश्चित प्रमाण असते. कांही कारणामुळे त्या प्रमाणात बदल होतो त्यास मृदाप्रदूषण असे म्हणतात. मृदा प्रदूषण जमीनीच्या अयोग्य नियोजनाचा परिणाम आहे. मृदा प्रदूषणाची कारणे :-
१) क्षरण क्रिया बाह्य शक्तीच्या करकांपासून क्षरण क्रिया होत असते. क्षरणास मातीचा शत्रू म्हणतात. मातीचा वरचा थर खनिजे व कार्बनिक पदार्थापासून बनलेला असतो याच थरात सूक्ष्म जीवजंतूचा विकास होतो बया थरातच मातीची उत्पादन क्षमता असते क्षरणामुळे ही माती वाहून जाते त्यामुळे नायट्रोजन फॉस्फरस, पोटॅशियमसारखी पोषकतत्वे वाहून नेली जातात.
२) वृक्षतोड :-
निसर्गातील प्रत्येक घटक एकमेकाशी संबंधीत असतो. निसर्गातील एखादा घटक कमी झालातर त्याचा अप्रत्यक्ष परिणाम इतर घटकावर होतो मातीचा सतत वापर केल्याने त्यातील जैविक सत्य कमी होतात. मातीत जैविक अजैविक घटकातील संतुलन बिघडते वनस्पती या त्यांच्या सडलेल्या पालापाचोल्याच्या साह्याने मातीला जैविक पुरवठा करतात वनस्पतीची तोड मोठ्या प्रमाणात होत असल्याने मातीस पोषक द्रव्यांचा पुरवठा होत नाही कालांतराने मृदा दूषीत बनते वनस्पतीच्या अनाच्छादनाने धूप ही मोठ्या प्रमाणात होते.
३) अतिजलसिंचन :-
कृषी उत्पादनासाठी जलसिंचनाची फार आवश्यकता असते. परंतु शेतीसाठी वरदान ठरणारी कांही ठिकाणी शापही ठरत आहे. अती जलसिंचनामुळे जमीनी खाऱ्या होत आहेत भूमीगत पाण्याच्या अतीउपशामुळे पाण्याची पातळी खालावत आहे.
४) सखोल शेतीमुळे मृदाप्रदूषण :-
मर्यादीत शेतीयोग्य जमीनीतून अमर्यादीत वाढणाऱ्या लोकसंख्येला अन्न पुरवठा करणे आवश्यक आहे म्हणून जगातील अनेक देशात सखोल शेती केली जाते. सखोल शेती करताना रासायनिक खतांचा वापर करुन उत्पादन घ्यावे लागते. अमर्यादीत रासायनिक खतांचा वापर जास्त उत्पादनासाठी अतिजलसिंचन, विविध तननाशक किटकनाशकांचा वापर केला जात असल्याने मृदा दूषीत होते.
५) रासायनिक खते व किटकनाशके :-
विविध प्रकारचे किटकनाशके जंतुनाशके तननाशके फवारली जातात. फवारताना हे औषध जमीनीवर पडते व झिरपून मातीत अनावश्यक तत्व मिसळतात. मृदा दूषीत बनते.
मृदाप्रदूषणाचे परिणाम :-
- विविध कीटकनाशकांचा व रासायनिक खतामुळे कालांतराने जमीनीची उत्पादन क्षमता कमी होऊन त्याचा पिकांच्या वाढीवर परिणाम होतो.
- मातीत मिसळलेले दुषीत पदार्थ वनस्पतीत पिकात साठतात अन्नसेवनाबरोबर ते अन्न साखळीत प्रवेश करतात त्याच प्राणी, पक्षी व मानवाच्या आरोग्यावर घातक परिणाम होतात. नष्ट
- जमीनीच्या खारेपणामुळे पाणी संचयामुळे शेतीयोग्य जमिनी
- क्षरणामुळे मातीतील पोषक द्रव्य नाहीशी होतात त्याचा परिणाम अन्न होतात. धान्य उत्पादनावर होतो.
मृदा प्रदूषणाचे नियंत्रण व उपाय :-
- पिकावर फवारल्या जाणाऱ्या औषधांचा वापर कमी करावा.
- रासायनिक खताऐवजी सेंद्रीय खताचा वापर करावा.
- खाऱ्या जमिनी सुधारण्यासाठी प्रयत्न करावेत.
- जलसिंचन व्यवस्थेत सुधारणा कराव्यात.
- शेती करत असताना वृक्षाची लागवड करावी वृक्ष तोड थांबवावी त्यामुळे मातीत ह्यूमसचे प्रमाण वाढण्यास मदत होईल.
- झूम शेती पद्धतीवर बंदी घालावी त्यामुळे जंगतोड होणार नाही व मातीची धूप होणार नाही.
Comments
Post a Comment
Thank you to visit My blog