आर्थिक विकासाचे निर्देशक घटक सांगा ( Indicators of Economic Development )
आर्थिक विकासाचे निर्देशक
उत्तर : एखाद्या देशाचा आर्थिक विकास होतो किंवा लक्षात नाही येण्याकरीता विकासाचे काही निर्देशक पटक सांगण्यात येतात . या घटकाच्या साह्याने आर्थिक विकासाचे मोजमाप करता येते . ते निर्देशक घटक पुढील प्रमाणे सांगता येतात .
१ ) राष्ट्रीय व दरडोई उत्पन्नात वाढ :
एखाद्या राष्ट्राच्या राष्ट्रीय उत्पन्नात वाढ होत असेल तर आर्थिक विकास होतो असे समजले जाते . कारण एकुण राष्ट्रीय उत्पन्नातील वाढीमुळे तेथील लोकांच्या क्रयशक्तीत वाढ होवून लोकांच्या गरजा पूर्ण होतात . तरी पण लोकसंख्येतील वाढीचा प्रभाव कळण्याकरिता ' दरडोई उत्पन्न ' हा अधिक चांगला निर्देशक आहे . दरडोई उत्पन्नात होणारी वाढ हे आर्थिक प्रगती मापणाचे उचित माप आहे . दरडोई उत्पन्नात जेवढी वाढ जास्त तेवढा आर्थिक विकास जास्त समजला जातो .
२ ) भांडवल निर्मितीचा दर :
आर्थिक विकासाच्या प्रक्रियेत भांडवल निर्मिती चालकाचे कार्य करते . म्हणून राष्ट्रीय उत्पन्नातून किती बचत होवू शकते व त्यातून किती गुंतवणूक होवू शकते यावर आर्थिक विकासाची संभाव्यता अवलंबून असते . जो देश जास्त गुंतवणूक करु शकतो तो अधिक आर्थिक विकास करु शकतो . म्हणून जास्तीत जास्त भांडवल निर्मितीवर भर दिला जातो .
३ ) राहणीमानाचा दर्जा :
समाजवादी विचारानुसार जीवनमान निर्देशांक हा आर्थिक विकासाची चांगली कल्पना देवू शकतो . कारण जीवनमानाचा दर्जा गरजा पूर्ण करण्याची क्षमता दर्शवितो . आर्थिक विकासाच्या सर्व कार्यक्रमाचे अंतिम उदिष्ठ हे जनतेला सुखी व समृद्ध जीवनाची प्राप्ती करु देते . म्हणून देशातील लोकांचा राहणीमानाच्या दर्जावरुन आर्थिक कितपत झाला हे समजते .
४ ) उत्पन्नाची वाढणी :
आर्थिक विकास होण्यासाठी देशातील उत्पन्नाची वाटणी समाजातील विविध स्तरामध्ये समान स्वरुपात होणे आवश्यक असते . कारण उत्पन्नाची वाटणी जेवढी विषम तेवढा आर्थिक विकास कमी
५ ) आर्थिक कल्याण :
आर्थिक कल्याण हा एक आर्थिक विकासाचा निर्देशांक घटक म्हणून ओळखला जातो . कारण आर्थिक क्रियांचा अंतिम उद्देश हा मानवी कल्याण साधने हा आहे . कल्याणकारी राज्याच्या संकल्पनेमुळे आर्थिक विकासाचे अंतिम ध्येय हे आर्थिक कल्याण आहे . थोडक्यात वरील निर्देशक घटकाच्या साह्याने एखाद्या राष्ट्रांनी किती आर्थिक विकास केला आहे . कोणता राष्ट्र आर्थिक विकासाच्या कोणत्या टप्यावर आहे . म्हणजेच एकंदर आर्थिक विकासाचे मोजमाप या निर्देशक घटकाच्या साह्याने केले जाते . या सर्व घटकांना आर्थिक विकासाचे निर्देशक घटक असे म्हणतात .
आर्थिक विकासाचे निर्देशक घटक |
Comments
Post a Comment
Thank you to visit My blog