Principles of Political Economy Information
माल्थसचा आर्थिक विकासाचा सिध्दांत 2
माल्थसचा आर्थिक विकासाचा सिद्धांत : -
सर थॉमस मालवस यांनी आपल्या ' Principles of Political Economy ' या १८२० मध्ये प्रकाशित केलेल्या ग्रंथाच्या दुसन्या खंडामध्ये देशाच्या आर्थिक विकासाची चर्चा केली आहे . पण यांनीही स्वतंत्र असा सिध्दांत मांडला नाही . त्यांचे आर्थिक विकासाचे विचार पुढील प्रमाणे सांगता येतात .
- आर्थिक विकास मालथसच्या मते कोणत्याही देशाचा आर्थिक विकास हा त्या देशातील संपत्ती व संपत्तीच्या वितरणावर अवलंबून असतो . ज्या देशामध्ये विपूल प्रमाणात साधनसंपत्ती आहे व तिचे समान न्यायीक स्वरुपात वितरण झाले आहे , अशा राष्ट्राचा आर्थिक विकास होतो . तसेच आर्थिक विकास हा आपोआप होत नाही तर तो विशेष प्रयत्न करून घडवून आणावा लागतो .
- आर्थिक विकास आणि भांडवल मालयस यांच्या मते भांडवल हा आर्थिक विकासाचा पाया किंवा मूलभूत घटक आहे . त्यामुळे अर्थव्यवस्थेत भांडवलाचे प्रमाण जास्त असेल . तर आर्थिक विकासाचा वेग जास्त असतो , अन्यथा नाही . तसेच अर्थव्यवस्थेत भांडवलाची निर्मिती ही फक्त भांडवलदार वर्गाकडूनच होते . श्रमिक वर्गाकडून भांडवल निर्मिती होत नाही . म्हणून कोणत्याही अर्थव्यवस्थेचा विकास हा त्या देशात असलेल्या भांडवलावर अवलंबून असतो .
- आर्थिक विकास आणि लोकसंख्या मालथस यांनी आर्थिक विकासाचा आणि लोकसंख्येचा संबंध स्पष्ट केला आहे . त्यांच्या मते सतत वाढत जाणारी लोकसंख्या देशाच्या आर्थिक विकासात अनेक अडचणी निर्माण करतात . त्यामुळे आर्थिक विकासाची गती मंदावते . हे त्यांच्या लोकसंख्येच्या सिध्दांतावरून स्पष्ट केले आहे .
- बचत व गुंतवणूक आर्थिक विकासाच्या प्रक्रियेत बचत व गुंतवणुकीला अधिक महत्व आहे . उत्पन्नातून उपभोग वजा जाता जी रक्कम शिल्लक राहते त्याला बचत म्हणतात . अशा बचतीची गुंतवणूक झाली तर उत्पादनात वाढ होते . म्हणजे उत्पन्न बचत गुंतवणूक यांच्या प्रमाणावर आर्थिक विकास अवलंबून असतो .
- भांडवलदार वर्ग व आर्थिक अरिष्ठ - मालथस यांनी विकासाचा दर घटण्यासाठी भांडवलदार वर्गाला जबाबदार धरले आहे . कारण भांडवलदार वर्ग जास्त नफा मिळविण्यासाठी अनेक मार्गाने मजूरांचे शोषण करतात व त्यातून नफा वाढवतात . हा नफा परत गुंतवणूक करतात . त्यामुळे अर्थव्यवस्थेतील उत्पादनात अतिरिक्त वाढ होवून वस्तूंचे साठे निर्माण होतात . ( कारण त्यांचा उपभोगावरील खर्च कमी असतो . ) त्यातून अर्थव्यवस्थेत मंदी येते व आर्थिक विकास मदावतो . थोडक्यात वरील प्रमाणे मालथस यांनी अर्थव्यवस्थेत तेजी मंदीचे चक्र कसे निर्माण होतात व आर्थिक विकासाची प्रक्रिया कशी कार्यान्वित होते हे आपल्या या विचारातून स्पष्ट केले आहे .
Comments
Post a Comment
Thank you to visit My blog