आर्थिक विकासाच्या मोजमापाच्या पद्धती
आर्थिक विकासाचे मोजमाप (measurement of economic development)
आर्थिक विकास ही एक मापनक्षम संकल्पना आहे. त्यामुळे आर्थिक विकासाचे मोजमाप करणे सहज शक्य आहे. त्यामुळे अनेक अर्थ तज्ञांनी आर्थिक विकासाचे मापन करण्याचे अनेक तंत्र शोधून काढले आहेत. त्याद्वारे कोणत्या राष्ट्रांनी किती विकास केला, कोणत्या भागात किती प्रमाणात विकास साधला, कोणते क्षेत्र विकासामध्ये मागे आहेत, कोणता देश विकासाच्या कोणत्या अवस्थेत आहे याचे मापन केले जाते. हे मापण खालील साधनांच्या किंवा निर्देशक यांच्या साहाय्याने केले जाते.
1) निव्वळ राष्ट्रीय उत्पन्न -net national income
'एकूण उत्पन्नातून घसारा खर्च वजा केले असता शिल्लक निव्वळ राष्ट्रीय उत्पन्न असे म्हणतात.'
आर्थिक विकासाचे मोजमाप करण्याचे अत्यंत उपयुक्त मापक म्हणून निवड राष्ट्रीय उत्पन्नाचा कडे पाहिले जाते. कारण एकूण उत्पन्न किंवा स्थूल उत्पन्नापेक्षा निव्वळ उत्पन्न हे अचूक माप आहे. याद्वारे वेगवेगळ्या देशांच्या राष्ट्रीय उत्पन्न करता येते. त्यावरून कोणता देश अधिक विकसित, कोणता देश मध्यम विकसित व कोणता देश अविकसित आहे हे ठरवता येते. म्हणजे ज्या राष्ट्राचे निव्वळ राष्ट्रीय उत्पन्न जास्त आहे व ते दीर्घकाळ सतत वाढतच आहे त्यांना विकसित समजले जाते. तर ज्यांचे निवड राष्ट्रीय उत्पन्न कमी आहे व ते घटक किंवा स्थिर आहे, ते मागास, अविकसित आहे, असे ठरवले जाते थोडक्यात निव्वळ राष्ट्रीय उत्पन्नाच्या मापं आवरून आर्थिक विकासाचे मोजमाप केले जाते.
2) दरडोई उत्पन्न- per capital income
'अर्थव्यवस्थेतील एकूण शुद्ध राष्ट्रीय उत्पन्नात देशातील एकूण लोकसंख्या ने भागले असता मिळणाऱ्या उत्पन्नाला दरडोई उत्पन्न म्हणतात. आर्थिक विकासाचे मोजमाप करण्यासाठी दरडोई उत्पन्नाचा वापर केला जातो.
निव्वळ राष्ट्रीय उत्पन्नामध्ये वाढ झाली म्हणजे आर्थिक विकास होतोच असे नाही. कारण निव्वळ राष्ट्रीय उत्पन्न वाढून सुद्धा बरीच जनता दारिद्य्ररेषेखाली असते. तसेच वाढत्या उत्पन्नाबरोबर देशाची लोकसंख्या वाढली तरी सुद्धा जनता गरीब असते. त्यामुळे दरडोई उत्पन्न हे खऱ्या अर्थाने विकासाचे मापक ठरू शकते. कारण व्यक्तीच्या दरडोई उत्पन्नात कशी वाढ होत जाईल तसतसे त्याचा उपभोग व राहणीमान यावरील खर्च वाढून जीवनमान उंचावेल. राहणीमानात सुधारणा होणे हेच आर्थिक विकासाचे लक्षण आहे. त्यामुळे दरडोई उत्पन्नाच्या साह्याने आर्थिक विकासाचे मोजमाप केले जाते.
3) आर्थिक कल्याण (economic welfare)
' अर्थशास्त्र हे बहुतेक कल्याणाची शास्त्र आहे.' त्यामुळे अर्थशास्त्रात कल्याणाला अतिशय महत्त्व आहे. डॉ. मार्शल यांच्यामते अर्थशास्त्राचा प्रमुख उद्देश पैसा, संपत्तीत वाढ करणे हा नसून मानवाच्या भौतिक कल्याणात वाढ करणे हा आहे. त्यामुळे संपत्ती, पैसा हे साध्य नसून साधन आहे.
देशातील लोकांच्या भौतिक सुख सोईमध्ये वाढ घडवून आणणे, त्याद्वारे लोकांचे जीवनमान उंचावणे म्हणजे आर्थिक विकास होय. थोडक्यात एखाद्या राष्ट्राचे राष्ट्रीय किंवा दरडोई उत्पन्न किती आहे, त्यापेक्षा त्या राष्ट्रात कल्याणाच्या कोणकोणत्या सुविधा आहेत हे महत्त्वाचे आहे. त्यामुळे मानवाचे अंतिम उद्देश पैसा नसून कल्याण आहे, आणि कल्याणाचे मोजमाप केले जाते आणि त्यावरून देशातील आर्थिक विकासाचा स्थर ठरविला जातो.
4) आर्थिक समता(economic equality)
आर्थिक समता याचा अर्थ राष्ट्रीय उत्पन्नाचे वाटप देशातील लोकांमध्ये सारख्या प्रमाणात होणे हा होय. कारण देशांमध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक विषमता असेल तर आर्थिक विकास कमी असतो. कारण देशातील मुठभर लोक श्रीमंत असतात व बरीच जनता गरिबीत राहते. त्यामुळे संपूर्ण अर्थव्यवस्थेचा समतोल, सर्वांगीण आर्थिक विकास घडवून आणण्यासाठी आर्थिक समता अधिक महत्त्वाची असते. म्हणजेच आर्थिक समता एक आर्थिक विकासाचे मोजमाप करण्याची माप आहे.
थोडक्यात वरील विवेचनावरून असे लक्षात येते की, आर्थिक विकासाची संकल्पना व्यापक असल्याकारणाने तिचे कोणत्याही एका साधनाच्या सहायाने चूक माफ करता येत नाही
नाही. तसेच काळाच्या ओघात आर्थिक विकासाचे अनेक नवनवीन साधने तयार केली जातात. म्हणून परिस्थितीनुसार वरील साधनांचा व नवीन साधनांचा एकत्रित वापर करून काळाच्या कसोटीवर आर्थिक विकासाचे मापन करावे.
Comments
Post a Comment
Thank you to visit My blog