मद्यपानाच्या समस्येचे स्वरूप (Problems of Alcoholism - Causes & Measures)
मद्यपानाच्या समस्येचे स्वरूप सांगा. (Problems of Alcoholism - Causes & Measures)
किंवा
मद्यपानाची संकल्पना सांगुन मद्यपानाचा इतिहास, प्रकार व वैशिष्ट्यांची चर्चा करा.
उत्तर :
प्रस्तावना :- मद्यपान केवळ व्यक्तिच्या जीवनाशी निगडीत समस्या नाही तर त्याचा संबंध व्यक्ती, कुटुंब व समाजाशी येतो. मद्यपानाचा आरोग्य, शरीरावर अपाय होतो. कौटुंबिक संघर्ष होतात. अपघाताचे प्रमाण वाढते. कामावरील गैरहजेरी वाढते. कुटुंबाचे विघटन होते. श्रमिक, गरीव वर्गातील मद्यपान आज जागतिक समस्या बनली आहे. त्यामुळे सामाजिक, नैतिक, आर्थिक अध:पतन होत आहे. मद्यपानाने दारिद्र्यात वाढ होते. मद्यपी योग्य-अयोग्य, बरे-वाईट ठरऊ शकत नाही. मद्यपानाने दारिद्र्य वाढते, मोठ्या प्रमाणात राष्ट्रीय संपत्तीची हानी होते. मद्यपानाची मुले आणि स्त्रियांचा विपरीत परिणाम होतो. मद्यपान विपथगामी वर्तन, सामाजिक व्याघी आहे. गरीब दुःख विसरण्यासाठी मद्यपान करतात. त्यामुळे ते उच्छंदी, चंचल, दिवाळखोर बनतात. मद्यपानाने गरीब गरीबच राहतो. मद्यपान युरोप, आफ्रिकन, अमेरिका, आशियायी देशाची समस्या आहे.
मद्यपानाचा इतिहास :
चीन, हिन्दू, ग्रीक, अॅसीरीयनांना मद्य तयार करणे माहित होते. ते मनोरंजनासाठी मद्य घेत. वैद्यक रोग्यासाठी मद्य वापरत. सैन्यास प्रेरीत करण्यासाठी तसेच राजे, सरदार नृत्यांगनांना प्रेरीत करण्यासाठी, कलाकार, कवी, कलावंत, लेखक मद्य पेय घेत. भारतात पुरातन काळात मदीरा सेवनाचा उल्लेख आहे. राजे, रजवाडे मद्यपान करीत. ब्रिटीश काळात मद्यपान खालच्या स्तरापर्यंत पोहचले. आर्य सोमरस घेत. सुरा तांदूळा पासून तयार करीत. स्मृतीत १२ प्रकारचे सोम (मद्य) सांगितली. ती अननस, द्राक्ष, मीरी, खजुर, ताड, ऊस, मोह, बेरी, अरक, नारळापासून तयार करीत. वेद व वेदोत्तर काळात मद्यपानाची उदाहरणे आहेत. परंतु सुत्र रामायण, महाभारत, शाकुंतल, कुमारसंभव, भगवत पुराणात मद्य निषेध केला आहे. पाच पापा पैकी एक पाप समजले आहे. ब्राह्मण, क्षत्रीय, वैश्यास मद्यपान निषिद्ध होते. मुस्लिम काळात अफू प्रचलित होती.
जहाँगीर २० कप मद्य घेत असे. राणी जहाँ आरा मद्य घेत होती व अनेक • अधिकारी मद्य घेत. हिदू राजे दिवाळी, होळी, दशहरा प्रसंगी कसुंवा (अफुपासून बनविलेला) घेत. ब्रिटीश काळात बार, रेस्टॉरंट मध्ये मद्य उपलब्ध झाले. आज जगात सर्वच देशात मद्यपानाचे प्रमाण वाढले आहे. अमेरिकेत ७६ टक्के लोक मद्यपान करतात. भारतात १५ ते २० टक्के लोक मद्यपान करतात. भारतात मद्यपची संख्या आणि मद्यपानाची सवय वाढत आहे. प्रामुख्याने देशी दारूचे प्रमाण वाढत आहे. मद्यात स्क्रॅच, व्हिस्की, वाईन, ब्रॅन्डी, रम, बोरबॉन यांचा समावेश होतो. मद्य केळी, फळे, बार्ली, गुळ, नवसागर, मोहा, तांदूळ, पाणी यांच्या मिश्रणाने तयार करतात. खेड्यात व आदिवासी दुर्गम भागात ओढ्याच्या काठी हातभट्या चालतात. सायकल ट्यूब, प्लॅस्टिक कॅन मध्ये शहरात नेतात. स्त्रीया आणि मुलेही दारू पुरवठा करतात.
मद्यपानाचा अर्थ व व्याख्या :
मद्यपान याचा सामान्य अर्थ दारू पिणे असा घेतला जातो. समाजशास्त्रीय दृष्टिकोणातून व्यक्तीला मद्याची जडलेली सवय किंवा व्याची म्हणून विचार केला जातो. जे व्यक्तीच्या जीवनाचे अविभाज्य अंग बनते. त्याला सतत नशेत राहावेसे वाटते. मद्यपान म्हणजे गुंगी आणणाऱ्या पदार्थाचे सेवन करणे, मद्यपान नैतिक सामाजिक बेजबाबदार पणाचे वर्तन आहे.
१) जागतिक आरोग्य समिती :-
मद्यपानाची सवय म्हणजे कृत्रीम, अगर नैसर्गिक मद्याच्या सेवनाने निर्माण झालेली तात्पुरती अगर कायमची अवस्था जी व्यक्तीला समाजाला अपकारक ठरते. या समितीच्या मताप्रमाणे मद्यपी मद्यपानाचा संपूर्णत: त्यावर अवलंबून असतात. अतिरिक्त मद्यपान करतात त्यांना मद्याविना अस्वस्थता वाटते.
2) जे.एल. गिलिन :-
मद्यपान अशी अवस्था आहे ज्यात मद्यपान करण्याची सदैव इच्छा असते. त्याचे व्यक्तीच्या शरीरावर, मनावर गंभीर स्वरूपाचे परिणाम होतात. ३) ट्रॉटर :- मद्यपान वैद्यकीय भाषेत सांगायचे झाले तर हा एक आजार आहे. जो शारीरिक क्रिया, आरोग्याची कार्ये बंद करतो.
४) के. मिश्रा :
मद्यपान व्यक्तीची अशी स्थिती आहे की तो त्याच्या सवयीवर प्रतिबंध घालू शकत नाही, मद्या विना राहू शकत नाही.
मद्यपानाचे स्वरूप, प्रक्रिया, वैशिष्ट्ये :
- मद्यपान म्हणजे मद्यप्राशन करण्याची व्यक्तीला जडलेली सवय
- अशा व्यक्तीची अवस्था ज्यामध्ये मद्यपान करण्याची इच्छा प्रबळ बनते.
- मद्यपान ही प्रक्रिया आहे. सातत्याने व्यक्ती मद्यपान करीत असतील तर मद्यपानाची सवय जडते.
- मद्यपानाची मात्रा कमी न होता सतत वाढत जाते. मद्यपी मद्यपानाच्या अनेक अवस्थातून संक्रमीत होतो.
- मद्यपानाची सवय लागलेल्या व्यक्तीस मद्यपान करण्याची तिव्र इच्छा त्याची मानसिक अवस्था पराकोटीला पोहचते. कोणत्याही मार्गाने मद्यपान करण्याच्या इच्छेने त्याच्या शरीराचा, मनाचा कब्जा घेतला असतो.
- मद्यप्यास मद्यपाना विना चैन पडत नाही कैफ चढत नाही.
- मद्यप्याचे शारीरिक, मानसिक स्वास्थ्य मद्यपानाशी जखडलेले असते. मद्य घेतल्याविना त्याचे शारीरिक, मानसिक व्यवहार सुरू होत नाहीत.
- मद्यपानाचा हेतू शरीर बधीर करणे, गुंगी आणणे असतो. आनंद व दुःखाच्या प्रसंगी मद्यपान करतो नंतर त्याला मद्य प्राशन करते.
मद्यप्यांचे प्रकार किंवा मद्यपानाचे स्वरूप :
- प्रासंगिक मद्यपान करणारे :- क्वचित प्रसंगी सण, उत्सवात किंवा पाहूणे म्हणून गेले तर मद्यपान करतात. अधूनमधून क्वचित मद्य घेतात. हे वारंवार किंवा सातत्याने मद्य घेत नाहीत.
- संयत, नियंत्रित मद्यपान :- ही मद्यपानाची प्रारंभीच प्रक्रिया आहे. मद्यप्याचे मध्याच्या प्रमाणावर त्याच्या शारिरीक, मानसिक हालचाली करण्यावर नियंत्रण असते.
- नियंत्रित मद्यपान :- व्यक्तीचे त्याच्या शारीरिक, मानसिक हालचालीवर नियंत्रण असते. तो मद्याच्या आहारी जातो. मद्याचे प्रमाण वाढते.
- मध्यम :- महिण्यातून तीन चारवेळा किंवा आठवड्यातून एक वेळा मद्यपान करतात. मजूर रोजगारीच्या हप्त्याच्या दिवशी, नोकरदार सुट्टीच्या दिवशी, ग्रामीण भागातील आठवडी बाजाराच्या दिवशी गद्य घेतात.
- अतिरिक्त किंवा अनियंत्रित मद्यपान ही मद्यपानाच्या प्रक्रियेतील अंतीम अवस्था आहे. दिवसातून अनेक वेळा मद्य घेतात. त्यांचे पिण्याचे प्रमाण वाढलेले असते. तो सतत मद्याच्या गुंगीत असतो. तो शारीरिक, मानसिक नियंत्रण हरवून बसलेला असतो. अशा प्रकारे मद्यपानाच्या प्रक्रियेतील अवस्थात, मद्यप्याचे
- चोरून लपून मद्यपान करणारे
- क्वचीत प्रसंगी
- सामाजिक प्रसंगी मद्यपान करणारे, वाढत्या प्रमाणात मद्यपान करणारे. मद्यप्याच्या शारिरिक मानसिक
अवस्था :
- मद्यपानाचा प्रारंभ केला की व्यक्तीच्या मानसिक जीवनावर परिणाम होतो. विचार, निर्णय शक्ती कमी होते.
- मद्यपानाचे प्रमाण वाढल्याने उत्तेजीत होतो, भावनावश होतो, मनावरील ताबा कमी होतो.
- मद्याचे प्रमाण वाढल्याने अडखळत बोलतो, चालताना त्याचा तोल
- सतत नशेत, गुंगीत असल्याने शारीरिक, मानसिक क्रियात शिथीलता जातो. येते. मृत्यू येतो.
- सातत्याच्या मद्यपानामुळे बेशुद्ध पडतो. त्यास विकार जडतात त्यास
समस्यावर तोडगा म्हणून आजारामुळे तणाव घालविण्यासाठी झोप येण्यासाठी वैयक्तिक समस्या सोडविण्यासाठी मद्य घेतात.
मद्यपानाचे प्रकार :
- पाणी, तांदुळ, गुळ, मोह, ताड, द्राक्षी, तुरटी, निरा, शिंदी, संत्री यापासून तयार केलेली दारू तसेच मळी पासून देशी दारू, छानछून व तत्समपेयी
- खाऊन गुंगी येणारे पदार्थत अफू, गांज्या, तंबाखू ओढणे, चीलीम, अफू, गांजा, हेरॉईन, ब्राऊनशुगर गावठी झुडुपे व पाणापासून तयार केलेले पदार्थ, अशा प्रकारे मद्यपानाचे संकल्पना व स्वरूप स्पष्ट करता येते.
प्रश्न ६ :- मद्यपानाची कारणे सांगा. (Problems of Alcoholism- Causes)
किंवा
मद्यपान कोणत्या कारणांनी केले जाते यावर प्रकाश टाका.
उत्तर :
प्रस्तावना :- मद्यपानास कोणती कारणे जबाबदार आहेत याची मिमांसा एलिएट व मेरील, केल्टीन, बोंजर जेनेटे यांनी केली आहे. कॅल्टीनने दु:खी जीवन, व्यवसायात्मक घटक, मनोरंजन, मित्रासोबत, कंपनी, व्यापारी कारणे सांगितली. स्टरलिंगने व्यवसायात्मक घटक अज्ञान, फॅशन, आंतरिक व्याकुळता, बोजरने निकृष्ट निवास, दुःख, अज्ञान, मनोरंजनाचा अभाव, जॉनेटने सामाजिक अपरिपक्वता, जॉनेट, कॅन्टीन बोंजनुसार खालील कारणे सांगता येतात.
१) मद्यपानाबाबत अज्ञान किंवा गैरसमज :
बोंजरने अज्ञान हे मद्यपानाचे कारण सांगितले आहे. काही सुशिक्षित, अशिक्षित लोकांना असे वाटते की, मद्यपानाने शारीरिक, मानसिक थकवा जातो. अज्ञानामुळे हमाल, मजूर, ड्रायव्हर मद्यपान करतात. त्यांना वाटते की मद्यपान केले की भरपूर शक्ती येते, श्रमपरिहार होतो, ऊमेद वाढते, साहस वाढते, अन्नाचे पचन होते, बुद्धी तल्लख होते, उच्च मद्ये घेतले की प्रतिष्ठा वाढते. शिनलेल्या देहाला मद्यपान केले पाहिजे. थोडेसे मद्यपान केले तर यात काहीच गैर नाही. या गैरसमजुतीतून मद्य घेतात. रोगावर रामबाण उपाय, बुद्धीला चालना देतो.
२) दुःखमय जीवन :
काही व्यक्तीच्या जीवनात दारूण निराशा, दुःखाला तोंड द्यावे लागते. दुःख सहन करण्याचे त्यांचे अंगी सामर्थ्य नसते. आपले दुःख विसरण्यासाठी मद्यपान करतात आणि मधाच्या गुंगीत जीवनातील दुःख, निराशा विसरतात. प्रौढ व्यक्तींचे निधन, बेकारी, व्यापार चक्रे (मंदी) सध्यात, बेटींग, रेसमध्ये होणारे नुकसान, किंवा चित्रपट फ्लॉप झाल्याने निणारे दिवाळे यामुळेही मद्यास जवळ करतात. घटस्फोट, कुटुंबातील अशांतता हे सुद्धा मद्यपानास कारणीभूत आहे.
३) अंधश्रद्धा (ईश्वरी देणगी/शाम) :
काही व्यक्तीची अशी श्रद्धा असते की परमेश्वराने पेय उपलब्ध करून दिले आहे त्याचा उपभोग घेतला पाहिजे. ईश्वराने पृथ्वीवर द्राक्षे, फळे निर्माण केली त्याचा उपभोग घेतला पाहिजे. मानवाच्या हातून काही पाप घडले पाहिजे किंवा गतजन्मात आपल्या हातून घडलेल्या पापाचे फळ म्हणजे मद्यपान करावे.
४) मैत्री/गंमत/फॅशन :
काहीतरी नवीन अनुभव घेणे या उद्देशाने व्यक्ती प्रथम मद्य घेण्यास प्रारंभ करतो. गंमत, मजा, चैन, भोजन, सहल, क्रिडा, कवन, विवाह प्रसंग अशा ठिकाणी व्यक्ती दुसऱ्याच्या आग्रहास्तव मद्यपान करतात. कंपनी म्हणून मैत्री जोडण्यासाठी मद्यपान करतात. अलिकडे उच्चभु वर्गात मद्य घेणे हे प्रतिष्ठेचे लक्षण समजले जाते. फॅशन म्हणून मद्याच्या पार्चा दिल्या जातात. चारचौघे एकत्र आले की कार्यक्रमाची सुरूवात आणि सांगता मद्याने होते. भारतीयांनी पाश्चात्याचे अनुकरण केले. महाविद्यालयातील विद्यार्थी, कर्मचारी वर्ग, उच्च व मध्यम वर्गात मद्यपान ही फॅशन झाली आहे. तसेच टी.व्ही. वृत्तपत्रे, मासिके आणि मनोरंजके साहित्य मद्याची जाहिरात करतात.
५) व्यवसाय / व्यापार :
काही व्यवसायिक, व्यापारी संपर्क वाढविण्यासाठी व्यापारी सौदे, खरेदी, विक्रीचे व्यवहारासाठी व्यापारात, व्यवहारात यशस्वी होण्यासाठी मद्याची पार्टी देतात. भ्रष्टाचारी मार्गातून उत्पन्न मिळविणारे मद्यपी होतात. तसेच काही व्यवसाय करणारे लवकर थकतात. उदा. यंत्राच्या सानिध्यात असणारे, हमाल, रिक्षा • ओढणारे, मिल मजूर, ड्रायव्हर थकवा घालविण्यासाठी मद्यपान करतात. ६) दारिद्र्य आणि बेकारी :
भारतात कनिष्ठ स्तरात, कनिष्ठ जातीत दारिद्र्य हेच मद्यपानाचे कारण आहे. दारिद्र्यामुळे मूलभूत गरजांची पूर्तता होत नाही. दैनंदिन जीवनात तणाव, संघर्ष निर्माण होतो. त्यातून मुक्तता मिळावी म्हणून मद्यप्राशन करतात तसेच अल्प, अनियमित वेतन असणाऱ्यांचा उदरनिर्वाह होत नाही. पुरेसे अन्न मिळत नाही, भुकेच्या वेदना कमी करण्यासाठी, शरीराच्या वेदना कमी व्हाव्या म्हणून मद्यपान करतात किवा मूला वाळाच्या हालअपेष्टा, भूकेच्या वेदना पाहिल्या जात नाहीत त्या विसरण्यासाठी मद्य घेतात. बेकारीने ग्रासलेल्या व्यक्ती उदासिनता घालविण्यासाठी प्रामुख्याने सुशिक्षित बेकार मद्याचा आश्रय घेतात.
७) अपूरा निवास, मनोरंजनाच्या साधनाचा अभाव :
कित्येक लोक अशा घरात राहतात तेथे घाण, कोंदटपणा, अंधार असते, पुरेसा सुर्यप्रकाश, शुद्ध प्रथा नसते. तसेच मनोरंजनाच्या योग्य साधना अभावी शारीरिक थकवा घालविण्यासाठी मद्यपान करतात. झोपडपट्या आणि कनिष्ठ स्तरात मनोरंजना अभावीलोक मद्याकडे वळतात. कौटुंबिक सोख्याअभावी मद्यपान करतात.
८) मानसिक व्याकुळता, अनुवंशिक दोष :
मद्याची सवय जडण्याचे प्रमुख कारण व्यक्तीने स्वतःवरील नियंत्रण घालवून बसणे होय. आजार, जवळच्या व्यक्तीचा अचानक मृत्यू, जीवनातील संकटे निवारण करण्यास अपयशी ठरलेले व्यक्ती मद्यपान करतात. नशेत आपली निराशा, दुःख विसरतात.
काही लोकात मज्जातंतुच्या वेदना हा अनुवंशिक दोष असतो. त्यांना मद्यपान अपरिहार्य आहे. अशा व्यक्ती जन्मजात मद्यपी असतात कारण त्या जीवनातील वास्तवास सामोरे जाऊ शकत नाहीत.
९) औषध म्हणून वापर :
मादक पदार्थाचा वापर सुरूवातीला औषध म्हणून केला जातो. काही असाध्य रोगाच्या वेदना कमी करण्यासाठी मद्य घेतात त्यातून सवय जडते.
१०) जीवनात अचानक होणारे बदल :
कित्येक वेळा व्यवसायात अकस्मात यश मिळते. आर्थिक, भौतिक पातळीत होणारे बदल, जीवनात येणारी वादळे, संघर्ष, प्रेम विफल होणे, पती पत्नीतील बेबनाव, तर काही व्यक्ती उदा. डॉक्टर्स, इंजिनिअर्स, वकील जीवनमान टिकविण्यासाठी मद्यपान करतात. पाश्चात्य देशात थंड हवामानामुळे मद्यपान करतात.
११) सामाजिक प्रथा, अंधश्रद्धा :
आदिवासी व काही जाती जमातीच्या देवदेवतांना मद्याचा नैवद्य देतात. भटक्या जाती जमातीच्या यात्रेत देवाच्या नावाने मद्य घेतात. काही जाती-जमाती मद्य घेवून मृताचा दुखवटा व्यक्त करतात. जन्म, मृत्यू, विवाह ह्या सुख, दुःख प्रसंगात मद्यपान करतात. मूल जन्माला की मद्याची पार्टी देतात. धार्मिक सण, उत्सव प्रसंगी मद्यपान करतात. मद्यपान न केल्यास मृताचा आत्मा शांत होणार नाही, देव देवतांचा कोप होईल म्हणून भारतीय मद्यपान करतात. त्यातून मद्यपानाची सवय जडते. तसेच वृद्धावस्था, चंगळ वादी वृत्ती, सामाजिक अपुरेपणा, अपसमायोजन, पर्यावरण, सामाजिक प्रथा इत्यादी.
१२) औद्योगिकरण, नागरीकरण :
औद्योगिकरण, नागरीकरणाने बहुजीनसी समाज बनतो. व्यक्तिवाद नियंत्रणाच्या अभावाने मद्यपानाचे प्रमाण वाढते. शहरातील चंगळवादी संस्कृती शहरीकण, औद्योगिकरणातून निर्माण होणाऱ्या बकाल वस्त्या, वाढते ताण तणाव, दहवादी भौतिक दृष्टिकोण, वेश्यागिरी, अपराध, निराध, दुवळेपणा, वृद्धावस्था, एकाकी जवीन, प्रतिष्ठा, सत्कार इत्यादी मद्यपानाची कारणे आहेत. अशा प्रकारे मद्यपानाची कारणे सांगता येतात.
प्रश्न ७ :- मद्यपानाचे सामाजिक दुष्परिणाम स्पष्ट करा.
मद्यपानाचे कोणते परिणाम सामाजिक जिवनावर होतात यावर प्रकाश टाका ?
उत्तर :
प्रस्तावना :- भारतात आर्याच्या संपर्काने मद्यपानाचा प्रसार झाला. परदेशी व्यचापारी आणि आक्रमण करणाऱ्यांनी सुगंधी द्रव्ये आणी. ९ व्या शतकात अफू, चरस, गांजा खुल्या बाजारात उपलब्ध झाले. मुस्लिम काळात • मेद्यपान प्रतिष्ठेचे झाले. भारतात मद्यपान करणाऱ्यांची प्रवृत्ती दिवसेंदिवस वाढत आहे. एकूण लोकसंख्येपैकी १६ टक्के लोक मद्यपान करतात. राज्य कल्याण व राज्य सभेच्या अहवालानुसार दिल्लीत १९८२ ते १९८८ मध्ये देशी दारूचे प्रमाण ८८.६९ टक्के वाढले आहे. १९८७-८८ मध्ये १६८.८२ हजार देशी दारूच्या बाटल्या विकल्या. बिअरच्या १२६.४७ बाटल्या विकल्या. गुजराथ मध्ये ९०० कोटी रूपयाचा दारूचा व्यापार होतो. आंध्र मध्ये ७०० कोटी इतका अबकारी कर मिळतो. मद्यपी इतरास उपद्रव करतात. मद्यपानाने सामाजिक वातावरण दूषित होते. वैयक्तिक, कौटुंबिक सामुदायिक विघटन होते. त्याचे परिणाम समाजावर होतात. त्यामुळे समाजाचे अधःपतन होते. मद्यपानाने खुन, आत्महत्या, चोरीस प्रोत्साहन मिळते. आरोग्य खालावते, त्याने दारू शरीर व आत्माही नष्ट करते. दारूकडे धाव घेणे म्हणजे वाघाच्या जबड्यात जाणे, चगधगत्या भट्टीत झेप घेणे. महापूर आलेल्या नात्यात झेप घेणे होय.
मद्यपानाची सुरूवात एका प्रायोगिक घुटक्याने होते. मनावर आलेल्या दडपणापासून मुक्त करण्यासाठी मद्यपान केले जाते. पुन्हा पुन्हा अनुभव घ्यावासा वाटतो. मनाला चेतविण्यासाठी मद्य घेतात. कुमारप्पा म्हणतात, अनैतिकता, खून, चोरी, नैतिक, बौद्धिक अध:पतन, कौटुंबिक कलह इत्यादी मद्यपानाचे दुष्परिणाम होत. पंडीत नेहरू म्हणतात देशात मद्यपान फैलावत आहे हे देशाचे दुर्देव आहे. मद्यपानाचे खालील दुष्परिणाम सांगता येतात.
१) शारीरिक दुष्परिणाम :
मद्यपानाचा शरीर, यकृत, मेंदू, जठर, आतडे, मज्जातंतू, रक्त घटक आणि स्त्रीच्या गर्भाशयावर विपरीत परिणाम होतो. प्रतिकारशक्ती कमी होते. नेत्रदोष, क्षय, डोके दुखी, हृदयरोग बळावते, पचनशक्ती, रोग प्रतिकारकशक्ती कमी होते, दृष्टी अघू होते, मेंदूची कार्यशक्ती आणि नियंत्रण कमी होते. मद्य पोटात गेले की रक्तात मिसळते. त्याचा १८ तास अंमल असतो. त्याची विचारशक्ती, निर्णयशक्ती कमी होते. तो भ्रमीष्ठ, संशयी, चिडखोर बनतो. शरीर आणि मनावरील ताबा सुटतो, तोल जातो, मद्यपी कोठेही झिंगून पडतो, अतीमद्यप्राशन केल्याने अपघाती मृत्यू होतो, मृत्यू ओढवतो, औद्योगिक अपघात होतात, वाहनावरील ताबा सुटतो, अल्सर, आम्लपीत्त, पोटाचे विकाराचा बळी ठरतो. मद्यपास थकवा येतो. नशेत स्त्रीवर जबरदस्ती करतो. अशा प्रकारे मद्यपान अनेक दुर्गुण व शारीरिक रोगाचे माहेरघर आहे.
२) मानसिक दुष्परिणाम :
मेंदू बधीर होतो. संवेदना, आकलनशक्मी, स्मरणशक्तीचा विसर पडतो. भ्रमीष्ट, संशयी बनतो त्याच्या मेंदूवर परिणाम होतो. त्यास फिटस येतात. भ्रमीष्ट सारखा वागतो मानसिक विकृतीतून आत्महत्याही करतो. संवेदनाहिनता वाढते मेंदूचे विकार होतात.
३) सामाजिक दुष्परिणाम (सामाजिक विघटन ) :
मद्यपानामुळे समाजाचे विघटन होते. अपघात आणि गुन्हे वाढतात.. तसेच अनेक सामाजिक समस्या निर्माण होतात. मद्यपी मूल्ये प्रमाणकांचे उल्लंघन करतात. समाजात बेकायदेशीरपणा अनैतिकता वाढते. मद्यपानामुळे वैयक्तिक, कौटुंबिक वैवाहिक आणि सामाजिक विघटन येते. घडून वेश्यागिरी व आत्महत्यांचे प्रमाण वाढते. सामाजिक मूल्यांचा न्हास होतो. मद्यप्याच्या भावी पीढीत दोष निर्माण होतात. स्त्रियांनी मद्यपान केले तर जन्माला जुगार, बालअपराध. येणारी भावी पिढी दुबळी ठरते. शासनाला दारुबंदी साठी पोलिस नियंत्रण राबविण्यावर अनाठाई खर्च करावा लागतो. सार्वजनिक आरोग्याचा प्रश्न निर्माण होतो. डॉ. मेमोरियाच्या शब्दात मद्यपानाने गुन्हेगारी, व्याभिचार वाढतो, मद्यापी वृद्धावस्थेत असहाय होतो. मेंदूवरील नियंत्रण नष्ट होते. डॉ. कुमारप्या म्हणतात, मद्यपानाने संपत्तीच्या विनाशाबरोबर अनैतिकता, खून, चोरी, कौटुंबिक कलह होतो नैतिक बौद्धीक न्हास होतो.
सामाजिक दुषपरिणाम :
अ) व्यक्तिगत विघटन मद्यपानामुळे वैयक्तिक विघटन होते त्याचे शरीर दुर्बल बनते तो त्याच्या इच्छेवर नियंत्रण करू शकत नाही. लहरी बनतो, त्याला कोटुंबिक भूमिका वठविता येत नाहीत. वेळप्रसंगी रोजगार, नोकरी गमवावी लागते. मद्यपी अनैतिक आचरण, गुन्हे करतो यामुळे त्याचे वैयक्तिक विघटन होते.
ब) मद्यपान आणि कौटुंबिक विघटन कौटुंबिक दुष्परिणाम: मद्यपानामुळे कुटुंबाची वाताहत होते. मद्यपी कुटुंबाचे सौख्य हिरावले जाते. कुटुंबाचा प्रमुख असेल तर त्यास पिता, कुटुंबाचा पालनकर्ता, कुटुंबाचा रक्षक ही भूमिका करता येत नाही. मद्यपानामुळे कुटुंब उध्वस्त होते. कुटुंबातील आत्मियता नष्ट होते. कुटुंबाची बेअबु होते. मुलावर संस्कार होत नाहीत. मद्यपी पत्नीबाबत सहानुभूतीने वागत नाही. स्त्रीयांचे सौभाग्य हिरावले जाते. मुले अपराधी होतात. कुटुंबाच्या सदस्यात एकरूपता असत नाही. पती-पत्नी, पिता-पुत्र संबंध दुरावतात. मद्यपानामुळे बहुतांशी कुटूंबे विघटित होतात.
४) आर्थिक दुष्परिणाम :
मद्यपानामुळे दारिद्र्य वाढते. व्यसनावर अमाप पैसा खर्च होतो. व्यसनाधिन लोक कमाल होतात. त्यामुळे कुटुंबाचा चरितार्थ भागत नाही. मद्यप्याची कार्यक्षमता कमी होते. त्यामुळे राष्ट्रीय संपत्तीची हानी होते.
थोडक्यात मद्यपानाचे खालील दुष्परिणाम होतात.
- राष्ट्रीय संपत्तीची हानी
- आरोग्य खालावते पेशी फुफ्फार होतात. रक्तदाब वाढतो. पेशीवर परीणाम होतो.
- मद्यामुळे मृत्यु आहार दूध घेता येत नाही.
- अकार्यक्षमता घटते. मद्यपी लहरी होत दिये काम करू शकत नाहीत.
- मानसिक असंतुलन मन, शरीर नसते.
- रिद्रव वाढते
- वैयक्तिक विघटन होते कुटुंबापे होते. अशा प्रकारे मद्यपानाचे विविध परिणाम स्पष्ट करता येतात.
प्रश्न ८:- मद्यपानाच्या समस्येला रोखण्यासाठी कोणते प्रतिबंधात्मक उपाय करता येतील, हे सुचवा. (Problems of Alcoholism-Measures)
किंवा
मद्यपानाच्या प्रतिबंधासाठी करण्यात आलेल्या उपाययोजनांची माहिती द्या.
उत्तर :
प्रस्तावना :- मद्यपान ही एक सामाजिक समस्या आहे. त्याची झळ व्यक्ती बरोबर समाजालाही बसते. आज विकसित आणि विकसनशील देशात मद्यपान बंदीचा गंभीरपणे विचार सुरू आहे. त्यात मद्यावर अबकारी कर लावणे, मद्यप्राशन करणारास शासनाकडून परवाना घेणे. स्विडनमध्ये तर मद्यपान करून वाहन चालविल्यास शिक्षा होते. महात्मा गांधी यांनी मद्यबंदीचा पुरस्कार केला. स्वातंत्र्य पूर्वकाळात काँग्रेसने दारूबंदीचे घोरण स्विकारले. मद्यपान निषेधाचे अनेक लाभ होतात. अनैतिकता, आत्महत्या, व्याभिचार, अपराधाचे प्रमाण कमी होते, कार्यक्षमता वाढते, वैयक्तिक, कौटुंबिक, सामाजिक विघटन रोखता येते. बचत, गुंतवणूक होते, क्रयशक्ती वाढते. मद्यपानाचे भावी पिढीवर होणारे दुष्परिणाम टाळता येतात.
स्वातंत्र्य पूर्वकाळातील मद्यपानबंदी उपाय योजना :
- १९१२ साली गोखले यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या समितीने दारूबंदीची मागणी केली.
- १९२० मध्ये महात्मा गांधींनी मद्यपान निषेध चळवळीला प्रारंभ केला. समाज सुधारकांना जाणीव झाली.
- १९२१ मध्ये काँग्रेसच्या अधिवेशनात मद्यपान बंदीचा ठराव संमत केला.
- १९२१ ते १९३० मध्ये दारूबंदी, निषेध, दारूबंदी आंदोलन, दारूबंदीची चळवळ केली. काँग्रेसने मद्यपान बंदीची मागणी सरकारकडे केली व दारूबंदी चळवळीला राजकीय आधार प्राप्त झाला.
- १९३७ मध्ये अनेक प्रांतात काँग्रेसची मंत्रीमंडळे आली. त्यामुळे मद्यपान बंदी कार्यक्रमाला गती मिळाली. १९३९ मध्ये मंत्रीमंडळानी राजीनामे दिल्याने मद्यपान बंदी मोहिम थंडावली.
- १९३७ मध्ये मद्रास बिहार, ओरिसा, मध्यप्रदेशने दारूबंदी कायदे केले, नशाबंदी कार्यक्रम आखला.
- स्वातंत्र्यपूर्व ब्रिटीश काळात आर्य समाज, रामकृष्ण मिशन आणि धार्मिक संप्रदायांनी भद्यपान निषेध आंदोलन सुरू केले.
स्वातंत्र्योत्तर काळातील उपाय योजना :
- महात्मा गांधीचे दारूबंदीचे स्वप्न साकार करण्याच्या दृष्टीने भारतीय राज्य घटनेच्या निर्देशक तत्त्वात मद्यपान निषेध, त्या दृष्टीने कार्यक्रमाची आखणी व अंमलबजावणी हे शासनाचे धोरण राहील असे नमूद करण्यात आले.
- १९४६ च्या लोकप्रतिनिधी सरकारने दारूबंदीकडे गांभीर्याने पाहिले आणि त्याकडे विशेष लक्ष दिले.
- १९५४ मध्ये श्रीमंत नारायण यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली आणि त्या समितीने अहवाल सादर केला, त्यात मद्यपान बंदीचे धोरण होते. १९५६ मध्ये लोकसभेने समितीची अहवाल स्विकारला.
- १९५६ च्या सुधारणा कार्यक्रमात मादक पदार्थाच्या जाहिरातीवर बंदी आणि सार्वजनिक ठिकाणी मद्यविक्रीस बंदी करण्यात आली.
- १९५६ पासून मुंबई, मद्रास, आंध्र, सौराष्ट्रमध्ये संपूर्ण दारूबंदी आणि पंजाब, मध्यभारत, उत्तरप्रदेश, ओरीसा, हिमाचल प्रदेश, कोचीन, त्रावणकोर मध्ये अंशिक दारूबंदी लागू करण्यात आली. मात्र १९५८ पर्यंत श्रीमंत नारायण यांच्या शिफारशी प्रमाणे संपूर्ण देशात दारूबंदी लागू झाली नाही.
- १९६४ पर्यंत विविध घटक राज्यात मद्यप्राशनावर कायदेशीर बंदी करण्यात आली परंतु चोरट्या बेकायदेशीर मार्गाने दारूची विक्री, निर्मिती केली जात होती, त्यामुळे राज्य सरकारचे उत्पन्न बुडाले. १९६३ मध्ये न्या. टेकचंद समिती नेमली.
- १९६५ नंतर अनेक राज्यासंनी दारूबंदी धोरणात बदल केले.
- १९७६ मध्ये १२ सुत्री कार्यक्रम जाहीर करण्यात आला.
- १९७८ पासून दारूबंदी कार्यक्रम जाहीर झाला.
- १९८५ साली मादक पदार्थाचा चोरटा व्यापार, त्याची वाहतूक, विक्री आणि उपयोगावर बंदी घालण्यात आली.
- पंचवार्षिक योजनात सामाजिक कल्याणाच्या दृष्टीने दारुबंदी धोरणात उस्फूर्त संघटनाचा सहभाग असावा. केंद्राने अकबारी कर बुडवल्याबद्दल राज्यांना अनुदान दिले. केंद्रीय मद्यनिषेध समिती स्थापन झाली तिचा उद्देश राज्याचा समन्वय साधने आणि दारुबंदी धोरणातील अडचणी समाजवून घेणे होता. या समितीने मद्यप्राशनाचे सामाजिक, आर्थिक दुष्परिणाम, तसेच संशाधन, मद्यबंदीस प्रोत्साहन दिले मद्यनिषेध धोरणानुसार विविध राज्यांनी दारुबंदी धोरण स्विकारले.
- आंध्र प्रदेशात अनेक जिल्ह्यात संपूर्ण दारुबंदी लागू केली. आसाम मध्ये नवीन परवाने न देणे, औद्योगिक क्षेत्रातील दारुची दुकाने हटविणे गाजां, भांग सेवनास संपूर्ण राज्यात निषिध केला बिहारमध्ये राष्ट्रीय सणाचे दिवशी दुकाने बंद राहतील. गुजरात राज्याने संपूर्ण दारुबंदीचे धोरण स्विकारले. केरळाने ५८ टक्के भागात संपूर्ण दारुबंदीचे धोरण स्विकारले. १९५९ पासून अफू, गाज्यांची दुकाने बंद केली. मध्यप्रदेशाने सार्वजनिक ठिकाणी मद्यपान, जाहिरातीवर बंदी घातली. १९५८ पासून तामिळनाडूने संपूर्ण दारुबंदी धोरण स्विकारले. महाराष्ट्राने १९६१ पासून दारुबंदी धोरण स्विकारले संस्कार केंद्र उघडली. कर्नाटकाने काही जिल्हे वगळता संपूर्ण दारुबंदी स्विकारली.
अशा प्रकारे मद्यपानाच्या प्रतिबंधासाठी उपाययोजना करण्यात आल्या आहेत.
Comments
Post a Comment
Thank you to visit My blog