Category

Show more

जलप्रदुषण अर्थ , परिणाम व उपाय याची सविस्तर माहिती

Water Pollution Meaning, Effects and Remedies and Causes

जलप्रदुषण


प्रस्तावना :- पाण्याला सजीवाच्या जीवनात अत्यंत महत्व आहे. परिस्थितीकीच्या निर्मितीत पाणी हा एक महत्वाचा घटक आहे. मानवाच्या क्रीयाशी प्रत्यक्ष अप्रत्यक्षरीत्या संबंध असतो म्हणून प्राचीन मानवी संस्कृतीचा विकास नद्यांच्या खोऱ्यात झाल्याचे दिसते. पृथ्वीवर पाण्याचे वितरण विषम आहे. पृथ्वीचा सुमारे ७१ टक्के भाग पाण्याने व्यापलेला आहे एकूण पाण्यापैकी ९२.२ टक्के पाणी महासागरात असून खारट आहे उर्वरीत २.८ टक्के पाणी गोड व पिण्यायोग्य आहे या गोडया पाण्यापैकी ०.९ टक्के पाणी नद्या सरोवर विहिरी तळी इत्यादीच्या स्वरुपात आहे यावरुन लक्षात येते की शुद्ध व गोडपाणी किती दुर्मीळ व अमूल्य आहे त्यामुळे पाण्याची गुणवत्ता टिकवून ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

उपलब्ध आलेल्या शुद्ध पाण्यात सध्या मोठ्या प्रमाणात प्रदूषकांचा प्रादुर्भाव दिसतो सध्या जलप्रदूषणाची तीव्रता जास्त वाढली आहे औद्योगिक

क्रांतीनंतर पाण्याची गुणवत्ता कमी होत आहे जलप्रदूषण ही एक जागतीक समस्या बनली आहे. 

व्याख्या :- 

१) सी. एस. साऊथविक :-

 "मानवी क्रियाद्वारे किंवा नैसर्गिक प्रक्रियाद्वारे प्राण्याच्या रासायनिक व भौतिक आणि जैवीक गुणधर्मात बदल होणे म्हणजे जलप्रदूषण होय."

२) पी. विवियर 

नैसर्गिक किंवा मानवनिर्मित कारणामुळे पाण्याच्या गुणवत्तेत परिवर्तन होऊन ते मानव व पशुपक्ष्यांचे स्वास्थ शेती, मासे इत्यादी अनुपयुक्त व हानीकारक बनते दास जलप्रदूषण म्हणतात."

३) गिलपिन:-

 "जेंव्हा पाण्याच्या रासायनिक भौतिक आणि जैविक गुणधर्मात मानवाद्वारे बदल घडवून आणला जातो त्यास जलप्रदूषण म्हणतात." 

४) WHO :- 

नैसर्गिक किंवा इतर बाह्य पदार्थाच्या मिश्रणाने पाणी अस्वच्छ विषारी घाण होते पाण्यातील ऑक्सिजनचे प्रमाण घटते व त्या पाण्यामुळे सजीवांना अपाय होतो त्यामुळे साथीचे रोग पसरतात त्याला जलप्रदूषण म्हणतात."

५) पाण्याची पारदर्शकता रंग, चव व आम्लात रुपांतर नैसर्गिक व मानवनिर्मित घटक पाण्यात मिसळण्याने ते पाणी वापरण्यारनिरुपयोगी अथवा अयोग्य बनते त्यास जलप्रदूषण म्हणतात.

जलप्रदूषण हे नैसर्गिक व माननिर्मित घटकामुळे होत असले तरी सर्वात जास्त मानव निर्मित घटक आहेत. नैसर्गिक घटकापेक्षा हजारो पटीने मानवनिर्मित घटक प्रदूषण निर्माण करतात ते घटक पुढीलप्रमाणे.

जलप्रदूषणाची कारणे :-


१) औद्योगिक कारखान्यामुळे जलप्रदूषण :- 

कारखान्यामधून बाहेर फेकले जाणारे पदार्थ धन, द्रव व रसायन मिश्रीत असतात. हे पदार्थ नदी, नाले तलाव व समुद्री जलाच्या प्रदूषणास कारणीभूत असतात कागद गिरण्या, कापडगिरण्या, साखर कारखाने, चर्मोद्योग या कारखान्यात पाणी मोठ्या प्रमाणात वापरले जाते त्यामुळे हे कारखाने नद्यांच्या काठावर उभारले जातात. कारखान्यातील सांडपाणी नदीमध्ये सोडले जाते त्यामुळे जलप्रदूषण होते, अन्न प्रक्रीया उद्योग दुग्ध प्रक्रीया उद्योग तत्संग उद्योगातून बाहेर पडणाऱ्या सांडपाण्यात सुक्ष्म जंतू झपाट्याने वाढतात असे पाणी जलाशयात मिसळल्यास पाण्यातील ऑक्सीजनचे प्रमाण कमी हाऊन त्यातील जलचर मरतात.

काही कारखान्यातील सांडपाणी अधिक रंगीत व घाण वासाचे असते अशा सांडपाण्यामुळे जलाशयातील पाणी रंगीत बनते. कांही कारखान्यामध्ये जास्त झालेली उष्णता नियंत्रीत करण्यासाठी पाणी वापरतात हे पाणी पुन्हा नदी, सरोवरात सोडल्यास त्या पाण्याची उष्णता वाढते. औष्णीक प्रदूषण होऊन जलाशयातील जलचर मरतात या दुषीत पाण्यामुळे जलपरिसंस्थेचे संतुलन बिघडते.

२) रासायनिक खते :-

 शेतीतील उत्पादन वाढीसाठी शेतकरी शेतात विविध प्रकारच्या रासायनिक खतांचा वापर केला जातो. त्यामुळे कांही वर्षापर्यंत उत्पादनात निश्चितच वाढहोते परंतु नंतर नंतर मात्र त्याचे दुष्परिणाम दिसून येतात कांही वर्षांनी जमीनीची सुपीकता कमी कमी होत जाते. खतातील नायट्रेट्स, फॉस्फेटस जमीनीत मिसळतात परंतु हे पदार्थ पावसाच्या पाण्याबरोबर वाहत जाऊन नदी नाल्यात मिसळतात. त्यामुळे हे पाणी दुषीत बनते असे पाणी पिल्यास रक्तातील ऑक्सीजनची मिसळण्याची क्षामता कमी होते.

३) किटकनाशकामुळे होणारे जल प्रदुषण - 

शेतात पिकावर फवारले जाणारी किटकनाशके लवकर विघटीत होत नाहीत. ते पशु, पक्षी व मानवाच्या शरीरातही प्रवेश करतात. किटकनाशके फवारल्यांतर पाऊस पडल्यास ते पाण्याबरोबर वाहत जाऊन जलाशयात मिसळतात व ते पाणी दूषीत होते. ही कीटकनाशके पाण्यातून अन्नसाखळीत प्रवेश करतात वरचेवर त्याच्या प्रमाणात वाढ होत जाते त्यामुळेच अनेक राष्ट्रात किटक नाशकांच्या वापरावर बंदी करण्यात आली आहे.

४) घरगुती सांडपाणी व मैलामिश्रीत पाणी मानवी वस्त्यातील सांडपाणी व मैला गटाराद्वारे नद्यानाल्यामध्ये सोडली जाते. वाहून जाणाऱ्या मलमूत्र मिश्रीत पाण्यात नायट्रोज फॉस्फरस असतो या घटकामुळे जलाशयातील शेवळ सारख्या वनस्पती वाढतात व पाण्यावर पसरतात. या पाण्यात ऑक्सीजनचे प्रमाण कमी होते. तेथील जलचर मरु लागतात. जलाशयातील परिसंस्था धोक्यात येते. असे मलमूत्रमिश्रीत जलाशयातील पाणी पिल्यास कॉलरा, टायफाईड व अतिसार या सारख्या रोगांची लागण झपाट्याने होऊ शकेल

५) तेलगळती :-

 खनीजतेल वाहतूक मोठमोठ्या जाहजातून होते. जहाजावर तेलाची चढउतार करताना, तेलाच्या टाक्याची सफाई करताना जलवाहतुकीतील अपघात होऊन मोठ्या प्रमाणात तेल गळती होते अशावेळेस समुद्रात मोठ्या प्रमाणात तेल पसरुन पाण्यावर तेलाचा तवंग निर्माण होतो त्यामुळे जलचर मरतात.

६) मृदेची धूप -

 नदीनाले ओढे यांच्यातील पाण्याबरोबर मातीचे कण, गाळ वाहून नेला जातो यामुळे पाणी बनते त्यातील खनिजे व सेंद्रीय पदार्थ पाण्यात मिसळून पाणी दूषीत होते. कैल्शियम, पोटेशियम, सोडीयम, शिसे यांच पाण्यात मिश्रण होऊन पाणीदुषीत बनते पावसाळ्यात असे जलप्रदूषण जास्त होते.

७) सेंद्रीय पदार्थाचे कुजणे पाण्याबरोबर अनेक सेंद्रीय पदार्थ वाहून नेले जातात पालापाचोळा, काडी कचरा, मृतप्राण्यांची प्रेते त्यांचे अवशेष जलप्राण्यांचे अवशेष कुजतात व पाणी दुषीत बनते तसेच ग्रामीण भागात अंबाडी घायपातासारख्या वनस्पती साल कुजवण्यासाठी पाण्यात टाकतात त्यामुळे ही पाणी दुषीत बनते.

८) किरणोत्सर्गीकचरा अणुभट्टयामधील राख व कचरा नद्यांच्या प्रवाहात सोडला जातो पाण्यात किरणोत्सार्गी पदार्थ मिसळून जल प्रदूषण होते. जगातील अनेक अणुउर्जाप्रकल्पातील किरणोत्सर्गी राख समुद्रात मिसळून जलप्रदूषण होते.

९) धार्मिक यात्रा व कर्मकांड : 

भारतीय संस्कृतीनुसार नद्यांना पवित्रमानले जाते. नद्यांच्या संगमावर व तीर्थक्षेत्री आंघोळ केली जाते. कुंभमेळा व इतर पर्वाच्या वेळेस तीर्थक्षेत्री लाखो लोक एकत्र येऊन नद्यात आंघोळ करतात नदी काठानेच मलमूत्र विसर्जन केले जाते. अंत्यविधी, अस्थिविसर्जन व इतर कर्मकांडे केली जातात यामुळे जलप्रदूषण होते उदा. गंगानदीत अर्धवट जळालेली कुजलेली प्रेते पाण्यावर तरंगताना दिसतात.
(१०) औष्णीक विजनिर्मिती केंद्र औष्णिक विजनिर्मिती केंद्रात कोळशाबरोबर मोठ्या प्रमाणात पाण्याचाही वापर केला जाते. हे वापलेली पाणी उष्ण होऊन बाहेर पडते असे पाणी जलाशयात मिसळल्यास त्यातील ऑक्सीजनचे प्रमाण कमी होते व पाणी वापरण्यायोग्य नसते.
याशिवाय ज्वालामुखीतील राख, विघटीत न होणारा कचरा, प्लॅस्टिक, काच, रासायनिक व विषारीद्रव्ये मोठ्या प्रमाणात पाण्यात मिसळतात त्यामुळे पाणी दुषीत होते.

जलप्रदूषणाचे परिणाम :-


  1.  पाण्यातील दूषीत घटकांचा परिणाम मानवी आरोग्यावर होतो. दुषीत पाण्याच्या सेवनाने पचनाचे विकार, पोटाचे विकार, कॉलरा, हगवण, टायफाईड, फुफ्फुसांचा कॅन्सर, कावीळ या रोगांची साथ पसरते.
  2. दूषीत पाण्यात विविध जडधातूंचा प्रवेश होतो त्यामुळे लोकांना विषबाधा होऊन शरीरावर काळे डाग पडतात, दमा श्वसनाचे विकार होतात. कर्करोग होतो अंधत्वयेते. मानसिक संतुलनात बीघाड, यकृताचे विकार, अन्ननलीकेत जखमा, मुत्रपिंडाचे विकार होतात.
  3. पाण्यामुळे होणारे जलप्रदूषण भयानक असते. अशा दूषीत पाण्यामुळे चेतासंस्था, अर्धांगवायू वेडसरपणा, श्वसनलिकेचे विकार, मेंदूतील पेशींचा नाश होतो पाण्यातील पारा माशांच्या शरीरात प्रवेश करतो व अन्नातून मानवाच्या शरीरात प्रवेश करतो.
  4. जलप्रदूषणामुळे जलपरिसंस्था धोक्यात येतात. मासे, सुक्ष्मजीव, प्राणी वनस्पती, समुद्रीपक्षी यांचे जीवन धोक्यात येते तेल वाहतूक करणाऱ्या जहाजांना समुद्रात आग लागल्यास अनेक जलचर मरतात.
  5. सागरी पाण्यात प्लॅस्टिकच्या पिशव्या नायलॉन दोरीचे तुकडे व तत्सम कचरा भक्ष म्हणून मासे, कासव गिळतात त्यामुळे कालांतराने ते मरतात. त्यामुळे अनेक जलचर प्राण्यांच्या संख्येत घट होऊन जलपरिसंस्थेचे अस्तित्व धोक्यात येत आहे.
  6. जल प्रदूषणामुळे समुद्रातील पाण्यात ऑक्सीजनचे प्रमाण कमी होते जलचारांना पुरेसा ऑक्सीजन मिळत नाही त्यामुळे जलचर मरतात.

जलप्रदूषणाचे नियंत्रण व उपाय :- 


  1.  घरगुती व सागरी सांडपाणी व इतर टाकाऊ पदार्थ प्रत्यक्ष जलाशयात न सोडता त्यावर प्रक्रीया करुन सोडावे.
  2. उद्योगातील घनकचरा जलाशयामध्ये न टाकता जमीनीची खड्डे बुजवण्यासाठी भर घालण्यासाठी करावा. 
  3.  पाणीकिती दुर्मिळ आहे त्याचा वापर कटकसरीने कसा करावा. पाणी दूषीत होऊ नये यासाठी काळजी कशी घ्यावी या संबंधीची माहिती लोकांना करुन द्यावी.
  4. औद्योगिक सांडपाण्याचे शुद्धीकरण करुन त्याचा वापर वृक्षसंवर्धनासाठी व शेतीसाठी करावा..
  5.  शेतीत रासायनिक खताऐवजी नैसर्गिक खतांचा वापर करावा. 
  6. जलप्रदूषण नियंत्रण कायद्याची काटेकोर अंमलबजावणी करावी गरज भासल्यास नवीन कठोर कायदे करावेत.
  7.  जलशुद्धीकरण करणाऱ्या जलचर जीवांचे संवर्धन करावे. अंत्यसंस्कारासाठी विद्युत दहिन्याचा वापर करावा जेणेकरून अर्धवट जळालेली प्रेतेनदी पात्रात टाकली जाणार नाहीत.
  8. नदी, तलाव, सरोवर इतरत्र जलाशयाच्या काठाने मलमुत्रविसर्जनास बंदी घालावी.

जलप्रदूषण नियंत्रणासाठी याउपाययोजना उपयुक्त ठरतात. परंतु त्यांची अंमलबजावणी योग्य वेळी व योग्य तऱ्हेने होणे आवश्यक असते समाजील प्रत्येक घटकाने सक्रीय सहभाग घेतला पाहिजे. तर ही समस्या कमी होण्यास मदत होईल.

Think work vm knowledge


Find more

Comments

Popular posts from this blog

Health and physical education -आरोग्य व शारीरिक शिक्षण Class 12th Project download

Environment education and water security - पर्यावरण शिक्षण व जलसुरक्षा Project 11th and 12th Class Project Download in PDF

Health and physical education class 12 solutions maharashtra board download in pdf in English