आर्थिक विकास आणि वृद्धी
प्रश्न . आर्थिक विकासाचा अर्थ किंवा व्याख्या सांगून त्याची संकल्पना स्पष्ट करा.
व्याख्या किंवा अर्थ.
आर्थिक विकास ही अत्यंत व्यापक स्वरूपाची संकल्पना आहे. त्यामुळे तिचा अर्थ व व्याख्या समजून घेणे आवश्यक आहे. कारण आर्थिक विकासाची संकल्पना व्यक्ती, स्थान, काळ व देश बदलणारी असते.
आर्थिक विकास म्हणजे जेव्हा रष्ट्रातील लोकांचे दरडोई उत्पन्न वाढून त्यांच्या जीवनमानात राहणीमानात सुधारणा होते तेव्हा आर्थिक विकासाचा बदल झाला असे म्हणता येईल . लोकांचे जीवन सुखी व्हावे म्हणून आर्थिक विकास झाला पाहिजे एवढाच अर्थ या ठिकाणी लावता येणार नाही. कारण अन्न वस्त्र निवारा या गरजांची पूर्तता झाली म्हणजे तो सुखी झाला असे म्हणता येणार नाही. कारण आवश्यकता गरजा बरोबरच दुय्यम अथवा इतर गरजांची पूर्तता होणे विकासाच्या दृष्टीने आवश्यक असते जोपर्यंत या सर्व गरजा पूर्ण होत नाहीत तोपर्यंत तो सुखी व समाधानी होणार नाही होणार नाही कारण विकासाच्या दृष्टीने सातत्य ,कला व विज्ञान तत्त्वज्ञान या मध्ये होणारी प्रगती सुद्धा विकास घडवून आणीत असते.
एखाद्या राष्ट्रांमध्ये विकासाची साधने किती प्रमाणात उपलब्ध आहेत व त्या समाधानाचा वापर करण्याचे स्वातंत्र्य त्या राष्ट्रातील जनतेला किती आहे यावर सद्धा देशाचा आर्थिक विकास अवलंबून आहे.
त्या साधनाचा काटकसरीने वापर करणे , साधनाची जमावाजमव करणे त्याचा अपव्यय होणार नाही याची दक्षता घेणे यावर सुद्धा विकास अवलंबून असतो. कारखाने, उद्योगधंदे, औ दळणवळणाची साधने या मध्ये होणारी वाढ म्हणजे आर्थिक विकास. असाही अर्थ आपणास लावता येतो. त्याचबरोबर भौतिक साधनांच्या अथवा वस्तूंचा निर्मितीमध्ये होणारी वाढ सुद्धा एखाद्या राष्ट्राचा विकास निश्चित करीत असते. परंतु या सर्व बाबी मध्ये विकास घडवून आणण्यासाठी देशातील लोकांची मनोवृत्ती सुद्धा तेवढेच कारणीभूत ठरते देशांतील अंतर्गत, सामाजिक, धार्मिक व राजकीय स्थिती मधून देशातील लोकांची मनोवृत्ती तयार होते.
आर्थिक विकास ही एक सतत चालणारी प्रक्रिया आहे. एवढेच नाही तर दीर्घकाळ चालणारी प्रक्रिया आहे. राष्ट्रात विकासाची प्रक्रिया प्रतिमा जेवढी दीर्घकाल चालली तेवढा विकास या प्रक्रियेतून बाहेर पडत असतो. सततच्या चालणाऱ्या या प्रक्रियेवर देशाचा विकास अवलंबून असतो.
तरीपण दुबळ मानाने अर्थ समजून घेण्यासाठी काही अर्थतज्ज्ञांनी पुढील प्रमाणे व्याख्या केल्या आहेत.
1) प्रा. लुईच्या मते-
'दरडोई उत्पन्नात होणारी वाढ म्हणजे आर्थिक विकास होय.'
2) प्रा. मेयर -
' आर्थिक विकास म्हणजे देशातील दरडोई शुद्ध उत्पन्नात सतत दीर्घ काळात वाढ होणे होय.'
या व्याख्येनुसार देशाच्या आर्थिक विकासाच्या दृष्टीने दरडोई उत्पन्नात होणारी शुद्ध वाढ ही अधिक महत्त्वाची आहे. त्याचबरोबर या व्याख्येवरून असेसुद्धा सिद्ध होते की काळात राष्ट्रीय उत्पन्नात ज्या दराने वाढ होते त्यापेक्षा लोकांच्या वाढीचा वेग कमी असल्यासच दरडोई उत्पन्न वाढून आर्थिक विकास घडून येतो. असे दीर्घकाळात घडत राहिल्यास आर्थिक विकासाचा वेग वाढतो.
3) कोकण व रीचर्डसन च्या मते -
' आर्थिक विकास म्हणजे दीर्घकाळात सतत चालू असणारे बहुतेक कल्याणातील प्रगती होय. '
आर्थिक विकास म्हणजे भौतिक कल्याणमध्ये होणारी कायम स्वरूपाची सुधारणा होय. जिजा प्रयत्न समाजाला प्राप्त होणाऱ्या वस्तू व सेवा यांच्या वाढत्या प्रमाणात दिसून येतो. कारण देशांमध्ये भौतिक वस्तूंचे जेवढे उत्पादन अधिक तेवढ्या अधिकच्या वस्तू देशातील लोकांना उपभोगण्यास मिळतात. त्यामुळे राहणीमानाचा स्तर उंचावतो व उंचावलेला स्तर हेच आर्थिक विकासाचे लक्षण ठरते.
4) बेंजामिन हिगिन्सच्या मते -
'आर्थिक विकास म्हणजे राष्ट्रीय उत्पन्नात व दरडोई उत्पन्नात होणारी वाढ होय. ' की, त्याचा लाभ विविध क्षेत्रात व उत्पन्न गटात मिळतो व दीर्घ काळापर्यंत चालू राहतो.
5) सर्वसाधारण व्याख्या -
' राष्ट्रीय वास्तव उत्पन्नातील दीर्घकालीन प्रक्रिया म्हणजेच आर्थिक विकास होय.'
एका विशिष्ट कालखंडामध्ये अर्थव्यवस्थेत निर्माण झालेल्या वस्तू व सेवांची वास्तव मूल्य म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न होय. हो उत्पन्न अधिक तर विकास देखील अधिक.
वरील सर्व व्याख्या वरुन आर्थिक विकासाचे काही ठळक वैशिष्टे सांगता येईल .ती खालील प्रमाणे
1) आर्थिक विकासही अल्पकालीन असून दीर्घकालीन प्रक्रिया आहे व स्वयंप्रेरित आहे.
2) आर्थिक विकास म्हणजे राष्ट्रीय उत्पन्नातील शुद्ध वाढ.
3) आर्थिक विकास म्हणजे वास्तव उत्पन्नातील वाढ होय.
4) आर्थिक विकास ही संपूर्ण राष्ट्राच्या संदर्भातील प्रक्रिया होय.
5) आर्थिक विकास दर डोई उत्पन्नात होणारी वाढ होईल.
6) जनकल्याण होणारी वाढ म्हणजे आर्थिक विकास होय.
7) आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार व वापर होता असतो.
8) भौतिक कल्याण आज होणारी सुधारणा म्हणजे आर्थिक विकास.
9) सामाजिक, आर्थिक व राजकीय परिवर्तन.
आर्थिक विकासाची संकल्पना (concept of development)
जागतिक दुसऱ्या माझ्यानंतर जगात अनेक राष्ट्रे नव्याने उदयास आली तर बरीच राष्ट्रे स्वतंत्र झाली. या राष्ट्रांना स्वतःचा जलद गतीने विकास घडवून आणण्याची नितांत गरज वाटू लागली. त्यातच दुसऱ्या महायुद्धामुळे झालेल्या राष्ट्रांची पुनर्बांधणी करण्याच्या दृष्टीकोनातून जागतिक पातळीवर जागतिक बँक व आंतरराष्ट्रीय नाणेनिधी या दोन संस्थांची स्थापना झाली, तसेच रशियाने नियोजनाचा वापर करून अल्पावधीत नेत्रदीपक विकास घडवून आणला. या सर्व घटनांमुळे आर्थिक विकासाला महत्त्व प्राप्त झाले. आज गरीब व श्रीमंत प्रत्येक राष्ट्र आपल्या राष्ट्रीय उत्पन्नात वाढ घडून देशातील लोकांची जीवनमान उंचावण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. श्रीमंत राष्ट्र आर्थिक विकासाचा वेग टिकवून ठेवण्यासाठी तर गरीब राष्ट्र देशातील गरिबी, दारिद्र्य नष्ट करण्यासाठी प्रयत्न करतात. यातूनच आर्थिक विकासाच्या संकल्पनेचा उदय झाला.
थोडक्यात आर्थिक विकास ही व्यापक स्वरूपाची संकल्पना आहे. आर्थिक विकासात आर्थिक वृद्धीचा समावेश तर होतोच याशिवाय इतर बाबी त्यात समाविष्ट असतात. म्हणून आर्थिक विकास म्हणजे आर्थिक प्रगती सोबत मानवाच्या कल्याणासाठी आवश्यक असणाऱ्या घटकांमध्ये प्रगतशील स्वरूपाचे बदल घडून येणे होय.
आर्थिक विकास आणि आर्थिक वृद्धी हे दोन्ही शब्द एकाच अर्थाने वापरले जातात.
माननीय काहीवेळा आर्थिक विकासाला आर्थिक वृद्धी असे ही म्हटले जाते. पण त्यात सूक्ष्मता काही फरक आहे. त्यामुळे त्याचा स्वतंत्र अभ्यास केला जातो.
आर्थिक विकास |
Comments
Post a Comment
Thank you to visit My blog