Posts

Category

Show more

Principles of Political Economy Information

Image
 माल्थसचा आर्थिक विकासाचा सिध्दांत 2 माल्थसचा आर्थिक विकासाचा सिद्धांत : -  सर थॉमस मालवस यांनी आपल्या ' Principles of Political Economy ' या १८२० मध्ये प्रकाशित केलेल्या ग्रंथाच्या दुसन्या खंडामध्ये देशाच्या आर्थिक विकासाची चर्चा केली आहे . पण यांनीही स्वतंत्र असा सिध्दांत मांडला नाही . त्यांचे आर्थिक विकासाचे विचार पुढील प्रमाणे सांगता येतात .  आर्थिक विकास मालथसच्या मते कोणत्याही देशाचा आर्थिक विकास हा त्या देशातील संपत्ती व संपत्तीच्या वितरणावर अवलंबून असतो . ज्या देशामध्ये विपूल प्रमाणात साधनसंपत्ती आहे व तिचे समान न्यायीक स्वरुपात वितरण झाले आहे , अशा राष्ट्राचा आर्थिक विकास होतो . तसेच आर्थिक विकास हा आपोआप होत नाही तर तो विशेष प्रयत्न करून घडवून आणावा लागतो .  आर्थिक विकास आणि भांडवल मालयस यांच्या मते भांडवल हा आर्थिक विकासाचा पाया किंवा मूलभूत घटक आहे . त्यामुळे अर्थव्यवस्थेत भांडवलाचे प्रमाण जास्त असेल . तर आर्थिक विकासाचा वेग जास्त असतो , अन्यथा नाही . तसेच अर्थव्यवस्थेत भांडवलाची निर्मिती ही फक्त भांडवलदार वर्गाकडूनच होते . श्रमिक वर्गाकडून भांडवल निर्मि...

Malthu's Theory of Economic Development - Principles of Political Economy

Image
  माल्थसचा आर्थिक विकासाचा सिद्धांत स्पष्ट करा .  माल्थसचा आर्थिक विकासाचा सिद्धांत ( Malthu's Theory of Economic Development ) :  जगातील अर्थशास्त्राचे पहिले प्राध्यापक म्हणून काम करण्याची संधी थॉमस रॉबर्ट माल्थस यांना मिळाली . आर्थिक विकासाच्या सनातनवादी विचारामध्ये माल्यराचे स्थान वैशिष्ट्यपूर्ण आहे . कारण माल्थसचे विवेचन सनातनवादी विचाराच्या चौकटीत बसणारे असले तरी त्यांचे असे काही विचार आहेत की ज्याचा आधार घेवून विकसित देशाचा विकास कसा अविरतपणे होईल आणि याच क्रियेचा वापर विकसनशील देशाच्या विकासाच्या क्रिया कशा गतीमान करता येतील या दृष्टीने मार्गदर्शक ठरणारे आहेत .  माल्थस हा स्मिथ सारखा आशावादी नव्हता तर तो निराशावादी दृष्टीकोनाचा होता . यांचे कारण म्हणजे अठराव्या शतकाच्या उत्तरार्धातील निर्माण झालेल्या अनेक समस्याही असू शकेल . उदा . अन्नाचे दुर्भिक्ष वाढत्या किंमती , बेकारी , दारिद्रय रोगराई इत्यादी . म्हणून माल्यासने समकालीन अर्थतज्ज्ञापेक्षा आर्थिक विकासाच्या समस्येमध्ये रस घेतलेला आहे . माल्थसने आपल्या ' Principles of Political Economy ह्या १८२० मध्ये लिहिले...

Full Text about डेव्हिड रिकार्डो ( David Recardo ) in Marathi

Image
डेव्हिड रिकार्डो ( David Recardo ) : -  डेव्हिड रिकार्डो यांनी १८१७ मध्ये " The Principles of political Economy and Taxa tion " यांनी ग्रंथामध्ये आर्थिक विकास विषयक विचार मांडले . तसे पाहिलो असता रिकार्डोने देखील आर्थिक विकासाचा वेगळा सिद्धांत मांडला नाही . सनातनवादी अर्थशास्त्रज्ञ अॅडमस्मिथ यांनी आर्थिक विकासाच्या दृष्टिने जे विचार मांडले त्याचीच पुन्हा विस्ताराने मांडणी करण्याचे कार्य रिकार्डोनी केले . त्यांनी फक्त वितरणविषयक व मूल्यविष्यक सिद्धांताची मांडणी अधिक प्रभावीपणे केली आहे. अॅडमस्मिथ यांनी मांडलेली जी ग्रहिते आहेत . त्याचाच गृहिते आधार डेव्हिड रिकार्डो यांनी आपल्या सिद्धांतात घेतला आहे .   पूर्ण स्पर्धा   अन्हासी उत्पतीची अपरिहार्यता   नैसर्गिक वेतन दर ,   नफा व भांडवल संचय यातील संबंध ,   जमिनीचा पुरवठा स्थिर आहे .  मजुराची मागणी भांडवल संचयावर अवलंबून असते .  अन्नधान्यासाठी सर्व जमिन वापली जाते .  श्रम व भांडवल हि बदलती उत्पादके आहेत . इत्यादी .  आर्थिक रचनेतील प्रमुख गट : रिकाडचे आर्थिक विकासाचे ...

डेव्हिड रिकाडोंची आर्थिक विकासाची प्रक्रिया स्पष्ट करा

Image
 डेव्हिड रिकाडोंची आर्थिक विकासाची प्रक्रिया स्पष्ट करा    आर्थिक विकासाची प्रक्रिया ( Process of Economic Development ) : - अॅडमस्मिथ प्रमाणे डेव्हिड रिकार्डोने देखील विकास प्रक्रियेमध्ये भांडवल संचयाला महत्त्वाचे स्थान दिले आहे . विकासाची प्रक्रिया समजावून घेण्यासाठी एकूण उत्पन्न व शुद्ध उत्पन्न यातील फरक लक्षात घेणे महत्वाचे आहे. विशिष्ट कालावधीमध्ये उत्पादन केलेल्या वस्तुंचे बाजारी मूल्य म्हणजे एकूण उत्पन्न होय. तर एकूण उत्पन्नातून श्रमिकांचे वेतन व भांडवलावरील चालू खर्च वजा जाता जी रक्कम शिल्लक राहते त्यास शुद्ध उत्पन्न असे म्हटले जाते . ह्याच शुद्ध उत्पन्नाचा संचय करण्याचे कार्य भांडवलदार करित असतो.  संचित उत्पन्नाचा वापर जेव्हा गुंतवणुकीसाठी करण्यात येतो. तेंव्हा विकासाच्या प्रक्रियेला सुरुवात होते . भांडवल संचयाचा दर हा बचत करण्याची क्षमता व बचत करण्याची इच्छा यावर अवलंबून असते. तर बचत क्षमता व इच्छा हे अर्थव्यवस्थेतील नफ्याच्या दरावर अवलंबून असते . रिकार्डोचे मते, नफ्याचा संबंध वेतनाशी आहे. एवढेच नाहीत तर नफा आणि वेतन यामधील संबंध व्यस्त स्वरूपाचा असतो . जसे...

डेव्हिड रिकाडांचा आर्थिक विकासाचा सिध्दांत सांगा

Image
डेव्हिड रिकाडांचा आर्थिक विकासाचा सिध्दांत सांगा    डेव्हिड रिकाडचा आर्थिक विकासाचा सिध्दांत : -  अभिमतपांतिय अर्थशास्त्रज्ञ डेव्हिड रिकाड यांनी सन १८१७ मध्ये प्रकाशित केलेल्या ' The principles of Political Economy and Taxation ' या पुस्तकात आर्थिक विकासाचे विचार मांडले . अॅडम स्मिथ प्रमाणे यांनीही आर्थिक विकासाचा स्वतंत्र सिध्दांत मांडला नाही . रिकार्डाचे आर्थिक विकासाचे विचार हे बहुतांशी कार्ल मार्क्सच्या विचारासारखे आहेत . से पुढील प्रमाणे आहेत .  ( १ ) घटत्या उत्पादनाचा सिध्दांत  रिकार्डोच्या मते अर्थव्यवस्थेत घटत्या उत्पादनाची प्रवृत्ती ही नैसर्गीक असते . त्यामुळे कृषी क्षेत्रात घटत्या उत्पादन फलाचा नियम लागू पडतो . त्यामुळे शेतीचा आर्थिक विकास मंदावून त्याचा अर्थव्यवस्थेवर विपरीत परिणाम होतो . हे टाळण्यासाठी विदेशातून अन्नधान्याची आयात करावी , नव्हे तर जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती वाढून जीवनमानाचा दर्जा घसरतो . त्यामुळे आर्थिक विकास मंद होतो . अशा पध्दतीने घटत्या उत्पादनाचा व आर्थिक विकास यांचा संबंध स्पष्ट केला आहे .  ( २ ) मजुराची मजुरी  श...

आर्थिक विकासाचे सिध्दांत १ ( Theories of Economic Development )

Image
आर्थिक विकासाचे सिध्दांत १( Theories of Economic Development -  अॅडम स्मिथच्या आर्थिक विकासाच्या सिध्दांताचे टीकात्मक परिक्षण करा. प्रास्ताविक : - दुसऱ्या महायुध्दामुळे अनेक राष्ट्रांतील पायाभूत सुविधा उध्वस्त होवून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते . यातून अर्थव्यवस्थेला सावरून विकासाचा वेग वाढविणे आवश्यक होते . त्यामुळे अनेक अर्थशास्त्रज्ञांनी आर्थिक विकासाचे सिध्दांत मांडले . आर्थिक विकास म्हणजे देशाच्या स्थूल राष्ट्रीय उत्पादनात वाढ घडवून आणणे होय . म्हणजे देशातील नैसर्गीक साधन सामग्री , भांडवल व मानवी साधने यांच्या साह्याने अर्थव्यवस्थेत संख्यात्मक व गुणात्मक बदल घडवून आणणे होय . हे बदल कशा पध्दतीने होते . लोकांच्या राहणीमानात कशी वाढ होते , अर्थव्यवस्था विकासाकडे कशी वाटचाल करते याविषयी अनेक अर्थतज्ञांनी आर्थिक विकासाच्या सिध्दांताची मांडणी केली आहे .  अभिमतपंतीयाचा विकासाचा सिध्दांत ( Classical Theories of Development )  अॅडम स्मिथ यांना अभिमत पंतांचे ( सनातनवादी ) संस्थापक मानले जाते . त्यांनी आपले आर्थिक विचार ' आशावाद ' , ' निसर्गवाद ' व ' आदर्श हात ' य...

आर्थिक विकास आणि आर्थिक वृद्धी MCQ Type Question and answered

Image
आर्थिक विकास आणि आर्थिक वृद्धी  MCQ Type Question and answered आर्थिक वृद्धी हा शब्द कोणत्या अर्थव्यवस्थेशी संबंधीत आहे.  क) विकसनशील अ) अविकसीत ब) विकसीत ड) वरीलपैकी सर्व आर्थिक विकास हा शब्द कोणत्या अर्थव्यवस्थेशी संबधीत आहे अ) अविकसीत  क) विकसनशील ब) विकसीत ड) वरीलपैकी सर्व "एखाद्या अर्थव्यवस्थेत दीर्घकाळात सावकाश व सतत होत जाणारा बदल म्हणजे आर्थिक वृद्धी होय." ही व्याख्या खालील पैकी कोणाची आहे ? अ) शुम्पीटर ब) जे.के. मेहता क) एडिसन ड) श्रीमती हिक्स 'राष्ट्राची संपत्ती' हा ग्रंथ खालील पैकी कोणी लिहीला ? अ) अॅडम स्मिथ क) केंन्स जगामध्ये सर्वप्रथम कोणत्या देशाने नियोजनाचा स्विकार केला? अ) अमेरिका ब) डॉ. मार्शल  क) रशिया  ड) भारत व) इंग्लड रशियाने केंव्हा नियोजनाला सुरुवात केली ? अ) १७७६ ब) १९२८ क) १९३६ ड) १८२८ "आर्थिक विकास म्हणजे दरडोई उत्पन्नात वाढ होणे होय" ही व्याख्या खालील पैकी कोणी केली? अ) प्रा. लेविस क) जे.के. मेहता व) ओकन ड) शुम्पींटर आर्थिक विकासात खालील पैकी कशावर भर दिला जातो ? (अ) संख्यात्मक वाढीवर  ब) गुणात्मक वाढीवर क) दोन्हीवरही ड) वरीलपैकी...

Popular posts from this blog

Health and physical education -आरोग्य व शारीरिक शिक्षण Class 12th Project download

Environment education and water security - पर्यावरण शिक्षण व जलसुरक्षा Project 11th and 12th Class Project Download in PDF

Health and physical education class 12 solutions maharashtra board download in pdf in English