Posts

Category

Show more

डेव्हिड रिकाडोंची आर्थिक विकासाची प्रक्रिया स्पष्ट करा

Image
 डेव्हिड रिकाडोंची आर्थिक विकासाची प्रक्रिया स्पष्ट करा    आर्थिक विकासाची प्रक्रिया ( Process of Economic Development ) : - अॅडमस्मिथ प्रमाणे डेव्हिड रिकार्डोने देखील विकास प्रक्रियेमध्ये भांडवल संचयाला महत्त्वाचे स्थान दिले आहे . विकासाची प्रक्रिया समजावून घेण्यासाठी एकूण उत्पन्न व शुद्ध उत्पन्न यातील फरक लक्षात घेणे महत्वाचे आहे. विशिष्ट कालावधीमध्ये उत्पादन केलेल्या वस्तुंचे बाजारी मूल्य म्हणजे एकूण उत्पन्न होय. तर एकूण उत्पन्नातून श्रमिकांचे वेतन व भांडवलावरील चालू खर्च वजा जाता जी रक्कम शिल्लक राहते त्यास शुद्ध उत्पन्न असे म्हटले जाते . ह्याच शुद्ध उत्पन्नाचा संचय करण्याचे कार्य भांडवलदार करित असतो.  संचित उत्पन्नाचा वापर जेव्हा गुंतवणुकीसाठी करण्यात येतो. तेंव्हा विकासाच्या प्रक्रियेला सुरुवात होते . भांडवल संचयाचा दर हा बचत करण्याची क्षमता व बचत करण्याची इच्छा यावर अवलंबून असते. तर बचत क्षमता व इच्छा हे अर्थव्यवस्थेतील नफ्याच्या दरावर अवलंबून असते . रिकार्डोचे मते, नफ्याचा संबंध वेतनाशी आहे. एवढेच नाहीत तर नफा आणि वेतन यामधील संबंध व्यस्त स्वरूपाचा असतो . जसे वेतनदर कमी तर भांड

डेव्हिड रिकाडांचा आर्थिक विकासाचा सिध्दांत सांगा

Image
डेव्हिड रिकाडांचा आर्थिक विकासाचा सिध्दांत सांगा    डेव्हिड रिकाडचा आर्थिक विकासाचा सिध्दांत : -  अभिमतपांतिय अर्थशास्त्रज्ञ डेव्हिड रिकाड यांनी सन १८१७ मध्ये प्रकाशित केलेल्या ' The principles of Political Economy and Taxation ' या पुस्तकात आर्थिक विकासाचे विचार मांडले . अॅडम स्मिथ प्रमाणे यांनीही आर्थिक विकासाचा स्वतंत्र सिध्दांत मांडला नाही . रिकार्डाचे आर्थिक विकासाचे विचार हे बहुतांशी कार्ल मार्क्सच्या विचारासारखे आहेत . से पुढील प्रमाणे आहेत .  ( १ ) घटत्या उत्पादनाचा सिध्दांत  रिकार्डोच्या मते अर्थव्यवस्थेत घटत्या उत्पादनाची प्रवृत्ती ही नैसर्गीक असते . त्यामुळे कृषी क्षेत्रात घटत्या उत्पादन फलाचा नियम लागू पडतो . त्यामुळे शेतीचा आर्थिक विकास मंदावून त्याचा अर्थव्यवस्थेवर विपरीत परिणाम होतो . हे टाळण्यासाठी विदेशातून अन्नधान्याची आयात करावी , नव्हे तर जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती वाढून जीवनमानाचा दर्जा घसरतो . त्यामुळे आर्थिक विकास मंद होतो . अशा पध्दतीने घटत्या उत्पादनाचा व आर्थिक विकास यांचा संबंध स्पष्ट केला आहे .  ( २ ) मजुराची मजुरी  श्रम हा आर्थिक विकासातील एक महत्

आर्थिक विकासाचे सिध्दांत १ ( Theories of Economic Development )

Image
आर्थिक विकासाचे सिध्दांत १( Theories of Economic Development -  अॅडम स्मिथच्या आर्थिक विकासाच्या सिध्दांताचे टीकात्मक परिक्षण करा. प्रास्ताविक : - दुसऱ्या महायुध्दामुळे अनेक राष्ट्रांतील पायाभूत सुविधा उध्वस्त होवून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते . यातून अर्थव्यवस्थेला सावरून विकासाचा वेग वाढविणे आवश्यक होते . त्यामुळे अनेक अर्थशास्त्रज्ञांनी आर्थिक विकासाचे सिध्दांत मांडले . आर्थिक विकास म्हणजे देशाच्या स्थूल राष्ट्रीय उत्पादनात वाढ घडवून आणणे होय . म्हणजे देशातील नैसर्गीक साधन सामग्री , भांडवल व मानवी साधने यांच्या साह्याने अर्थव्यवस्थेत संख्यात्मक व गुणात्मक बदल घडवून आणणे होय . हे बदल कशा पध्दतीने होते . लोकांच्या राहणीमानात कशी वाढ होते , अर्थव्यवस्था विकासाकडे कशी वाटचाल करते याविषयी अनेक अर्थतज्ञांनी आर्थिक विकासाच्या सिध्दांताची मांडणी केली आहे .  अभिमतपंतीयाचा विकासाचा सिध्दांत ( Classical Theories of Development )  अॅडम स्मिथ यांना अभिमत पंतांचे ( सनातनवादी ) संस्थापक मानले जाते . त्यांनी आपले आर्थिक विचार ' आशावाद ' , ' निसर्गवाद ' व ' आदर्श हात ' य

आर्थिक विकास आणि आर्थिक वृद्धी MCQ Type Question and answered

Image
आर्थिक विकास आणि आर्थिक वृद्धी  MCQ Type Question and answered आर्थिक वृद्धी हा शब्द कोणत्या अर्थव्यवस्थेशी संबंधीत आहे.  क) विकसनशील अ) अविकसीत ब) विकसीत ड) वरीलपैकी सर्व आर्थिक विकास हा शब्द कोणत्या अर्थव्यवस्थेशी संबधीत आहे अ) अविकसीत  क) विकसनशील ब) विकसीत ड) वरीलपैकी सर्व "एखाद्या अर्थव्यवस्थेत दीर्घकाळात सावकाश व सतत होत जाणारा बदल म्हणजे आर्थिक वृद्धी होय." ही व्याख्या खालील पैकी कोणाची आहे ? अ) शुम्पीटर ब) जे.के. मेहता क) एडिसन ड) श्रीमती हिक्स 'राष्ट्राची संपत्ती' हा ग्रंथ खालील पैकी कोणी लिहीला ? अ) अॅडम स्मिथ क) केंन्स जगामध्ये सर्वप्रथम कोणत्या देशाने नियोजनाचा स्विकार केला? अ) अमेरिका ब) डॉ. मार्शल  क) रशिया  ड) भारत व) इंग्लड रशियाने केंव्हा नियोजनाला सुरुवात केली ? अ) १७७६ ब) १९२८ क) १९३६ ड) १८२८ "आर्थिक विकास म्हणजे दरडोई उत्पन्नात वाढ होणे होय" ही व्याख्या खालील पैकी कोणी केली? अ) प्रा. लेविस क) जे.के. मेहता व) ओकन ड) शुम्पींटर आर्थिक विकासात खालील पैकी कशावर भर दिला जातो ? (अ) संख्यात्मक वाढीवर  ब) गुणात्मक वाढीवर क) दोन्हीवरही ड) वरीलपैकी

आर्थिक विकासाचे निर्देशक घटक सांगा ( Indicators of Economic Development )

Image
आर्थिक विकासाचे निर्देशक   उत्तर : एखाद्या देशाचा आर्थिक विकास होतो किंवा लक्षात नाही येण्याकरीता विकासाचे काही निर्देशक पटक सांगण्यात येतात . या घटकाच्या साह्याने आर्थिक विकासाचे मोजमाप करता येते . ते निर्देशक घटक पुढील प्रमाणे सांगता येतात .  १ ) राष्ट्रीय व दरडोई उत्पन्नात वाढ :  एखाद्या राष्ट्राच्या राष्ट्रीय उत्पन्नात वाढ होत असेल तर आर्थिक विकास होतो असे समजले जाते . कारण एकुण राष्ट्रीय उत्पन्नातील वाढीमुळे तेथील लोकांच्या क्रयशक्तीत वाढ होवून लोकांच्या गरजा पूर्ण होतात . तरी पण लोकसंख्येतील वाढीचा प्रभाव कळण्याकरिता ' दरडोई उत्पन्न ' हा अधिक चांगला निर्देशक आहे . दरडोई उत्पन्नात होणारी वाढ हे आर्थिक प्रगती मापणाचे उचित माप आहे . दरडोई उत्पन्नात जेवढी वाढ जास्त तेवढा आर्थिक विकास जास्त समजला जातो .  २ ) भांडवल निर्मितीचा दर :  आर्थिक विकासाच्या प्रक्रियेत भांडवल निर्मिती चालकाचे कार्य करते . म्हणून राष्ट्रीय उत्पन्नातून किती बचत होवू शकते व त्यातून किती गुंतवणूक होवू शकते यावर आर्थिक विकासाची संभाव्यता अवलंबून असते . जो देश जास्

आर्थिक वृद्धी आणि आर्थिक विकास ह्यातील फरक स्पष्ट करा

Image
आर्थिक वृद्धी आणि आर्थिक विकास ह्यातील फरक स्पष्ट करा. आर्थिक वृद्धी ( Economic Growth ) १ ) आर्थिक वृद्धी ही विक अर्थ व्यवस्थेशी संबंधित संकल्पना आहे .  २ ) अर्थव्यवस्थेतील संसाधनाचे कार्यक्षमपणे पुनर्वितरण करणे आर्थिकवृद्धीशी संबंधीत आहे.  ३ ) आर्थिक वृद्धीची प्रक्रिया ही संथपणे व दिर्घकालीन स्वरूपाची असते.  ४ ) आर्थिक वृद्धीसाठी सरकारी मार्गदर्शनाची व मदतीची फारशी आवश्यकता नसते.  ५ ) प्रगतीची एक किमान पातळी गृहीत धरुनच वृद्धीचे प्रारूपे मांडली जातात.  ६ ) ह्यात नवनिर्मितीची शक्यता नसते.  ७ ) आर्थिक वृद्धी ही स्थैतिक संतुलनाची एक अवस्था आहे. आर्थिक विकास ( Economic Development ) १ ) आर्थिक विकास ही विकसनशील अर्थव्यवस्थेशी संबधीत संकल्पना आहे.  २ ) अर्थव्यवस्थेत बेकार पडून असलेल्या संसाधनाचा उपयोग करणे आर्थिक विकासाशी संबधीत आहे.  ३) आर्थिक विकासाची प्रक्रिया ही तुटक व खंडीत स्वरूपाची असते.  4 ) आर्थिक विकासासाठी सरकारी मदतीची व मार्गदर्शनाची अत्यंत आवश्यकता असते. 5 ) प्रगतीच्या विशिष्ठ पातळीच्या अभावी गुणात्मक परिवर्तनाची आधी गरज असते.  ६ ) ह्यात नवीन शक्तीद्वारे नवमुल्याची निर्मिती

Economic Development Measurements / Problems ( आर्थिक विकासाच्या मापनातील अडचणी / समस्या )

Image
आर्थिक विकासाच्या मापनातील अडचणी समस्या Economic Development Measurements / Problems  आर्थिक विकासाच्या संकल्पनेनुसार एखादे राष्ट्र विकसीत , विकसनशील किंवा अविकसीत आहे . हे ठरविता येते . त्यासाठी आर्थिक विकासाचे अचुक व काटेकोरपणे मापन करणे आवश्यक असते . परंतु खरोखरच आर्थिक विकासाचे काटेकोरपणे मापन करता येते का ? या प्रश्नाचे उत्तर नकारात्मकच द्यावे लागेल . कारण आर्थिक विकासाचे मोजमाप करण्यात अनेक अडचणी आहेत . त्यापैकी प्रमुख अडचणी पुढीलप्रमाणे आहेत .  १ ) राष्ट्रीय उत्पन्नाचे चुकीचे मापन :  राष्ट्रीय उत्पन्नाचे वरुन दोन राष्ट्राची तुलना करुन विकासासंबधीचे निष्कर्ष काढले जातात . राष्ट्रीय उत्पन्नात वाढ झाली तर देशातील लोकांना वस्तु व सेवा मुबलक प्रमाणात मिळूण त्यांच्या जीवनमानात सुधारणा घडून येते . परंतु वाढत्या उत्पन्नाबरोबर लोकसंख्याही वाढली असेल तर लोकांचे जीवनमान उंचवणार नाही . म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न अधिक म्हणून विकास अधिक अशा प्रकारचे वरील विधान चुक ठरते . म्हणून आर्थिक विकासाचे मोजमाप अचूक करता येत नाही .  २ ) दरडोई उत्पन्न :  दरडोई उत्पन्नाचा वापर करून विकासाचे मोजमाप करता येते

Popular posts from this blog

Health and physical education -आरोग्य व शारीरिक शिक्षण Class 12th Project download

Environment education and water security - पर्यावरण शिक्षण व जलसुरक्षा Project 11th and 12th Class Project Download in PDF

Health and physical education class 12 solutions maharashtra board download in pdf in English